Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाTokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला 'हा'...

Tokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला ‘हा’ योग | India Swimmer Srihari Nataraj enter in Tokyo Olympic after Sajan Prakashभारताचा जलतरणपटू साजन प्रकाश हा टोक्यो ऑलम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला जलतरणपटू ठरला. साजन पाठोपाठ आणखी एका जलतरणपटूने ऑलम्पिकचं तिकिट मिळवलं आहे.

Tokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला 'हा' योग

swiming

नवी दिल्ली : भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशने (Sajan Prakash) रोममधल्या सेट्ट कोली स्विमिंग स्पर्धेत (Sette Colli Trophy) अप्रतिम कामगिरी करत टोक्यो ऑलम्पिकचं (Tokyo Olympics) तिकीट मिळवलं आणि एक नवा इतिहास रचला. कारण ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारा साजन पहिला भारतीय जलतरणपटू ठरला. मात्र आता आणखी एक आनंदाची बातमी भारतीयासांठी असून भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज (Srihari Natraj) हा देखील टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणार आहे. आंतरराष्ट्रीय स्वीमिंग फेडरेशनने (FINA) नटराजच्या ‘ए’ स्टँडर्ड टाइमला मान्यता देत त्याला टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवले आहे. (India Swimmer Srihari Nataraj enter in Tokyo Olympic after Sajan Prakash)

भारतीय जलतरण महासंघाने ट्वीट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की ‘श्रीहरी नटराजने सेटे कोली ट्रॉफी स्पर्धेत टाइम ट्रायलच्या दरम्यान 53.77 सेंकंदाचा टाईम घेतला. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी लागणारा क्वालिफिकेशन टाईममध्ये तो पात्र ठरल्याने तो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेऊ शकणार आहे.

इतिहासात पहिल्यांदाच ऑलम्पिकमध्ये दोन भारतीय जलतरणपटू

श्रीहरी नटराज आधी भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशने रोममधील सेट्ट कोली स्पर्धेत पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1 मिनिट 56.38 सेकंदांत अप्रतिम कामगिरी पार पाडली. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रतेसाठी 1 मिनिट 56.48 सेकंद वेळ निश्चित करण्यात आली होती. साजनने 10 सेंकदाच्या फरकाने यश मिळवत ऑलिम्पिकचं तिकीटं मिळवलं. त्यामुळे याआधी एकाही भारतीय जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेता आला नव्हता मात्र यंदा एक नाही दोन भारतीय जलतरणपटू ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्त्व करताना दिसतील.

हे ही वाचा :

Tokyo Olympics : साजन प्रकाशचं घवघवीत यश, ऑलम्पिकसाठी पात्र होणारा पहिला भारतीय जलतरणपटू, वाचा कशी मिळाली पात्रता

Photo : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधून ‘या’ दिग्गज टेनिसपटूंची माघार, प्रत्येकाची कारण वेगवेगळी

Tokyo Olympics पूर्वी भारताला झटका, सर्वोत्कृष्ट धावपटूला दुखापत

(India Swimmer Srihari Nataraj enter in Tokyo Olympic after Sajan Prakash)

Source link

Tokyo Olympics मध्ये आणखी एका भारतीय जलतरणपटूची वर्णी, इतिहासांत पहिल्यांदाच आला 'हा' योग | India Swimmer Srihari Nataraj enter in Tokyo Olympic after Sajan Prakash
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News