Tuesday, June 22, 2021
Homeमनोरंजनबापरे! अभिनेत्रीनं ३७ कोटी रूपयांचा शुद्ध सोन्याचा घातला ड्रेस, मेकअपही केला २४...

बापरे! अभिनेत्रीनं ३७ कोटी रूपयांचा शुद्ध सोन्याचा घातला ड्रेस, मेकअपही केला २४ कॅरेट सोन्याचाच

​३७ कोटी रूपयांचा ड्रेस?

बापरे! अभिनेत्रीनं ३७ कोटी रूपयांचा शुद्ध सोन्याचा घातला ड्रेस, मेकअपही केला २४ कॅरेट सोन्याचाच

अरब फॅशन वीक २०२०मध्ये शो स्टॉपर म्हणून सहभागी होणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला ही पहिली भारतीय महिला आहे. अरब फॅशन वीकमध्ये उर्वशीने शो स्टॉपर असणे आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट होती. तसंच या कार्यक्रमादरम्यान फर्न एमेटोची एक शॉर्ट फिल्म सुद्धा दाखवण्यात आली होती.

या लघुपटामध्येही अभिनेत्रीनं ‘क्वीन ऑफ मिस्र क्लियोपेट्रा’ ही भूमिका देखील साकारली. दरम्यान या चित्रपटासाठी तिने शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या ड्रेसची निवड केली होती, या आउटफिटची किंमत तब्बल ३७ कोटी रूपये एवढी होती.

(‘संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’)

​कोणी डिझाइन केला होता ड्रेस?

बापरे! अभिनेत्रीनं ३७ कोटी रूपयांचा शुद्ध सोन्याचा घातला ड्रेस, मेकअपही केला २४ कॅरेट सोन्याचाच

उर्वशीने परिधान केलेला सोन्याचा ड्रेस दुबई स्थित प्रसिद्ध लक्झरी फॅशन हाउस ‘Amato’ने डिझाइन केला होता. या ड्रेसची किंमतच चर्चेचा विषय ठरली होती. आउटफिट तयार करण्यासाठी पूर्णतः सोन्याचा वापर करण्यात आला होता. ड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या फॅब्रिकचा उपयोग केलेला नव्हता. तर पेपरवर सोन्याच्या तारा जोडून त्यावर अलंकारांचा वापर करण्यात आला होता.

(‘हे’ पदार्थ खात असाल तर वेळीच व्हा सावध! होऊ शकतो हा भयंकर आजार)

​पारंपरिक एम्ब्रॉयडरीचा समावेश

बापरे! अभिनेत्रीनं ३७ कोटी रूपयांचा शुद्ध सोन्याचा घातला ड्रेस, मेकअपही केला २४ कॅरेट सोन्याचाच

उर्वशी परिधान केलेल्या फ्लोरलेंग्थ बॉडीकॉन गाउनवर पारंपरिक एम्ब्रॉयडरीचाही समावेश होता. या ड्रेसवर हँडमेड डिझाइनही साकारण्यात आलीय. यावर आपण आकर्षक कशीदाकारी फ्लोरल मोटिफ्स पाहू शकता. आउटफिटमधील वजनदार एमब्लिश्ड हेअरडूने सुद्धा लोकांचा लक्ष वेधून घेतलं होतं.

हेअरडूबाबत डिझाइनरने सांगितलं की, ‘ड्रेसमधील आकर्षणाचा विषय म्हणजे शुद्ध सोने आणि स्वारोवस्की क्रिस्टलपासून तयार करण्यात आलेलं हँडमेड गोल्डन हूड आहे. जे तयार करण्यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लागला. तसंच हेअरडूच्या पुढील-मागील बाजूस सोन्याच्या तारांपासून आकर्षक वर्क करण्यात आलंय’.

(दीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं? ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त)

​२४ कॅरेट सोन्याचा मेकअप

बापरे! अभिनेत्रीनं ३७ कोटी रूपयांचा शुद्ध सोन्याचा घातला ड्रेस, मेकअपही केला २४ कॅरेट सोन्याचाच

उर्वशी रौतेलाचा मेकअप तुम्हाला भलेही पहिल्याच नजरेत आवडला नसेल. पण अभिनेत्रीचा हा लुक फॅशन वीकच्या थीमशी अगदी साजेसा होता. परफेक्ट लुक मिळावा यासाठी अभिनेत्रीने २४ कॅरेट सोन्यापासून हटके मेकअप केला होता. गोल्ड मेकअपसह तिनं कोहल आईज, बीमिंग हाइलाइटर, ग्लिटरी आयशॅडो अशा ब्युटी प्रोडक्टचा उपयोग केला होता. तसंच तिनं ओव्हरसाइझ्ड हुप्स ईअररिंग्ज सुद्धा घातले होते.

(डिलिव्हरीनंतर ‘या’ २ ट्रिक्स वापरुन तब्बल २० किलो वजन केले कमी, मिळवली स्लिम-ट्रिम फिगर!)

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW