Sunday, July 25, 2021
Homeपुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लसीकरण साहाय्य व जनजागृती पथनाट्य सुरुवात; समाजातील कोरोनाची...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लसीकरण साहाय्य व जनजागृती पथनाट्य सुरुवात; समाजातील कोरोनाची भीती घालवत जागरूकता निर्माण करा – गिरीश बापट

पुणे (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

 कोरोनाबाबत समाजातील काही घटकांमध्ये भीती पसरली आहे, या भीतीने काहींनी प्राणही गमावले आहे. विद्यार्थ्यांनी समाजातील ही भीती दूर करत जनजागृती करावी असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी ‘एनएसएस’ च्या विद्यार्थ्यांना केले.

युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पुणे महापालिका व पोलिस आयुक्तालय यांच्या समन्वयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळातर्फे ‘कोविड-१९ लसीकरण साहाय्य व जनजागृती पथनाट्य उपक्रमा’ चे आयोजन करण्यात आले आहे, त्या कार्यक्रमात गिरीश बापट बोलत होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लसीकरण साहाय्य व जनजागृती पथनाट्य सुरुवात; समाजातील कोरोनाची भीती घालवत जागरूकता निर्माण करा - गिरीश बापट

या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, एअर चीफ मार्शल भूषण गोखले, सहायक पोलिस उपायुक्त नितीश घट्टे, महाराष्ट्र व गोवा राज्यचे क्षेत्रीय संचालक डी.कार्थीगेन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. विलास उगले, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे उपस्थित होते. यावेळी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांवर समन्वय व  जनजागृती कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या १५० स्वयंसेवकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमात बोलताना विक्रम कुमार म्हणाले, पुण्यात २२० लसीकरण केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १७ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या लसीकरण केंद्रांवर गर्दी नियंत्रण, समन्वय, माहिती व जनजागृतीसाठी हे स्वयंसेवक मोठा हातभार लावतील, याची खात्री आहे.

राजेश पांडे यांनी ‘एनएसएस’ च्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोरोना काळात केलेल्या कामांचे कौतुक केले.


विद्यापीठातील विद्यार्थी हा या चार भिंतीतील विद्यार्थी नाही तर ‘समाज विद्यापीठातील’ विद्यार्थी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ समाजाबरोबर आहे हा संदेश हे विद्यार्थी स्वयंसेवक देत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लसीकरण साहाय्य व जनजागृती पथनाट्य सुरुवात; समाजातील कोरोनाची भीती घालवत जागरूकता निर्माण करा - गिरीश बापट
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News