Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाVideo : एम एस धोनीला आहे झोपेत बोलण्याची सवय, पत्नी साक्षीने केला...

Video : एम एस धोनीला आहे झोपेत बोलण्याची सवय, पत्नी साक्षीने केला खुलासा, नेमक काय बोलतो माही? | Former Indian Captain MS Dhoni Mumbles in Sleep says his Wife Sakshi in CSK Shared Videoतुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला झोपेत बोलण्याची सवय आहे. ही बाब त्याची पत्नी साक्षी धोनीने स्वत: सांगितली आहे.

Video : एम एस धोनीला आहे झोपेत बोलण्याची सवय, पत्नी साक्षीने केला खुलासा, नेमक काय बोलतो माही?

महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) सर्वात यशस्वी कर्णधार ज्याने आयसीसीच्या (ICC) तिन्ही प्रकारच्या ट्रॉफी भारताला मिळवून दिल्या अशा एमएस धोनीबद्दल (MS Dhoni) एक मोठा खुलासा त्याची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) केला आहे. धोनीबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहित आहेत. धोनीची विचार करण्याची पद्धत, शांत स्वभाव आणि धडाकेबाज निर्णय घेण्याच्या सवयीमुळे त्याचे लाखो चाहते आहेत. अनेकजण तर म्हणतात धोनी स्टम्पच्या मागे थांबून सर्व मॅच फिरवू शकतो आणि ते खरेही असून त्याचा प्रयत्य अनेकदा धोनीने आणून दिला होता. पण हाच धोनी रात्री झोपेत बडबडतो असे ऐकल्यावर थोडा धक्का बसेलना पण हो धोनीला रात्री झोपेत बोलण्याची सवय असून त्याची पत्नी साक्षी हिने हा खुलासा केला आहे.

धोनीला नेमकी ही सवय कशी लागली आणि तो झोपेत काय बोलतो हे आम्ही तुम्हाला सांगूच, पण त्याआधी धोनी कर्णधार असेलेल्या आयपीएलमधील (IPL) चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने शेअर केलेला हा दीड मिनिटांचा व्हिडीओ नक्की पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळतील.

पब्जी लव्हर आहे धोनी

CSK ने शेअर केलेल्या या व्हिडीओत साक्षीने धोनीच्या झोपेत बडबडायच्या सवयीबद्दल सांगितले आहे. ती म्हणते धोनी सतत कसला तरी विचार करत असतो तो हुशारही असल्याने सतत त्याच्या डोक्यात काहीतरी सुरु असतं.  तो व्हिडिओ गेम्समध्ये व्यस्त असतो. त्याला पब्जी (PUBG) खेळायला खूप आवडते आणि झोपेतही तो पब्जी गेमबद्दलच बोलत असतो.

नुकतीच साक्षी आणि धोनीच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण

महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांचा रविवारी (4 जुलै) लग्नाचा वाढदिवस होता.  2010 मध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले होते. दोघांनी 3 जुलै, 2010 ला डेहराडूनच्या एका हॉटेलात साखरपुडा करुन दुसऱ्याच दिवशी लग्न केलं होतं. दरम्यान याचेच औचित्य साधत महेंद्र सिंह धोनीने पत्नी साक्षी धोनीला (Sakshi Dhoni) एक शानदार विंटेज कार गिफ्ट दिल.

हे ही वाचा :

महेद्रसिंह धोनीच्या घरी नवी पाहुणी, लग्नाच्या वाढदिवसादिवशी पत्नी साक्षीने दिली माहिती, फोटोही केला पोस्ट

Photo : महेद्रसिंह धोनी आणि साक्षीच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, अशी झाली होती पहिली भेट, सिनेमापेक्षा वेगळी आहे धोनीची प्रेमकहाणी

Video : धोनीचं फार्म हाऊस, पाळीव प्राण्यांसह फळा-फुलांचा खजिना

(Former Indian Captain MS Dhoni Mumbles in Sleep says his Wife Sakshi in CSK Shared Video)

Source link

Video : एम एस धोनीला आहे झोपेत बोलण्याची सवय, पत्नी साक्षीने केला खुलासा, नेमक काय बोलतो माही? | Former Indian Captain MS Dhoni Mumbles in Sleep says his Wife Sakshi in CSK Shared Video
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News