Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाVideo : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश...

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश | India Cricketer Suryakumar Yadav Dancing Workout on Marathi song video went viralमुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आता भारतीय संघातून श्रीलंका दौैऱ्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सूर्या जीममध्ये वर्कआऊट करत असून एका भन्नाट मराठी गाण्यावर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सूर्याने शेअर केला आहे.

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

Suryakumar Yadav Workout

मुंबई : भारताचे युवा खेळाडू श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध भारत सामन्यांसाठी भारताने बहुतांश नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. शिखर धवनला कर्णधार तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आलं असून चेतन सकारीया, देवदत्त पड्डीकल, नितिश राणा अशा बऱ्याच खेळाडूंचा हा पहिलाच दौैरा असणार आहे. दरम्यान नुकतेच भारतीय संघात पदार्पण झालेल्या सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान देण्यात आल्याने तो फिटनेससाठी जीममध्ये सध्या घाम गाळत आहे. पण सूर्या मजेशीरपणाने मेहनत करत असून एका भन्नाट मराठी गाण्यावर वर्कआऊट करतानचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘वर ढगाला लागली कळ’ या दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर सूर्या वर्कआऊट करत आहे. तर सर्वांत आधी तुम्ही हा व्हिडीओ पाहाच…

तर अशाप्रकारे सूर्या अगदी मजा घेत वर्कआऊट करत आहे. सूर्या मुंबईचाच रहिवाशी असल्याने तो मराठी भाषेसोबत बऱ्यापैकी परिचित आहे. त्याला अनेकदा उत्तम मराठी बोलताना देखील पाहिलं गेलं आहे. त्यामुळे त्याला मराठी गाणी देखील आवडत असवी म्हणूनच त्याने या तुफान सुपरहिट गाण्यावर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला असावा.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

हे ही वाचा :

WTC Final मध्ये पराभवानंतर श्रीलंका दौरा जिंकण्यासाठी युवा क्रिकेटपटू करतायत मेहनत, बीसीसीआयने शेअर केले फोटो

WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली

WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!

(India Cricketer Suryakumar Yadav Dancing Workout on Marathi song video went viral)

Source link

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश | India Cricketer Suryakumar Yadav Dancing Workout on Marathi song video went viral
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News