Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाVideo : 'या' स्टार खेळाडूने बॅटने नाही तर गॉल्फ स्टिकने खेळला हेलिकॉप्टर...

Video : ‘या’ स्टार खेळाडूने बॅटने नाही तर गॉल्फ स्टिकने खेळला हेलिकॉप्टर शॉट, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश | Rashid Khan Post Video of Himself Playing Helicopter Shot with Golf Stickया खेळाडूचा असा अजब गॉल्फ शॉट पाहून इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसननेही त्याला कोपरखळी देत एक मजेशीर कमेंट केली आहे.

Video : 'या' स्टार खेळाडूने बॅटने नाही तर गॉल्फ स्टिकने खेळला हेलिकॉप्टर शॉट, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश

Rashid khan

मुंबई : अगदी कमी वयात जागतिक क्रिकेटमध्ये नावारुपाला आलेला खेळाडू म्हणजे अफगानिस्तान संघाचा स्टार प्लेयर राशिद खान (Rashid Khan). राशिदने त्याच्या फिरकीच्या जोरावर अनेक दिग्गजांना तंबूत धाडले आहे. विशेष म्हणजे शेवट्या फळीत येऊन राशिद फलंदाजीतही चुनूक दाखवू शकत असल्याने त्याला अष्टपैलू खेळाडू अशीही ओळख मिळू लागली आहे. अशीच बॅटिंगची एक झलक त्याने  एका व्हिडीओत दाखवली आहे पण यामध्ये राशिदच्या हातात बॅट नसून गॉल्फ स्टीक आहे. गॉल्फ स्टीकने हेलिकॉप्टर शॉट खेळणाऱ्या राशिदने हा व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. (Rashid Khan Post Video of Himself Playing Helicopter Shot with Golf Stick)

भारताचा माजी  कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रसिद्ध केलेला हेलिकॉप्टर शॉट सध्याच्या क्रिकेटमधील एक पॉवरफुल शॉट म्हणून ओळखला जातो. राशिदलाही हा शॉट बऱ्यापैकी जमतो. त्यामुळे त्याने थेट गॉल्फ स्टीकनेच हेलिकॉप्टक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत राशिदने त्याला ‘तुम्ही कधी असा प्रयत्न केला आहे का?’असे प्रश्नार्थक कॅप्शनही दिले आहे. दरम्यान यावर इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसननेही राशिदला कोपरखळी देत एक मजेशीर कमेंट केली आहे. ही कमेंट काय आहे वाचण्याआधी तुम्ही राशिदचा व्हिडीओ पाहा.

पीटरसनची राशिदला कोपरखळी

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसननेही राशिद खानच्या या व्हिडिओवर एक मजेशीर कमेंट केली आहे. त्याने राशिदला पुढच्या वेळी ‘स्विच हिट’ खेळण्याचा प्रयत्न कर, असे म्हटले आहे. स्विच हिट हा क्रिकेट शॉट खेळताना अगदी शेवटच्या वेळेस फलंदाज आपल्या खेळण्याची दिशा बदलतो आणि उलट दिशेला शॉट खेळतो. विशेष म्हणजे केविन पीटरसन स्विच हिट खेळण्यात माहिर असल्यानेच त्याने अशी मजेशीर कमेंट करत राशिदला कोपरखळी दिली आहे.

हे ही वाचा  –

IPL 2022 बाबत मोठी माहिती समोर, स्पर्धेत होणार मोठे बदल, संघाची संख्या वाढवणार, ‘या’ कंपन्यामध्ये संघ विकत घेण्यासाठी चुरस

Video : एम एस धोनीला आहे झोपेत बोलण्याची सवय, पत्नी साक्षीने केला खुलासा, नेमक काय बोलतो माही?

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(Rashid Khan Post Video of Himself Playing Helicopter Shot with Golf Stick)

Source link

Video : 'या' स्टार खेळाडूने बॅटने नाही तर गॉल्फ स्टिकने खेळला हेलिकॉप्टर शॉट, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश | Rashid Khan Post Video of Himself Playing Helicopter Shot with Golf Stick
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News