Sunday, July 25, 2021
Homeक्रीडाVIDEO | सॅमसन ते पांड्या बंधू, क्रिकेटर्सची आवडती डिश Mock Duck, खुद्द...

VIDEO | सॅमसन ते पांड्या बंधू, क्रिकेटर्सची आवडती डिश Mock Duck, खुद्द शिखर धवनने दाखवली रेसिपी | Shikhar Dhawan shares recipe of Indian Cricketers Favourite dish Mock Duck Dishयुवा खेळाडूंची संख्या अधिक असणाऱा भारतीय संध श्रीलंका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटपटूंची आवडती डिश मॉक डक नेमकी कशी केली जाते. याबद्दल शिखर धवन सांगतोय बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओतून..

VIDEO | सॅमसन ते पांड्या बंधू, क्रिकेटर्सची आवडती डिश Mock Duck, खुद्द शिखर धवनने दाखवली रेसिपी

shikhar dhawan shares mock duck recipee

मुंबई : भारतात करोडो क्रिकेट चाहते असून प्रत्येक क्रिकेटच्या सामन्यासाठी, स्पर्धेसाठी या चाहत्यांची उत्सुकता कायमच शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते. तसेच आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंच्या लाईफस्टाईलमध्येही भारतीय क्रिकेट चाहत्यांना खूपच रस असतो. दरम्यान आपले लाडके क्रिकेटपटू स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय खातात?, त्यांची आवडती डिश कोणती? असे प्रश्न अनेकजण विचारतात. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाची आवडती डिश असणाऱ्या Mock Duck बद्दल स्वत: बीसीसीआयने माहिती दिली असून शिखर धवनने एका व्हिडीओत Mock Duck कशी बनवतात? हे दाखवलं आहे. (Shikhar Dhawan shares recipe of Indian Cricketers Favourite dish Mock Duck Dish)

बीसीसीयआने शेअर केलेल्या या साधारण अ़डीच मिनिटांच्या व्हिडीओमध्ये Mock Duck ही डिश बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. ही एक शाकाहारी डिश अशून यामध्ये प्रोटीन अधिकप्रमाणात असते. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमधील शेफ राकेश कांबळे यांनी व्हिडीओत ही डिश केली असून शिखरने हा संपूर्ण व्हिडीओ तयार करताना एका मुलाखतकाराची भूमिका निभावली आहे. शिखर धवन कर्णधार असणारी टीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार असून त्याठिकाणी टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.

 

 

हे ही वाचा :

IND vs SL : धवन सेना श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज, लवकरच रवाना होणार, बीसीसीआयने शेअर केला दमदार फोटो

‘द वॉल’ने ठरवली श्रीलंका दौऱ्याची रणनीती, द्रविड म्हणतो तीनच T20 सामने, सगळ्यांनाच कशी संधी मिळेल?

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

(Shikhar Dhawan shares recipe of Indian Cricketers Favourite dish Mock Duck Dish)

Source link

VIDEO | सॅमसन ते पांड्या बंधू, क्रिकेटर्सची आवडती डिश Mock Duck, खुद्द शिखर धवनने दाखवली रेसिपी | Shikhar Dhawan shares recipe of Indian Cricketers Favourite dish Mock Duck Dish
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News