Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रweather today at my location hourly: ​Weather Report : बळीराजावर आस्मानी संकट,...

weather today at my location hourly: ​Weather Report : बळीराजावर आस्मानी संकट, ‘या’ तारखेपर्यंत राज्यात पाऊस नाही – weather alert rainfall is likely to be low again in the coming weeks likely to return after july 8 and 9


हायलाइट्स:

  • करोनाच्या संकटानंतर बळीराजावर आस्मानी संकट
  • ‘या’ तारखेपर्यंत राज्यात पाऊस नाही
  • जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही

मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मान्सूनची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी पेरणीला ही सुरुवात केली. पण गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली. 30 जूनपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण 30 जूननंतर आठ ते नऊ जुलैपर्यंत पावसाचं पुनरागमन होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा ओढ दिसला. गडगडाटासह होणाऱ्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. पण येत्या आठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. पाऊस सुरू होताच शेतकर्‍यांनी पेरणी केली. पण आता गायब झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे आलं आहे. कोरोनाच्या जिवघेण्या संकटामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी आता अस्मानी संकटामुळे पुन्हा एकदा निराश झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३० जूनपर्यंत राज्यात पावसाचे चित्र होते. गेल्या काही दिवसात राज्यात मान्सूनने ओढ दिलेली दिसताना गडगडाटासह होणाऱ्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. पण येत्या आ़ठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. तर ८,९ जुलैनंतर परत पावसाचे पुनरागमनाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

९ जुलैनंतर कोकणात जोर वाढणार

पूर्वानुमानानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्यानंतर २ ते ८ जुलै या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे.
weather today at my location hourly: ​Weather Report : बळीराजावर आस्मानी संकट, 'या' तारखेपर्यंत राज्यात पाऊस नाही - weather alert rainfall is likely to be low again in the coming weeks likely to return after july 8 and 9धक्कादायक! युवकाच्या हत्येनंतर आरोपीला जागीच मिळाली शिक्षा, ‘असा’ गमावला स्वत:चा जीवSource link

weather today at my location hourly: ​Weather Report : बळीराजावर आस्मानी संकट, 'या' तारखेपर्यंत राज्यात पाऊस नाही - weather alert rainfall is likely to be low again in the coming weeks likely to return after july 8 and 9
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News