Monday, June 21, 2021
Homeमनोरंजनकरोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, वेळीच लक्षणं न ओळखल्यास होतील...

करोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, वेळीच लक्षणं न ओळखल्यास होतील गंभीर परिणाम

शासननामा न्यूज ऑनलाईन

डोळ्यांना न दिसणाऱ्या करोना विषाणूमुळे आज लाखो लोक त्रस्त आहेत. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत साऱ्यांनाच या आजाराचा सामना करावा लागत आहे. आता करोनाची रूग्णसंख्या थोड्याफार प्रमाणात कमी होत असली तरी या आजाराची बदलती लक्षणं जीवघेणी ठरत आहेत. बऱ्याच लोकांमध्ये करोनाची लक्षण दिसत नसताना देखील त्यांना या आजाराची लागण होत आहे. या संसर्गजन्य आजाराचा परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर होत आहे. करोनाची दुसरी लाट सुरू असताना या लाटेचा प्रभाव लहान वयोगटातील मुलांवर देखील पाहायला मिळत आहे.

मुलांना करोना होऊन गेल्यानंतरही त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं विविध अहवालांमधून समोर आलं. यातच एक आता नवीन बाब म्हणजे करोनातून बरे झालेल्या मुलांना मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोमचा (एमआयएस-सी) सामना करावा लागत आहे. हा सिंड्रोम नेमका काय आहे?, याचा मुलांवर काय परिणाम होतो हे आम्ही तुम्हाला या लेखाच्या आधारे सांगणार आहोत.

​मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोम (एमआयएस-सी) म्हणजे काय?

करोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, वेळीच लक्षणं न ओळखल्यास होतील गंभीर परिणाम

एखाद्या व्यक्तीचा करोनाची अधिक प्रमाणात लागण झाल्यानंतर याचा परिणाम फुफ्फुसं, हृदय तसेच शरीराच्या अन्य भागांवर होतो. मुलांना देखील या आजाराची लागण झाल्याचे करोना चाचणीच्या काही अहवालांमधून समोर आलं आहे. आता करोनामधून बरे झालेल्या मुलांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोमचा (एमआयएस-सी) धोका वाढला आहे. हा सिंड्रोम कवास्की सिंड्रोमसारखा आहे. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. या आजाराचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे मुलांच्या त्वचेवर वेगळे बदल दिसू लागतात.

​डॉक्टरांचं मत काय?

करोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, वेळीच लक्षणं न ओळखल्यास होतील गंभीर परिणाम

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एमआयएस-सी हा सिंड्रोम करोनामधून बरे झालेल्या मुलांना झाल्याचं दिसून आलं आहे. करोनाशी लढा देत असताना जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि यामुळे संपूर्ण शरीराला सूज येते तेव्हा हा आजारा रूग्णांमध्ये उद्भवतो. ताप, डोकेदुखी, गॅस्ट्रोइंटेस्टायनल किंवा सूज अशी लक्षणं या सिंड्रोममध्ये दिसून येतात. मुलांच्या त्वचेवर दिसणारे असामान्य परिणामही या आजाराचे मोठे लक्षण आहे. JAMA डर्मेटोलॉजीने प्रकाशित केल्यानुसार मुलांच्या त्वचेवर असणाऱ्या म्युकस मेंब्रेननुसार या आजाराचे निदान केले जाते.

त्वचेवर होतो परिणाम

करोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, वेळीच लक्षणं न ओळखल्यास होतील गंभीर परिणाम

करोना विषाणूपासून आपल्या मुलांना दूर कसं ठेवायचं या चिंतेत सध्या पालक आहेत. त्यामध्येच आता नवनवीन आजार डोकं वर काढत आहेत. करोनामधून बरे झालेल्या काही मुलांना एमआयएस-सी या सिंड्रोमने ग्रासलं आहे. या सिंड्रोममुळे त्रस्त असलेली ३५ मुलं रुग्णालयात भरती झाल्यानंतर या मुलांमधील काही गंभीर लक्षणं संशोधकांच्या लक्षात आली आहेत. या आजाराने ग्रस्त असलेल्या ८३ टक्के रूग्णांमध्ये त्वचेवर पुरळ, सूज आणि लालसरपणा दिसून आला.

पालकांनो वेळीच सावध व्हा

करोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, वेळीच लक्षणं न ओळखल्यास होतील गंभीर परिणाम

आता संशोधकांनी पालक आणि डॉक्टरांना विशेष सुचना दिल्या आहेत. या सिंड्रोमशी निगडीत काही लक्षणं मुलांमध्ये दिसत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. लगेचच ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच मुलांच्या त्वचेवर देखील काही असामान्य परिणाम दिसत असतील तर त्याचा करोनाशी संबंध असू शकतो. त्यामुळे वेळीच मुलांची योग्य ती काळजी घ्या. जर या सिंड्रोमची लक्षणं सौम्य असतील तर घरच्या घरी तुम्ही यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करू शकता.

​त्वचेवर दिसणारी लक्षणं

करोनामधून बरे झालेल्या मुलांवर नव्या आजाराचं सावट, वेळीच लक्षणं न ओळखल्यास होतील गंभीर परिणाम

५ ते १४ वयोगटातील मुलांना एमआयएस-सीचा अधिक सामना करावा लागत असल्याचं एका संशोधनानुसार समोर आलं आहे. हा आजार गंभीर आहे. मात्र यावर वेळीच उपचार झाले तर लवकरात लवकर यातून सुटका मिळू शकते. या आजाराची लक्षणं वेळेत ओळखं खूप गरजेचं आहे. मुलांच्या त्वचेवर काही वेगळे बदल तुम्हाला जाणवत असतील तर वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. या आजाराची लक्षण खालीलप्रमाणे

– ओठ फाटणे

– हात व पाय सुजणे

– शरीरावर पुरळ येणे

– जीभेचा रंग बदलणे

– हात आणि पायाच्या रंगामध्ये बदल दिसणे

या लक्षणांव्यतिरिक्त अधिक ताप, डोळे लाल होणे, थकवा येणे, पोट दुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीमध्ये दुखणे ही देखील या सिंड्रोमची लक्षणं आहेत.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW