Tuesday, June 22, 2021
Homeमनोरंजनदीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं? ६...

दीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं? ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त

शासननामा न्यूज ऑनलाईन

बॉलिवूडची ‘शांती’ दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या शाही विवाहसोहळा कोणीही विसरणं शक्य नव्हे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. लग्नामध्ये दीपिका इतकी सुंदर दिसत होती की तिच्या रूपाची चर्चा आजही केली जाते.

इतकेच नव्हे तर दीपिकाने परिधान केलेल्या डिझाइनर लेहंग्याचा ट्रेंड आजही जोमात आहे. कित्येक तरुणींनी स्वतःच्या लग्नसोहळ्यामध्ये या अभिनेत्रीचा वेडिंग लुक फॉलो केल्याचं पाहायला मिळालंय. फॅशन डिझाइनर सब्यसाची मुखर्जी यांनी लाल रंगाचा सुंदर लेहंगा खास दीपिका पादुकोणसाठी डिझाइन केला होता. दरम्यान लेहंगा तयार करण्यापासून ते कपड्यांच्या फिटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया मुळीच सोपी नव्हती. यामुळचे डिझाइनरने दीपिकाला बुरखा घालून येण्याचाही सल्ला दिला होता. जाणून घेऊया यामागील कारण…

​सहा महिन्यांचे सीक्रेट

दीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं? ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त

सब्यसाची मुखर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाबाबतची माहिती सहा महिन्यांपूर्वी समजली होती. तेव्हापासून या दोघांनी लग्नसोहळ्यातील आउटफिट्सवर काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान या दोघांच्या लग्नाची माहिती गुप्त ठेवणं ही बाब माझ्यासाठी फार आव्हानात्मक होती. कारण या जोडप्याने आपल्या नात्याची माहिती सार्वजनिक केली नव्हती तसंच लग्नाच्या वृत्तालाही अधिकृतरित्या दुजोरा दिला नव्हता.

​बुरखा परिधान करण्याचा सल्ला

दीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं? ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त

डिजाइनर सांगितलं की, आउटफिट्सच्या फिटिंगसाठी दीपिकाला बोलवणे सोपे नव्हते. यासाठी त्यांनी अभिनेत्रीला बुरखा परिधान करून येण्याचा सल्ला दिला होता. सब्यसाची यांनी म्हटलं की, ‘दीपिकाने जेव्हा मला कॉल केला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये ‘Nightmare on Elm Street Part 5’ सिनेमाचे विचार येऊ लागले. यास कारणीभूत दीपिका नक्कीच नव्हती.

मी अनुष्का आणि अन्य बॉलिवूड सेलिब्रिटींसाठीही कपडे डिझाइन केले आहेत. अशा परिस्थितीत भारतात जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीचं लग्न असते, तेव्हा त्यांच्या लग्नाशी संबंधित सर्व तपशील गुप्त कसा ठेवता येईल हीच सर्वात मोठी चिंतेची बाब असते.

​सहा महिने आव्हानात्मक

दीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं? ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त

सब्यसाची यांनी पुढे असंही सांगितलं की, ‘अनुष्काच्या लग्नाची माहिती एक महिना आधी मिळाली होती. तर दुसरीकडे दीपिका आणि रणवीरच्या लग्नासाठी सहा महिने बाकी होते. यादरम्यान सर्वजण आधीपासूनच रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा अंदाज बांधत होते. प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्या लग्नाशी संबंधित ५० लेख आधीच छापले होते’. अशा परिस्थिती तब्बल सहा महिन्यांपर्यंत सारं काही गुपित ठेवणं खरंच आव्हानात्मक होतं.

​लेक कोमोमध्ये थाटामाटात करण्यात आलं लग्न

दीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं? ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त

नोव्हेंबर २०१८मध्ये इटलीतील लेक कोमो या परिसरात रणवीर व दीपिका यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पण यापूर्वी दीपवीरच्या लग्नाबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हती. दोघांच्या लग्नाची माहिती सार्वजनिक होणार नाही, याची खूप काळजी घेण्यात आली होती. लग्नसोहळ्यामध्ये जवळचे नातेवाईक तसंच मित्रपरिवाराचाच समावेश होता. लग्नसोहळ्यासाठी दीपिका आणि रणवीरने एकापेक्षा एक सुंदर आउटफिट्स परिधान केल्याचं पाहायला मिळालं.

दीपिका पादुकोण – रणवीर सिंगचा शाही विवाहसोहळा

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW