Sunday, July 25, 2021
Homeपुणेपुण्यातील मॉल बंद का? अजित पवारांनी सांगितलं निर्बंधांमागचं कारण

पुण्यातील मॉल बंद का? अजित पवारांनी सांगितलं निर्बंधांमागचं कारण

पुणे, 2 जुलै: पुण्यामध्ये (Pune) मॉल सुरु करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारनं तीनच आठवड्यात घुमजाव करत मॉल (Mall) आणि थिएटर्स (Theaters) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मॉलमध्ये सेंट्रलाईज एसी (Centralized Air Conditioner) असतो. त्यामुळे एका भागातील हवा दुसऱ्या भागात जात असते. यामुळे कोरोनाचा संसर्ग (Corona) वाढायला हातभार लागू शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितल्यामुळेच मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मॉल आणि इतर दुकानांमध्ये फरक

इतर दुकानं उघडी ठेवण्याच्या निर्णयाची तुलना मॉलशी करता येणार ऩसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. इतर दुकानांमध्ये नागरिक कामापुरते जातात आणि हवी ती वस्तू घेऊन लगेच बाहेर पडतात. मात्र मॉलच्या बाबतीत असं होत नाही. हवी ती वस्तू घेतल्यानंतरही नागरिक लगेच मॉलमधून बाहेर पडत नाहीत. त्यांची पावलं मॉलमध्येच इतरत्र फिरत राहतात, असं ते म्हणाले. अनेकजण तर काहीही खरेदी करायची नसताना, केवळ फिऱण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी मॉलमध्ये येतात आणि त्यामुळे विनाकारण गर्दी होण्याची शक्यता असून कोरोना संसर्ग वाढेल, अशा कुठल्याही शक्यतेला स्थान मिळणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत असल्याचं पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

पुण्यात गेल्या काही आठवड्यांपासून कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागल्याचं सांगत त्यासाठी उपाययोजना सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले. पुण्याचा पॉझिटीव्हीटी दरही वाढत असून तो 4.6 टक्क्यांवरून 5.3 टक्के झाल्याचं त्यांनी सांगितलं.

आहे तीच नियमावली सुरू राहणार

पुण्यातील मॉल आणि थिएटर्स बंदच राहणार असून इतर व्यवहारदेखील पूर्वीसारखेच आणि पूर्वीएवढाच वेळ सुरू राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पुण्यातील पॉझिटीव्हीटी दर वाढत असताना कुठलाही दिलासा देणं किंवा बाजारपेठेची वेळ वाढवणं शक्य नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. सध्या सुरु असलेल्या निर्बंधांप्रमाणेच पुण्यातील व्यवहार पुढील आठवड्यातदेखील सुरू राहणार असल्याचं त्यामुळं स्पष्ट झालं आहे.

Source link

पुण्यातील मॉल बंद का? अजित पवारांनी सांगितलं निर्बंधांमागचं कारण
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News