Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रटाटाला कशाला द्यायचा जनतेचा वाटा?; नाना पटोले यांचा सवाल

टाटाला कशाला द्यायचा जनतेचा वाटा?; नाना पटोले यांचा सवाल

जळगाव: म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर आता मुंबईतील बॉम्बे डाइंग परिसरात १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र काँग्रेसने या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरजच काय?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. (why to give tata a share of the people says congress leader nana patole)

नाना पटोले जळगावमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. ही स्थिती असताना टाटाने आपला सीएसआर फंड वापरावा असा सल्ला देताना टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरजच काय?, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका देण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या १०० सदनिकांच्या किल्ल्या देखील टाटा रुग्णालयाला देण्यात आल्या होत्या. मात्र पुढे शिवसेना आमदाराच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी म्हाडाच्या सदनिका देण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर नाना पटोले यांनी हे भाष्य केले आहे.टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या १०० खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर १६ मे या दिवशी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्याही सुपूर्द करण्यात आल्या.शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी मात्र याबाबत तक्रार केली होती. आपण आव्हाड यांच्याकडे वेळ मागूनही त्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे चौधरी यांचे म्हणणे होते. चौधरी यांच्या तक्रार काय आहे ती तपासून त्याचा अहवाल सादर होईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी स्थिगिती दिली.

Source link

टाटाला कशाला द्यायचा जनतेचा वाटा?; नाना पटोले यांचा सवाल
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News