महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद!

0
17
जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन किंवा वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मनात विचार येतो की ते कसे होईल. आयुष्यात कधीच कसा या प्रश्नाला उत्तर नसते तर उत्तर असते ते फक्त का या प्रश्नाचे! जेव्हा आपण काही करण्याची सुरुवात करतो आणि त्यामागचे कारण निश्चित असते तेव्हा मग ते कसे होईल याचे उत्तर आपल्याला आपोआप मिळते किंवा आपण ते शोधून काढतो. 33 वर्षीय डॉक्टर मेहक बन्सल यांनीही असेच काहीसे केले. व्यवसायाने न्युट्रिशनिस्ट आणि फिटनेस एक्सपर्ट्स असलेल्या मेहकचे वजन प्रसूतीनंतर अचानक वाढले होते.

ज्यामुळे लोकांनी तिची खिल्ली उडवणं सुरु केलं होतं, पण आज योग्य आहार आणि व्यायामामुळे मेहकने तब्बल 32 किलो वजन कमी केले आहे. ज्या महिलांना वजन तर कमी करायचे आहे पण ज्या शिस्त आणि परिश्रमात अयशस्वी होतात अशा महिलांसाठी मेहक एक प्रेरणा आहे. चला तर जाणून घेऊया मेहेकने तिचे वजन कसे कमी केले. तिच्या टिप्स तुमच्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात.

 • नाव – डॉ. महक बन्सल
 • व्यवसाय – न्युट्रिशनिस्ट व फिटनेस एक्सपर्ट
 • वय – ३३ वर्षे
 • उंची – ५ फूट ५ इंच
 • शहर – दिल्ली
 • सर्वाधिक वजन – ९८ किलोग्रॅम
 • वेट लॉस – ३२ किलोग्रॅम
 • वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – ६.५ महिने

वेट लॉस जर्नीची सुरुवात अशी झाली

महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद!

आपण बर्‍याचदा पाहिले असेल की एखादी व्यक्ती एखाद्या व्यवसायात असूनही त्या क्षेत्राशी मिळतं जुळतं काम त्याला येत नसेल किंवा तशी ती दिसत नसेल तर आपण बर्‍याचदा त्याच्यावर कमी विश्वास ठेवतो. असेच काहीसे मेहकच्या बाबतीत घडत होते. मेहक बन्सल सांगतात त्यांना दोन मुले आहेत. गर्भधारणेनंतर त्यांचे वजन वेगाने वाढू लागले होते आणि ते कमी होण्याचे नावच घेत नव्हते. मेहक स्वतः एक न्यूट्रिशनिस्ट आहेत, ज्यामुळे लोक केवळ त्यांची खिल्लीच उडवत नव्हते तर त्याउलट त्यांच्या व्यवसायावरही प्रश्नचिन्ह उभे करत होते. स्वतःवर उठणा-या या प्रश्नचिन्हांना कायमचा पूर्णविराम देण्यासाठी आणि स्वत:ला आकर्षक बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी त्यांनी वेट लॉस जर्नीला सुरूवात केली. याव्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी त्यांची दोन्ही मुलेही कारण ठरली. त्यांच्या मुलांनी बर्‍याचदा त्यांच्याजवळ फिट होण्यासाठी मागणी केली. जेणेकरून त्यांना मेहकबरोबर खेळता येऊ शकेल.

हे डाएट प्लान केलं फॉलो

महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद!

वजन कमी करण्यात आहार सर्वात महत्वाची भूमिका निभावतो. म्हणूनच मेहक यांनीही त्यांच्या आहाराकडे खास लक्ष दिले.

व्हेज सँडविच किंवा उपमा

एक वाटी ब्राउन राइस आणि चिकन किंवा मासे यापैकी काहीही एक

 • रात्रीचे जेवण –

एक वाटी भाजी बीट घालून बनवलेल्या चपाती सोबत आणि एक बाउल सूप व भरपूर कोशिंबीर

 • प्री वर्कआउट डाएट

1 सफरचंद, 5 अक्रोड आणि 2 बदाम

 • पोस्ट वर्कआउट डाएट

1 वाटी दह्यामध्ये एक चमचा मध

मेहक सांगते की तिला स्ट्रीट फूड खायला खूप आवडते पण ती वजन कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने सर्व जंक फूडच्या जागी हेल्दी फूड घ्यायला तिने सुरुवात केली आहे. जसं की तिला मोमोज खायला खूप आवडायचं पण तिने गव्हापासून बनवलेले स्टीम मोमोज खायला सुरवात केली. त्याचवेळी तिने दही टिक्कीऐवजी राज कचोरी खाण्यास सुरवात केली.

वर्कआउट प्लान कसा होता?

महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद!

मेहक सांगते की ती दिवसभर मुलांच्या मागे धावण्याचेच काम नेहमी करत असे. याशिवाय घरातील सर्व कामे स्वत:हून करणे, स्ट्रेचिंग करणे. यासोबतच ती जम्पिंग जॅक, वर्कआउट्समध्ये स्क्वॅट्स खूप जास्त करायची. मेहकच्या म्हणण्यानुसार, स्क्वॅट्स आणि जम्पिंग जॅकमुळे तिला आपली बॉडी शेपमध्ये आणण्यास खूप मदत झाली.

फिटनेस सिक्रेट

महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद!

महकचे वजन कमी करण्याचे रहस्य तिने निवडलेल्या आहारात आहे. मेहक म्हणतात की मिठाचे कमी सेवन केल्यास तुम्हाला आश्चर्यचकित करणारा फरक दिसून येईल. ती रात्री 8 नंतर मीठ खात नाही. याशिवाय तिने साखरेऐवजी गूळ खाण्यास सुरुवात केली. तसेच दिवसातून फक्त एकदाच ती कॅफीनचे सेवन करू लागली. याव्यतिरिक्त साध्या चपातीपेक्षा त्यांनी बीटापासून बनवलेली पौष्टिक व टेस्टी चपाती खाण्यास सुरुवात केली. मेहक पुढे म्हणतात की वजन कमी करण्यासाठी लहान लहान बदल खूप महत्वाचे असतात. तसेच त्या प्रत्येकाला दिवसातून एक अंड खाण्याचा सल्ला देतात. त्या सांगतात की आपल्याला फक्त एका अंड्यातून भरपूर प्रोटीन मिळतात.

जीवनशैलीत बदल

महिलेने ही विशिष्ट प्रकारची चपाती खाऊन घटवलं ३२ kg वजन, रात्री 8 नंतर ‘या’ पदार्थाचं सेवन केलं पूर्णपणे बंद!

लॉकडाऊनमुळे आयुष्यातही बरेच बदल झाले असल्याचे मेहक सांगते. ती म्हणते की याच कारणामुळे तिने सामाजिक होणे आणि बाहेरचे जेवण खाणे पूर्णपणे बंद केले. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्या ज्ञानाचा खूप वापर केला आणि पोषक तत्वांचे प्रमाण लक्षात घेऊन वजन कमी केले. त्यांनी योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे (vitamins), खनिजे (minerals) आणि प्रथिने (protein) घेतले आणि आपले आरोग्य निरोगी ठेवले.

NOTE :- प्रत्येकाचे शरीर व त्याच्या गरजा या वेगवेगळ्या असतात त्यामुळे कोणतंही डाएट फॉलो करताना आधी आपल्या शरीराची गरज ओळखून घ्या, डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच वेट लॉस जर्नीची सुरुवात करा. दुस-या व्यक्तीचं डाएट फॉलो करताना काळजी बाळगा.

Source link