‘लडकी चाहीये, तुझे?…’ म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला महिलेकडून चपलेचा चोप

0
24

मुंबई  :  विरार  येथील  साईनाथनगर परिसरात  शिवसेना  विभाग प्रमुखाला एका महिलेनं चांगलाच चोप  दिला आहे.  शिवसेना विभागप्रमुखाचं नाव  जितू खाडे असून त्याला रिक्षातच एका महिलेनं चपलेनं चोपलं आहे. फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पीडित महिला जितू खाडेला रिक्षातच आयटम चाहीये? तुझे, असं म्हणत चपलेनं रिक्षातच मारायला सुरुवात करते आहे.  पीडित महिलेनं जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोन कॉल करुन, सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

दरम्यान, महिलेने जितू खाडे विरोधात विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला आहे. सध्या जितू खाडे फरार आहे. शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे  यांनी जितू खाडेच्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार, असं सांगितलं आहे.