पुण्यात “वर्क फ्रॉम होम” थांबले; आयटी क्षेत्राला मोठा फटका – प्रमोद परदेशी

 

पुणे, दि. 6 जून (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

करोना’चा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील बहुतेक कार्पोरेट आणि आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देऊन “वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगितले आहे. परंतु “निसर्ग’ चक्रीवादळामुळे “वर्क फ्रॉम होम ही थांबले. परवापासूनच वादळी वाऱ्याने शहराची अवस्था बिकट केली होती. विजेचे खांब, डीपी कोसळले होते. यामुळे सकाळपासूनच शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.

पर्यायाने लॅपटॉपची बॅटरी चालेपर्यंतच “वर्क फ्रॉम होम’ चालले आणि दुपारनंतर हळूहळू शटडाऊन होऊ लागले.

“करोना’मुळे आधीच आर्थिक संकटांशी झुंजत असलेल्या कंपन्यांचे काम थांबल्याने त्यांना अजूनच मोठा फटका बसला. विशेषत आयटी क्षेत्रातील केपीओ, बीपीओ आणि प्रोग्रामिंग कंपन्यांना अचानक काम थांबल्याने आर्थिक झळ सोसावी लागली. रात्री उशिरापर्यंत बऱ्याच भागात वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता, त्यामुळे दुसऱ्या शिफ्टचेही कामखोळंबले होते.

 

कोरोनाच्या वैशाविक महामारीमुळे पुण्यातील आयटी क्षेत्रातील केपीओ, बीपीओ आणि प्रोग्रामिंग कंपन्यांना खूप मोठा फटका बसला आहे, अनेक बड्या पगाराचे तरुण नौकरी पासून मुकले आहे. राज्याचे उद्योग मंत्रांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नमो ग्रुप फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद परदेशी यांनी केली. अन्यता कोरोना नंतर राज्यात बड्या पगारदार तरुणांचे आत्महत्या ही होऊ शकतात त्यामुळे राज्य शासनाने वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here