Monday, July 26, 2021
Homeक्रीडाWorld Social Media Day : 'या' क्रिकेटपटूंची सोशल मीडियावर सर्वात जास्त हवा,...

World Social Media Day : ‘या’ क्रिकेटपटूंची सोशल मीडियावर सर्वात जास्त हवा, एका फोटोवर मिळवतात लाखो Likes | This Cricketers Have Huge Fan following On Social Media lets have look on World Social Media Dayआजकालच्या लाईफस्टाईलमध्ये सोशल मीडियाचं महत्त्व इतकं वाढलं आहे की जगभरातील प्रत्येक गोष्टीची माहिती सोशल मीडियावर येते. कधी चूकीची माहिती पसरत असली तरी सोशल मीडियाचा वापर तिळभरही कमी होत नाही. त्यात आज World Social Media Day असल्याने सोशल मीडियावर धुमाकुळ घालणाऱ्या काही क्रिकेटपटूंची नावे जाणून घेऊया.

1/7

virat kohli

सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग म्हटलं तर सर्वात पहिलं नाव येत भारतीय कर्णधार विराट कोहलीचं (Virat Kohli). विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्क शर्मा त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतात मग ते लग्नाच्या फोटोपासून ते मुलीच्या नामकरणापर्यंत सर्व काही सोळ मीडियावर अपडेट करत असतात. सध्या
इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे तब्बल 131मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 42.6 मिलियन नेटकरी त्याला फॉलो करतात. तर कोहलीचा फेसबुकवर 46 मिलियन एवढा मोठा फोलोवर वर्ग आहे.

2/7

Rohit Sharma with ritika

विराटनंतर नंबर लागतो उपकर्णधार रोहित शर्मा याचा (Rohit Sharma). विराटप्रमाणेच रोहितदेखील सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. रोहित खासकरुन इन्स्टाग्रामवर अधिक अॅक्टिव्ह असतो. रोहितचे इन्स्टाग्रामवर 19.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर रोहितचे ट्विटर आणि फेसबुकवर 19 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

3/7

Hardik pandya

विराट आणि रोहित नंतर नंबर लागतो युवा अष्टपैलू क्रिकेटर हार्दीक पांड्याचा (Hardik Pandya). हार्दीक त्याची पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्य यांचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. ज्यांना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात. पांड्याचे इन्स्टाग्रामवर 18.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर 6.8 मिलियन लोक पांड्याला फॉलो करतात.

4/7

Chahal couple

पांड्याप्रमाणे युवा फिरकीपटू युझवेंद्र चहलही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि त्याचे फोटो आणि डान्सचे व्हिडीओ चाहत्यांना खास आवडतात. चहलचे इन्स्टाग्रामवर 6.6 मिलियन तर ट्विटरवर 2.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.

5/7

sachin t

क्रिकेटचे मैदान गाजवलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोशल मीडियाही चांगलाच गाजवतो. ट्विटरवर सचिनचे 35.6 मिलियन फॉलोअर्स असून इन्स्टाग्रामवर 29.6 मिलियन नेटकरी सचिनला फॉलो करतात. तसेच फेसबुकवरही सचिनते 27 मिलियन फॉलोवर्स आहेत.

6/7

virendra sehwag

सचिन सोबतच त्याचा मैदानावरील जोडीदार वीरेंद्र सेहवागचे (Virendra sehwag) ट्विटस आणि फेसबुक पोस्ट चांगल्याच व्हायरल होत असतात. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. ट्विटरवर सेहवागचे 21.9 मिलियन तर इन्स्टाग्रामवर 6.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

7/7

wasim jafar

माजी क्रिकेटपटू वसिम जाफरही (Wasim Jafar) सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. जाफर आपल्या रहस्यमयी कोडी असलेल्या ट्विट्सने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करतो. ट्विटरवर जाफरचे 416.7k इतके फॉलोअर्स असून इन्स्टाग्रामवर जाफरला 64.9k लोग फॉलो करतात.Source link

World Social Media Day : 'या' क्रिकेटपटूंची सोशल मीडियावर सर्वात जास्त हवा, एका फोटोवर मिळवतात लाखो Likes | This Cricketers Have Huge Fan following On Social Media lets have look on World Social Media Day
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News