Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाWTC पराभवानंतर भारतीय खेळाडू 3 आठवडे सुट्टीवर, माजी कर्णधार भडकला, म्हणतो, 'हा...

WTC पराभवानंतर भारतीय खेळाडू 3 आठवडे सुट्टीवर, माजी कर्णधार भडकला, म्हणतो, ‘हा कार्यक्रम बनवला कसा?’ | Former Indian Captain Dilip Wengsarkar Surprised Team India 20 Days Break After lost WTC Final 2021वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) गमावल्यानंतर भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल. इंग्लंडविरोधातल्या मालिकेअगोदर आपल्या कुटुंबासमवेत खेळाडू तीन आठवडे वेळ घालवू शकतील. (Dilip Wengsarkar Surprised Team India 20 Days Break After lost WTC Final 2021)

WTC पराभवानंतर भारतीय खेळाडू 3 आठवडे सुट्टीवर, माजी कर्णधार भडकला, म्हणतो, 'हा कार्यक्रम बनवला कसा?'

भारतीय संघ

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) गमावल्यानंतर भारतीय संघ आता तीन आठवड्यांच्या सुट्टीवर असेल. इंग्लंडविरोधातल्या मालिकेअगोदर आपल्या कुटुंबासमवेत भारतीय संघातील खेळाडू तीन आठवडे वेळ घालवू शकतील. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड (India vs England Test Series) यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याअगोदर तीन आठवड्यांचा आराम घेऊन खेळाडू 14 जुलै रोजी सरावासाठी परत एकत्र येतील. भारतीय संघाच्या या सगळ्या कार्यक्रमावर माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) भडकले आहेत. हा कार्यक्रम आखण्यापाठीमागचं कारण काय आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे.  (Former Indian Captain Dilip Wengsarkar Surprised Team India 20 Days Break After lost WTC Final 2021)

वेंगसरकर काय म्हणाले…?

“मला माहिती नाही हा कार्यक्रम कुणी आणि कशासाठी बनवलाय. आपण तीन आठवड्यांच्या सुट्टीवर जाणार आणि पुन्हा येऊन टेस्ट मॅच खेळणार…. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना पार पडल्यानंतर एक आठवड्यांची सुट्टी पुरेशी होती. तुम्हाला सातत्याने खेळण्याची गरज आहे. दररोज सरावाची आवश्यकता आहे. संघातील सहकाऱ्यांनी सराव करताना खेळातील उणिवा दूर करण्याची गरज आहे. तीन आठवड्याच्या सुट्टीच्या कार्यक्रमाला मंजुरी कशी मिळाली?, याचं मला आश्चर्य वाटतं”, असं वेंगसरकर म्हणाले.

“पाठीमागच्या दोन वर्षापासून भारतीय संघाने लाजवाब खेळ दाखवला पण ऐन मोक्याच्या क्षणी अंतिम सामन्यात भारतीय संघाला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलं. मला वाटतं भारतीय संघाची तयारी कमी पडली. संघाने अगोदर एक-दोन मॅचेस खेळायला हव्या होत्या. जसं विराट म्हणाला तसं  फलंदाजांनी रन्स करण्याचं धैर्य ठेवायला हवं तसंच मग जर मॅचपूर्वीच चांगली तयारी केली असती तर सामन्याला निकाल काही वेगळा पाहायला मिळाला असता”, असंही वेंगसरकर म्हणाले.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

(Former Indian Captain Dilip Wengsarkar Surprised Team India 20 Days Break After lost WTC Final 2021)

हे ही वाचा :

मोठी बातमी : T-20 वर्ल्ड कप भारतात होणार नाही, ‘या’ लोकप्रिय देशात ऑक्टोबरपासून थरार रंगणार!, पाहा शेड्यूल…

Photo : ऋषभ पंतच्या बहिणीची इन्स्टाग्रामवर हवा, फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस

WTC Final मधील पराभवानंतर सेहवागने पोस्ट केलं भन्नाट Meme, प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापुरमधील ‘तो’ डायलॉग केला शेअरSource link

WTC पराभवानंतर भारतीय खेळाडू 3 आठवडे सुट्टीवर, माजी कर्णधार भडकला, म्हणतो, 'हा कार्यक्रम बनवला कसा?' | Former Indian Captain Dilip Wengsarkar Surprised Team India 20 Days Break After lost WTC Final 2021
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News