Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाWTC Final : केन आणि विराटचा मिठी मारतानाच्या फोटोवर केनचा खुलासा, सांगितले...

WTC Final : केन आणि विराटचा मिठी मारतानाच्या फोटोवर केनचा खुलासा, सांगितले विराटला मिठी मारण्याचे कारण | Kane Williamson Revealed Why He huged Virat Kohli After WTC Finalन्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात भारताला आठ विकेट्सने पराभूत करत विजय मिळवला. या विजयासह भारताचा विश्वविजेता होण्याचं स्वप्नही न्यूझीलंडने तोडलं पण कर्णधार विल्यमसनच्या एक कृतीने सर्वांचीच मनं जिंकली होती.

WTC Final : केन आणि विराटचा मिठी मारतानाच्या फोटोवर केनचा खुलासा, सांगितले विराटला मिठी मारण्याचे कारण

केन आणि विराट मिठी मारताना

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात भारत पराभूत झाला आणि करोडो भारतीयांची मनं पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे तुटली. विराट कोहलीने (Virat Kohli) एखाद्या महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धेतील ट्रॉफी जिंकण्याचं चाहत्यांच स्वप्नही अधुरं राहिल. न्यूझीलंड संघाला कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) विजय मिळवून देत विश्वविजेता बनवलं. पण सामन्यानंतर केन आणि विराटकडून दाखवण्यात आलेल्या खेळाडू वृत्तीने सर्वांचीच मनं जिंकली होती. केनने पराभवानंतर विराटला मिठी मारतानाचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोवर आता केनने खुलासा केला असून जिंकल्यानंतर जल्लोष न करता विराटला मिठी मारत आनंद साजरा केल्याचे कारण सांगितले आहे (Kane Williamson Revealed Why He huged Virat Kohli After WTC Final)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याच्या आठवड्या भरानंतर केन विल्यमसनने विजयानंतर विराटला मिठी मारण्याचे कारण सांगितले आहे. क्रिकबझशी बोलताना केन म्हणाला, ”आम्ही जिंकलो तो आमच्यासाठी खूप खास श्रण होता. कारण भारतासोबत कोणत्याही सामन्यात जिंकण एक कठीण चॅलेंज असतं. सर्व क्रिकेट प्रकारात भारताचे क्रिकेट अप्रतिम असल्याने त्यांच्या विरुद्ध मिळवलेला विजय अत्यंत महत्त्वाचा होता. तसेच माझी आणि विराटची मैत्री ही अलीकडची नसून खूप जुनी आहे. अगदी अंडर 19 विश्वचषकापासून आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत असल्याने आमच्यातील मैत्री ही मैदानावरील क्रिकेट स्पर्धेपेक्षाही मोठी आहे.”

केनची एकाकी झुंज आणि न्यूझीलंडचा विजय

संपूर्ण सामन्यात जर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघातील फलंदाजापैकी कोणी सातत्यपूर्ण कमागिरी केली असेल तर ती न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने केली. केनने भारताविरुद्ध पहिल्या डावात सलामीची जोडी डेनन कॉनवे आणि टॉम लेथम बाद झाल्यानंतर एकाकी झुंज देत 49 धावा ठोकल्या. ज्यानंतर दुसऱ्या डावात सलामीचे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर रॉस टेलरसोबत मिळून केनने संयमी अर्धशतक (52) ठोकत न्यूझीलंडचा विजय पक्का केला.

हे ही वाचा –

WTC Final : भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटसह विल्यमसनही भावूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

WTC Final मधील खेळीमुळे जसप्रीतला मोठे नुकसान, अडीच वर्षानंतर ओढवली ‘ही’ परिस्थिती

ICC Test Rankings : न्यूझीलंड संघासह खेळाडूंची गरुडझेप, टॉप 10 मध्ये तीन भारतीय, ‘हा’ फलंदाज पहिल्या स्थानावर

(Kane Williamson Revealed Why He huged Virat Kohli After WTC Final)Source link

WTC Final : केन आणि विराटचा मिठी मारतानाच्या फोटोवर केनचा खुलासा, सांगितले विराटला मिठी मारण्याचे कारण | Kane Williamson Revealed Why He huged Virat Kohli After WTC Final
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News