Thursday, July 29, 2021
Homeक्रीडाWTC Final जिंकल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू भिडले, दोघांमध्ये घमासान, काय घडलं? | WTC...

WTC Final जिंकल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू भिडले, दोघांमध्ये घमासान, काय घडलं? | WTC 2021 winners Devon Conway and Colin de Grandhomme play against each other in T20 Blast, Who won The Battle



न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकला (WTC Final). पण या अतुलनीय विजयानंतर त्यांचे दोन खेळाडू एकमेकांशी भिडले आहेत.

WTC Final जिंकल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू भिडले, दोघांमध्ये घमासान, काय घडलं?

Devon Conway Vs Colin de Grandhomme

लंडन : न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकला (WTC Final). पण या अतुलनीय विजयानंतर त्यांचे दोन खेळाडू एकमेकांशी भिडले. दोन खेळाडूंमधली ही चकमक क्रिकेटच्या मैदानावर घडली. दोघांमधली लढाई बराच वेळ सुरु होती, जवळजवळ 3 तासांपेक्षा जास्त. असा काय राडा झाला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, परंतु तुम्ही समजताय तसा राडा किंवा भांडण झालेलं नसून न्यूझीलंडचे दोन खेळाडू क्रिकेटच्या सामन्यात एकमेकांविरोधात भिडले. यावेळी न्यूझीलंडचे खेळाडू डेव्हन कॉनवे (Devon Conway) आणि कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. (WTC 2021 winners Devon Conway and Colin de Grandhomme play against each other in T20 Blast, Who won The Battle)

WTC Final जिंकल्यानंतर न्यूझीलंडचे काही खेळाडू आपल्या देशात परतले, तर बर्‍याच जणांनी इंग्लंडमध्येच राहून टी -20 ब्लास्टमध्ये खेळायचे ठरवले. यातील दोन कीवी खेळाडू डेव्हन कॉनवे आणि ग्रँडहोम दोन वेगवेगळ्या संघांमधून एकमेकांविरूद्ध खेळताना दिसले. सामना सोमरसेट विरुद्ध हॅम्पशायरमध्ये (Somerset vs Hampshire) खेळवण्यात आला. ज्यात डेव्हन कॉनवे सोमरसेटच्या टीमचा आणि ग्रँडहोम हॅम्पशायरचा भाग होता. या सामन्याच्या माध्यमातून या दोन्ही किवी खेळाडूंनी टी – 20 ब्लास्टमध्येही पदार्पण केले.

दोन किवी खेळाडू भिडल्यानंतर काय घडलं?

या सामन्यात सोमरसेटने हॅम्पशायरचा 7 धावांनी पराभव केला. पण, न्यूझीलंडच्या या दोन खेळाडूंच्या टक्करीत कोण जिंकलं हे जाणून घ्या. सोमरसेटने प्रथम फलंदाजी केली म्हणजे कोनवेने आधी फलंदाजी केली. त्याला सलामीला संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत तो पहिली विकेट गेल्यानंतर फलंदाजीसाठी आला. परंतु कॉनवेला फारसे काही करता आले नाही. 4 चेंडूत एका चौकारासह 5 धावा काढून तो बाद झाला. त्याची विकेट त्याचाच साथीदार ग्रँडहोमने घेतली. याचाच अर्थ या दोन खेळाडूंमधली लढतीत ग्रँडहोम जिंकला.

ग्रँडहोमविरोधात कॉनवे पराभूत

या सामन्यात ग्रँडहॉमेने 2 गडी बाद केले, ज्यात एक विकेट डेव्हन कॉनवेची होती. दुसऱ्या बाजूला ग्रँडहोमने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने 34 चेंडूत 66 धावा फटकावल्या, ज्यामध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तथापि, ग्रँडहोमच्या प्रयत्नांनंतरही हॅम्पशायरला विजय मिळवता आला नाही. सामन्यात जरी कॉनवेचा संघ जिंकला तरी T20 ब्लास्ट मधील परफॉर्मन्सच्या बाबतीत ग्रँडहोम जिंकला आहे.

इतर बातमया

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचं वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

IND vs SL : कुरवीला आणि मोहंती टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Tokyo Olympics पूर्वी भारताला झटका, सर्वोत्कृष्ट धावपटूला दुखापत

(WTC 2021 winners Devon Conway and Colin de Grandhomme play against each other in T20 Blast, Who won The Battle)



Source link

WTC Final जिंकल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू भिडले, दोघांमध्ये घमासान, काय घडलं? | WTC 2021 winners Devon Conway and Colin de Grandhomme play against each other in T20 Blast, Who won The Battle
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News