Tuesday, June 22, 2021
Homeमनोरंजनट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

यामी गौतम (yami gautam) या प्रसिद्ध अभिनेत्रीचा अलीकडेच ४ जून रोजी विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नाच्या दिवशी या अभिनेत्रीने लालभडक रंगाची साडी परिधान केली होती. या लालेलाल साडीमध्ये यामी एखाद्या अप्सरे प्रमाणे सुंदर दिसत होती. इतर वेळी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वधूची भूमिका साकारताना लेहेंगा परिधान करुन दिसणारी यामी तिच्या लग्नात मात्र लक्ष वेधून घेणा-या व मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या लाल रंगाच्या साडीत दिसून आली. मनमोहक असा साज श्रुंगार, भरजरी अलंकारांसोबतच चंदेरी व डायमंडचा काठ असलेली चुनरी तिने डोक्यावर घेतली होती.

चित्रपट लेखक व दिग्दर्शक आदित्य धर (aditya dhar) देखील आपल्या वधूबरोबर खूपच आकर्षक दिसत होते. यामी इतर वधूंपेक्षा खूपच साधी तयार झालेली असूनही खुपच आकर्षक दिसत होती त्यामुळे अनेक चाहत्यांना तिच्या या सुंदरतेमागील सिक्रेट जाणून घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी खास यामीचे ब्युटी सिक्रेट्स!

खरोखर नवरी बनली यामी

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

केसांत रुंद बिंदी, सुंदर व लक्ष वेधून घेणारी लालभडक साडी आणि हातात नववधूचा चुडा घातलेली यामी गौतम खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चमकदार त्वचेची लाली लाल रंगाच्या साडीने आणखीनच वाढवली आहे. यामी गौतम हिमाचलमधील एका छोट्या गावात राहणारी आहे. तिचा साधेपणा तिच्या चेह-यावर झळकताना दिसून येतो. सोबतच डोंगराळ भागातील तो गुलाबी रंगाचा नूर देखील दिसतो, ज्याला तिने मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनातही राखून ठेवली आहे.

(वाचा :- अभिनेत्रीने पारदर्शक ड्रेस घालून बोल्ड व हॉट लुकमधील फोटो केले शेअर, पण मेकअपमुळे बिघडली स्टाइल)

इथे दडलंय सुंदरतेचं रहस्य

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

तुम्हाला सांगू इच्छितो की यामी तिचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आजीच्या बटव्यातील घरगुती उपचारांचा अवलंब करते. यामी स्वयंपाकघरातील नैसर्गिक पदार्थांच्या वापराने सौंदर्य वाढवते. साजूक तूपापासून हळदीपर्यंत तिच्या स्किन केअर रिजीममध्ये (Skin Care Home Remedies) सर्व काही नैसर्गिक असतं. यामी गौतम म्हणते की सुंदर आणि गुलाबी ओठांसाठी साजूक तूप नेहमीच एक प्रभावी आणि उत्कृष्ट उपाय आहे. म्हणूनच मी नेहमी माझ्या ओठांवर साजूक तूप लावते.

(वाचा :- सर्वच कलाकारांच्या सौंदर्याचं ओपन सिक्रेट आहे ‘ही’ कॅप्सूल, स्त्रिया-पुरुष दोन्ही गट करतात भरपूर वापर!)

यामीच्या घनदाट व चमकदार केसांचे सिक्रेट

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

यामीचे केस फार लांब नाहीत पण ते खूप जाड आणि चमकदार आहेत. आपल्या या जाड आणि चमकदार केसांसाठी यामी दररोज सकाळी तेलाने मसाज करते. यासोबतच ती स्किन ग्लोइंग आणि ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहावं म्हणून योग करून आपल्या दिवसाची सुरुवात करते. सोशल मीडिया पोस्टमध्ये यामी अनेकदा तिच्या केसांची निगा आणि त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्सचा उल्लेख करते, ज्यात ती विशेषत: घरगुती वस्तू वापरण्यास प्राधान्य देते.

ग्लोइंग स्किनमागील न उलगडलेलं रहस्य

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

यामीच्या स्किन केअर रुटिन मध्ये मध, गुलाब पाणी, ग्लिसरीन आणि लिंबू या पदार्थांचा समावेश आहे. ती हे सर्व साहित्य एकत्र करुन फेसपॅक बनवते जो द्रव स्वरूपातील एक नैसर्गिक फेसपॅक असतो. यामीच्या चिरतरुण व ग्लोइंग स्किनमागील सर्वात मोठे रहस्य म्हणजे हा लिक्विड फेस पॅक होय. कारण मध त्यांच्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो. म्हणजेच यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. लिंबू त्वचेचे सर्व विकार दूर करते आणि एक्ने व मुरुमांसारखी कोणतीही समस्या डोके वर काढू देत नाही. मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेच्या आत जाऊन खराब झालेल्या पेशींना बरे करण्याचे काम करते. तसेच त्वचेतील नवीन पेशींमध्ये वाढ करते. म्हणूनच यामीचा चेहरा सूर्यासारखा चमकत राहतो.

फेसपॅक लावण्याआधीची काळजी

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

यामी म्हणते की ती चेह-यावर फेस पॅक लावण्यापूर्वी आपली त्वचा एक्सफोलिएट करते. यासाठी देखील ती पूर्णपणे घरगुती उपायांचाच वापर करते. यामी तांदूळ बारीक वाटून घेऊन त्याची पावडर बनवते आणि ही पावडर दही किंवा दुधात मिसळून त्याची पेस्ट तयार करते. यानंतर ती या पेस्टने आपला चेहरा साफ करते. या नैसर्गिक स्क्रबरच्या सहाय्याने चेह-यावरील सर्व डेड स्किन निघून जाते. यामुळे यंग व फ्रेश पेशी बाहेर पडतात आणि यामीचा लूक अधिक आकर्षक दिसू लागतो.

नारळ पाण्याचाही सौंदर्यात मोठा वाटा

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी गौतम दररोज नारळ पाण्याने फेशियल करते. जेणेकरून त्वचा एकदम ताजी आणि चमकदार राहावी आणि खरोखरंच त्याचा प्रभाव यमीच्या त्वचेवर देखील दिसून येतो. कारण ती नेहमीच ताजीतवानी आणि एनर्जेटिक दिसून येते.

वयानुसार सौंदर्याची घ्यावी अशी काळजी

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

सहसा 25 व्या वयाच्या नंतर प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यावर फाइन लाइन्स, एजिंग लाइन्स किंवा फॅट लाइन्स दिसू लागतात. पण यामीची त्वचा अतिशय डाग विरहीत आणि मऊशार आहे. कदाचित याचे कारण म्हणजे यामी तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारातील उत्पादनांवर अवलंबून नसून घरगुती उपायांवर जास्त विश्वास ठेवते. बेसन आणि हळदीच्या फेसपॅकपासून फ्रूट फेशियलपर्यंत ती चमकदार त्वचेसाठी आपल्या आजीने आणि आईने सांगितलेले घरगुती उपाय करण्यावरच भर देते.

शूटसाठी यामी अनेकदा बनली नवरी

ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा!

प्रत्येक अभिनेत्री प्रमाणे यामीही तिच्या ख-या जीवनातील लग्नाआधी अनेक वेळा चित्रपटांच्या शूटिंगसाठी एखाद्या नवरीप्रमाणे सजली आहे. मग ती ‘बाला’ चित्रपटामध्ये वधू बनलेली यामी गौतम असो वा ‘गिन्नी वेड्स सनी’ मध्ये खुलून दिसलेली नवरी असो. ती प्रत्येक वेळी खूप सुंदर दिसली आहे आणि ब-याचदा तिच्या मनमोहक सौंदर्यावरून डोळे नजर हटवणं मुश्किल झालं आहे.

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News

Shasannama News

FREE
VIEW