पुण्यात तरुणाचा मैत्रिणीवर बलात्कार; घटनेचा अश्लील VIDEO शाळेच्या ग्रुपवर केला व्हायरल

0
47

पुणे, 28 जून: पुण्यातील एका तरुणानं आपल्या वर्गमैत्रिणीवर बलात्कार (Man raped School female friend) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी तरुण एवढ्यावरचं थांबला नाही. तर त्यानं बलात्कार करतानाचा व्हिडीओ बनवून (Shoot obscene video) तो व्हिडीओ शाळेच्या ग्रुपमध्ये व्हायरल (shared in whatsapp group) केला आहे. संबंधित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतप पीडित तरुणीनं पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अवघ्या चोवीस तासांत अटक (Accused Arrest) केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

उमेश असुलाल डांगी (वय-41) असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो आंबेगाव पठार येथील शिल्पतारा सोसायटीतील रहिवासी आहे. पीडित तरुणी आणि आरोपी उमेश डांगी या दोघांनी एकाच शाळेत शिक्षण घेतलं आहेत. काही दिवसांपूर्ण शाळा प्रशासनानं शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी शाळेचे सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले होते. दरम्यान काहीजणानं सर्वांचे मोबाईल नंबर घेऊन शाळेचा एक ग्रुप तयार केला होता.

या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आरोपीची पीडितेशी पुन्हा ओळख झाली होती. यानंतर आरोपीनं व्हॉटसअॅप वर पीडितेशी संपर्क साधला. तरुणीला कुटुंबाचा फारसा आर्थिक आधार नाही. याचा फायदा उचलत आरोपीनं तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यातून दोघांत पुन्हा मैत्री झाली. त्या

सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीनं तरुणी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. यानंतर आरोपीनं विकृत मानसिकतेतून संबंधित अश्लील व्हिडीओ शाळेच्या ग्रुपवर देखील शेअर केला. यामुळे पीडितेची मित्र परिवारात मोठी बदनामी झाली. आपला व्हिडीओ व्हायरल झाल्याचं लक्षात येताच पीडीतेनं 25 जून रोजी आरोपी उमेश डांगी विरुद्ध सहकानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा तपास सुरू आहे.

Source link