पोलिसांना खुल्या दारु विक्रीचा व्हिडिओ पाठवला; तरुणावर प्राणघातक हल्ला

0
27
सोलापूर: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 
गावात सार्वजनिक रस्त्यावर बसून दारु विक्री करणाऱ्या इसमाचा व्हिडीओ पोलिसांना पाठवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. दारु विक्रीचा व्हिडीओ का पाठवला म्हणून संबंधित गावगुंडाने त्या तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. सदरची घटना सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या सय्यद वरवडे गावात घडली आहे.

या घटनेतील जखमी युवकाला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे. पुणे-विजयपूर बायपास महामार्गावर सय्यद वरवडे येथे गावातील कुमार पारवे नावाचा गावगुंड कडक लॉकडाऊन असतानाही सार्वजनिक रस्त्यावर बसून दारू विक्री करत होता. त्याचा स्थानिकांना त्रास होत होता. गावातल्या महिला-मुलींच्या समोरच तळीराम अर्वाच्च शिवीगाळ करत होते. याबाबत दारु विक्रेत्याला वारंवार कल्पना दिली असता. तो या गावात आपल्याला कोणीच रोखणार नसल्याचा दावा करुन कोणालाच जुमानत नव्हता.

कुमारचा भाऊ उमेश हा दिवसाढवळ्या दारु विकत असल्याचा व्हिडीओ गावातील समीर मुजावर या तरुणाने मोहोळ पोलिस स्टेशनला पाठवला. त्यामुळं या अवैध दारु अड्ड्यावर धाड टाकली. त्याचा राग मनात धरून समीर मुजावर या तरुणावर सोमवारी रात्री ८.३० वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला कुमार पारवे आणि अक्षय पारवे या दोघांनी केल्याची माहिती जखमी तरुण समीर मुजावर याने दिली आहे. गंभीर जखमी असेलेल्या समीरवर सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सोलापूर शहर पोलीस चौकीत गुन्ह्याची नोंद झाली असून सदरचा गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

Source link