Sunday, July 25, 2021
Homeदेश-विदेशZydus Cadila's ZyCoV-D Vaccine Will Be Given Without Injection; Awaiting DCGI Approval

Zydus Cadila’s ZyCoV-D Vaccine Will Be Given Without Injection; Awaiting DCGI Approval


नवी दिल्ली : स्वदेशी कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीने कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे परवानगी मागितली आहे. कंपनीने म्हटले आहे की आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांमध्ये कोविड -19 लससाठी क्लिनिकल ट्रायल केलं आहे. 

झायडस कॅडिला यांनी म्हटले की, कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे. कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शरविल पटेल यांना असा दावा केला की या लसीला मंजुरी मिळाली तर यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होईल.

ZyCoV-D लस इंजेक्शनशिवाय इंजेक्शन दिली जाईल

बंगळुरूस्थित औषधनिर्माण कंपनी झायडस कॅडिलाने दिलेल्या माहितीनुसार, ही लस इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे दिली जाईल. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल. या लसीला मंजुरी मिळाली तर कोरोनाला रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल आणि देशातील पाचवी उपलब्ध लस असेल.

युरोपियन युनियनमधील भारताच्या डिप्लोमसीला यश, 8 देशांकडून कोविशील्डला हिरवा कंदील

तीन डोसची लस

डीएनए-प्लाज्मिड आधारित ‘झायकॉव्ह-डी’ लसचे तीन डोस असतील. लस दोन ते चार डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येते आणि कोल्ड चेनची आवश्यकता नसते. याद्वारे त्याची खेप सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकते. बायोटेक्नॉलॉजी विभागांतर्गत बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या (बीआयआरएसी) नॅशनल बायोफार्मा मिशन (एनबीएम) यांनी लसीला पाठिंबा दर्शविला आहे.

Covaxin : अल्फा, डेल्टा व्हेरियंटवरही कोवॅक्सिन प्रभावी; अमेरिकन आरोग्य संशोधन संस्थेची पुष्टी

तिसरा टप्पा चाचणी पूर्ण झाली

झायडस कॅडिला लसची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. ही चाचणी 28,000 हून अधिक व्हॉलिन्टियर्सवर केली गेली आहे. क्लिनिकल ट्रायलमधून दिसून आलं आहे की लस मुलांसाठीही सुरक्षित आहे. कंपनीने ट्रायल डेटा डीसीजीआयला पाठवला आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर 12 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते.Source link

Zydus Cadila's ZyCoV-D Vaccine Will Be Given Without Injection; Awaiting DCGI Approval
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News