Home महाराष्ट्र उमरेड विधानसभेतील रस्त्यांकरीता ५५ कोटी रूपये मंजूर; माजी आमदार सुधीर पारवेंच्या प्रयत्न फळाला : प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

उमरेड विधानसभेतील रस्त्यांकरीता ५५ कोटी रूपये मंजूर; माजी आमदार सुधीर पारवेंच्या प्रयत्न फळाला : प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

0
उमरेड विधानसभेतील रस्त्यांकरीता ५५ कोटी रूपये मंजूर; माजी आमदार सुधीर पारवेंच्या प्रयत्न फळाला : प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

नागपूर (विशेष प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

उमरेड विधानसभा क्षेत्राअंतर्गत उमरेड, कुही, भिवापूर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली असतांना मागील तिन वर्षापासून निधीचा पत्ता नव्हता. मात्र राज्यात सत्तांतर होताच, माजी आ. सुधीर पारवे यांनी संधीचे सोने करत, उमरेड विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यांकरीता तब्बल ५४ कोटी ५८ लक्ष ५७ हजार रूपयांचा निधी खेचून आणला आहे. महत्वाचे म्हणजे पारवे हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असल्यामुळे त्याचाही फायदा उमरेड क्षेत्राला झाल्याचे बोलल्या जात आहे.

उमरेड क्षेत्रातील रस्त्यांची दैनावस्था लक्षात घेता, माजी आ. सुधीर पारवे यांनी केंद्र शासन व राज्यशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा चालविला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे देखील पत्रप्रपंच करीत, मागील तिन वर्षापासून दुर्लक्षीत असलेल्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर, कुही तालुक्यातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीकरीता भरीव निधीची मागणी केली होती. याची दखल घेत, शासनाने प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेअंतर्गत ३७ कोटी, ५४ लक्ष ४४ हजार रूपयाचा निधी मंजूर केला. तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्हा वार्षीक योजनेतून १७ कोटी ४ लक्ष १३ हजार रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील अनेक रस्त्यांचा कायापालट होणार आहे. उमरेड क्षेत्रातील रस्तेविकासाकरीता भरिव निधी खेचून आणल्याबद्दल माजी आ. सुधीर पारवे यांचे कार्यकर्त्यांनी आभार माणले. यावेळी भाजपचे उमरेड शहर अध्यक्ष दिलीप सोनटक्के, भाजपचे भिवापूर तालुका अध्यक्ष केशव ब्रम्हे, उमरेड तालुका कार्यध्यक्ष राजकुमार कोहपरे, कुही तालुका अध्यक्ष सुनील जुवार, रूपचंद कडू, वसंता पंधरे, दादाराव मुटकुरे, सतिष चौधरी, निलेश चव्हाण, निखील येळणे, राजकुमार राऊत, नंदू मानकर, विवेक ठाकरे, अविनाश चिमुरकर, आनंद गुप्ता, तूषार ढोरे, मनोज दांदडे, अभिनव गोलघाटे, गिरीष लेंडे, दिलीप पौणीकर, महेश दिवसे, हिमांशू अग्रवाल, धनंजय चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ३७ कोटीच्या निधीतून होणार ही कामे

प्रधानमंञी ग्रामसडक योजनेअंतर्गत ३७ कोटी, ५४ लक्ष ४४ हजार रूपये निधी मंजूर झाला असुन त्यातून उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी- आपतूर-अकोला या ४.८७ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ४१६. ८२७ लक्ष रूपये निधी, उमरेड – पिराया – आंबोली – देणी वानोडा – कऱ्हान्डला – तिरखुरा या ८.०५ कि.मी. रस्ता डांबरीकरणासाठी ७५४.६७४ लक्ष रूपये, भिवापूर तालुक्यातील वडध – मेढा – पांढरवाणी – मल्लारपूर – धापर्ला (डोये) – सालेभट्टी (चोरविरा) या ८.८५ कि.मी. रस्ता डांबरीकरणासाठी ८८२.९४२ लक्ष रूपये, कुही तालुक्यातील देवळी खुर्सापार – आमटी – बोरी – हरदोली (नाईक) या ६.९१ कि.मी. रस्ता डांबरीकरण करणासाठी ६१९.८५७ लक्ष रूपये, माजरी – चन्ना – बोचली या ४.७१ कि.मी. रस्ता डांबरीकरणासाठी ३७४.६७१ लक्ष रूपये, पचखेडी- मदनापूर – केसोरी – चन्ना- पोहरा या ९.०७ कि.मी. रस्ता डांबरीकरणासाठी ७०५.४७५ लक्ष रूपये निधी मंजूर झाला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत १७ कोटीच्या निधीतून होणार ही कामे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्हा वार्षीक योजनेतून १७ कोटी ४ लक्ष १३ हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला असुन या निधीतून भिवापूर तालुक्यातील नांद – धामणगाव – बेल्लारपार – उरकुडापार या ६.४०० कि.मी. रस्ता डांबरीकरणासाठी ४३२.७७ लक्ष रूपये, उमरेड तालुक्यातील फुकेश्वर – कच्छीमेट – वध या ७.७१० कि.मी. रस्ता डांबरीकरणासाठी ४२६.३४ लक्ष रूपये, कुही तालुक्यातील कुही- चनोडा – भामेवाडा – तितूर- कुचाडी – कळमना या ११.९०० कि.मी. रस्ता डांबरीकरणासाठी ८४५.०२ लक्ष रूपये निधी मंजूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here