Home सरकारी योजना <strong>Maharashtra Kanya Van Samrudhhi Yojana 2023 | महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना</strong>

Maharashtra Kanya Van Samrudhhi Yojana 2023 | महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना

0
<strong>Maharashtra Kanya Van Samrudhhi Yojana 2023 | महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना</strong>

महाराष्ट्र शासनाने या सर्व महत्वाच्या बाबी विचारात घेऊन निसर्ग संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी या अभियाना मध्ये सहभाग करावा यासाठी हि कन्या वन समृद्धी योजना आहे, या योजनेचे धेय्य आहे राज्यात असलेल्या वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली यावे, सध्याचे राज्यात 20 टक्के असलेले वनक्षेत्र राष्ट्रीय वननीतीनुसार 33 टक्क्यांनी वाढावे, कन्या वन समृद्धी योजना याच विचारातून निर्माण झाली आहे, या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुलीचा जन्म होईल त्या शेतकरी दांम्पत्याला वन विभागाकडून दहा वृक्षांची रोपे देण्यात येणार आहे ज्यामध्ये पाच सागाची तर पाच फळझाडाची रोपे प्रोत्साहनपर दिली जाणार आहे.

या योजनेच्या अंतर्गत वन विभागाचा संकल्प आहे कि ज्या शेतकरी दांम्पत्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल, तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतामध्ये तसेच शेताच्या बांधावर दहा वृक्षांची लागवड करणे. यामध्ये 5 सागाच्या रोपांशिवाय फळझाडाच्या रोपांमध्ये 2 रोपे आंबा, 1 फणसाचे रोप, 1 जांभळाचे रोप आणि 1 चिंचेचे रोप अशा पद्धतीने वुक्षांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना 2023 वैशिष्ट्ये (Features)

आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक ग्रामीणभागात राहतात आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आहे, ग्रामीणभागात मोठयाप्रमाणात नागरिकांची उपजीविका शेतीवरच असते, शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर बरीच जागा उपलब्ध असते त्या शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड होऊ शकते त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खाजगी पडीक जमिनीवर सुद्धा वृक्ष लागवड होऊ शकते आणि तसेच शेतकऱ्यांच्या घरांच्या आजूबाजूला बरीच रिकामी जागा उपलब्ध असते ज्यामध्ये वृक्ष लागवड होऊ शकते.

कन्या वन समृद्धी योजना 2023 

राज्यामध्ये भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली आणण्यासाठी वन विभागाकडून विविध योजना नियमितपणे राबविण्यात येत आहे, या योजनांचे वैशिष्ट म्हणजे या योजनांच्या माध्यमातून सध्याचे महत्वाचे प्रश्न म्हणजे लोकसंख्या वाढ आणि स्त्री भ्रूणहत्या या अत्यंत महत्वाच्या विषयांवर सामाजिक जनजागृती करणे, यासाठी या योजनांमध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग असावा त्यामुळे या योजनांची निर्मिती सामान्य नागरिकांच्या सामाजिक गरजांचे भान ठेवून केल्या जाते.

वाढत्या प्रदूषणाचा विचार करता पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सर्व वर्गांचा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहभाग होऊन त्या माध्यमाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे शासनाला या योजनेच्या अंतर्गत अपेक्षित आहे. या सर्व बाबींचा विचार करून कन्या वन समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे.

जागतिक तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे पर्यावरणामध्ये झालेले मोठे बदल त्यामुळे ऋतूचक्रांवर मोठा परिणाम झाला आहे यामुळे पावसाळा अनिश्चित झाला आहे, गारपीट, वादळ, अतिवृष्टी, महापूर अशा अनेक नैसर्गिक संकटांमध्ये मोठयाप्रमाणात वाढ झाली आह, वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणजे मोठ्याप्रमाणात वृक्ष लावणे, कन्या वन समृद्धी योजनेच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात वृक्षांची लागवड करणे हे शासनाच्या वन विभागाचे उद्दिष्ट आहे.

कन्या वन समृद्धी योजनेचे हे वैशिष्ट कि वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांकडे पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत विकसित होऊ शकतो, या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या जन्माबरोबरच वृक्षांची लागवड केल्यास जशी जशी मुलगी मोठी होईल तसे वृक्ष सुद्धा मोठे होतील आणि मुलीच्या लग्नापर्यंत या वृक्षांना फळे येण्यास सुरुवात होईल, याचा अर्थ असा कि यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत विकसित होऊ शकेल, त्याचप्रमाणे सागाच्या वृक्षांपासून मिळणारे उत्पन्न मुलीच्या भविष्यासाठी खर्च करता येईल.

या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला मुलीच्या जन्माबरोबर वृक्षांची दहा रोपे मिळाल्यामुळे, आपल्या नावाने वृक्ष लागल्या मुळे वृक्षांच्या विषयी आवड निर्माण होणे, भावी पिढीमध्ये पर्यावरण, वृक्ष लागवड, वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि निसर्गाविषयी भावी पिढीत आवड निर्माण होईल तसेच महिलांचे सक्षमीकरण आणि सबळीकरणचा सामाजिक संदेश यातून दिला जाईल.

कन्या वन समृद्धी योजना Key Highlights

योजनेचे नावकन्या वन समृद्धी योजना महाराष्ट्र
व्दारा सुरुमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्याचे शेतकरी
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
राज्यमहाराष्ट्र
उद्देश्यमहिलांच्या सशक्तीकरणा बरोबरच निसर्गाची सुद्धा सुरक्षा व्हावी आणि समृद्धी होण्यासाठी
वर्ष2023
विभागमहाराष्ट्र वन विभाग

महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना उद्दिष्ट

कन्या वन समृद्धी योजना 2023 अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे कि शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे त्याचबरोबर हे निश्चित करणे कि वृक्ष लागवडीतून भविष्यात होणारे उत्पन्न मुलीच्या भविष्यासाठी खर्च करण्यात येईल. याचा अर्थ असा या योजनेच्या अंतर्गत महिलांचे सशक्तीकरण आणि सबळीकरण करण्याचा शासनाचा उद्देश आहे, तसेच या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये सध्याचे 20 टक्के असलेले वनक्षेत्र वन विभागाच्या अंतर्गत 33 टक्के वाढविण्याचा शासनाचा उद्देश आहे. कन्या वन समृद्धी योजनेचा उद्देश आहे भावी पिढीसाठी सुरक्षित पर्यावरणाचा निर्माण करणे तसेच भावी पिढीमध्ये वृक्षांप्रती आवड निर्माण करणे त्यामुळे वृक्ष जगण्याचे प्रमाण वाढेल, तसेच भावी पिढीमध्ये पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन हि भावना निर्माण करणे.

  • महाराष्ट्र राज्यातील वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेत्तर क्षेत्र वनाखाली आणणे
  • ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दांम्पत्याला 10 रोपे विनामुल्य देऊन प्रोत्साहित करणे
  • पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादी बाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे
  • अशा योजनांच्या माध्यमातून मुलगा व मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबळीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे, तसेच अशा योजनांच्या माध्यमातून मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण प्राप्त करणे. 

महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना अंमलबजावणी प्रक्रिया

  • कन्या वन समृद्धी योजना या योजनेच्या लाभ मिळविण्यासाठी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या शेतकरी पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत मध्ये जाऊन मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत मध्ये जाऊन विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा,
  • ज्या शेतकरी दांम्पत्यास मुलगी होईल त्या शेतकरी दांम्पत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत 10 वृक्ष लावण्याची संमती विहित नमुन्यातील अर्जात दर्शवावी.
  • अर्जामध्ये मुलीचे संपूर्ण नाव, पालकाचे संपूर्ण नाव, संपर्कासाठी संपूर्ण पत्ता व आधार कार्ड क्रमांक इत्यादीचा उल्लेख करावा.
  • मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यापूर्वी 10 खड्डे खोदून तयार ठेवावे.
  • जवळच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून 10 रोपे विनामूल्य ग्रामपंचायतीमार्फात दिली जातील, त्यामध्ये 5 रोपे सागाची, 2 रोपे आंबा, 1 फणस, 1 जांभूळ आणि एक चिंच इत्यादी भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असेल.
  • शेतकऱ्याने 10 वृक्षांची लागवड पूर्ण केल्यावर, लागवड केलेल्या जागेचा तपशील आणि लागवड केलेल्या रोपांचे फोटो शेतकऱ्याने संबंधित ग्रामपंचायतीमध्ये जमा करणे आवश्यक असेल. हि सर्व माहिती ग्रामपंचायतव्दारे एकत्रित करून तालुका स्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांना दरवर्षी 31 जुलै पर्यंत पाठविली जाईल.
  • या योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीच्या कौशल्य वकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या एैच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहील.
  • या योजनेंतर्गत लागवड केलेल्या झाडांची निगा, संरक्षण, संगोपन आणि झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण उच्च राहावे याकरिता शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला सामाजिक विभागामार्फात देण्यात येईल, संबंधित शेतकऱ्यांनी दरवर्षी दि. 31 मे रोजी वृक्ष जिवंत असल्याच्या प्रमाणाबाबत ग्रामपंचायतीस माहिती द्यावी. ग्रामपंचायतींनी त्या संदर्भातील नोंद योग्य त्या रजिस्टर मध्ये ठेवावी. तसेच दरवर्षी दिनांक 30 जून पर्यंत वृक्ष जिवंत राहण्याच्या प्रमाणाबाबत एकत्रित माहिती ग्रामपंचायतींनी तयार करून संबंधित तालुक्याचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांना पाठवावी.
  • या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये जास्तीत जास्त दोन मुली जन्माला येतील आणि त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल व त्यांच्याचपुरतीच मर्यादित असेल, म्हणजे 1 मुलगा किंवा 1 मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल

ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील उपलब्ध जागेत किमान 10 वृक्ष लावावेत, यासंदर्भात ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतील, शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आल्याबद्दल ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी संबंधित शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन अभिनंदन करतील. मुलीच्या जन्माच्या नोंदीच्या वेळी ‘’कन्या वन समृद्धी’’ योजनेबाबत संपूर्ण माहिती, अर्ज करणे, वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि प्रत्यक्ष वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे संगोपन करणे इत्यादी माहिती ग्रामपंचायतीव्दारे संबंधित शेतकरी कुटुंबास सविस्तरपणे सांगण्यात येईल.

कन्या वन समृद्धी योजना रोप वाटण्याची प्रक्रिया

मागील वर्षीचा दिनांक 1 एप्रिल ते चालू वर्षाचे 31 मार्च हे वर्ष गृहीत धरून प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये किती शेतकरी कुटुंबामध्ये मुलींचा जन्म झाला त्याची माहिती संबंधित ग्रामपंचायतीने तयार करावी. संबंधित तालुक्याचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी दिनांक 31 मे पर्यंत माहिती ग्रामपंचायतीकडून घेऊन संकलन करावी, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी नजीकच्या रोपवाटिकेतून प्रत्येक ग्रामपंचायतींना रोपांची उपलब्धता दि. 30 जून पर्यंत करावी.

कन्या वन समृद्धी योजना 2022

ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे, त्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायती मार्फत 1 जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप करावे. संबंधित शेतकऱ्याने या योजनेच्या अनुषंगाने नमूद केल्याप्रमाणे लागवड केलेल्या ठिकाणाचे तपशील व रोपांचे फोटो संबंधित शेतकऱ्या मार्फत ग्रामपंचायतीस सादर केले जातील. हि माहिती ग्रामपंचायतींनी एकत्रित करून तालुका स्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांना दरवर्षी दि. 31 जुलै पर्यंत पाठविली जाईल.

कन्या वन समृद्धी योजना रोपांची उपलब्धता :-

सामजिक वनीकरण विभागाकडून एमजी-नरेगा अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या रोपवाटिकांमधून या योजनेसाठी लागणारी रोपे प्रामुख्याने उपलब्ध करून देण्यात येतील. 

महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना अर्ज करण्याची पद्धत

शेतकरी कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेताच्या बांधावर दहा वृक्षांची लागवड करणे हा संकल्प ठेवून महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या मध्यामाने हि योजना शासनाने राबविण्याचे ठरविले आहे, ज्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबात मुलगी जन्माला आली आहे त्यांनी या कन्या वन समृद्धी योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मुलीच्या जन्माची नोंदणी ग्रामपंचायत मध्ये जाऊन करावी लागेल, त्यानंतर विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून अर्जाला लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडून त्या बरोबर मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र सुद्धा जोडावे. यानंतर अर्जाची आवश्यक पडताळणी केल्यावर वनविभागाच्या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या मार्फत शेतकऱ्याला 10 रोपे उपलब्ध करून देण्यात येईल.

योजनेचा शासन GR PDFइथे क्लिक करा
अर्ज PDFइथे क्लिक करा 
आधिकारिक वेबसाईटइथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारी योजनाइथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here