Home सरकारी योजना Mahatma Phule Karj Mafi Yojana 2023| महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023

Mahatma Phule Karj Mafi Yojana 2023| महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023

0
Mahatma Phule Karj Mafi Yojana 2023| महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांनी 21 डिसेंबर 2019 मध्ये महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेचा शुभारंभ केला, या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील एप्रिल 2015 ते मार्च 2019 पर्यंत उचललेल्या अल्पमुदत पिक  कर्जाची रक्कम, एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल आणि व्याजासहित थकीत असेल, अशी परतफेड न झालेली अल्पमुदत पिक कर्जाची रक्कम दोन लाख पर्यंत आहे, असे शेतकरी जर अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक असले तरी त्यांच्याकडे असलेले शेत जमीन क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपये पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.

  • या योजनेच्या अंतर्गत एप्रिल 2015 ते मार्च 2019 वितरीत करण्यात आलेल्या अल्पमुदत पिक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केले असेल आणि एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व व्याजासहित थकीत असेल, अशी परतफेड न झालेली कर्जाची रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.  
  • महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे अल्पमुदत पिक कर्जाचे केलेले पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेले पिक कर्ज यांची दिनांक 30 सप्टेंबर रोजी वैयक्तिक शेतकऱ्याच्या सर्व कर्जखात्यांची एकत्रित थकबाकी रक्कम विचारात घेऊन प्रती शेतकरी कमाल 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.
  • या योजनेच्या अंतर्गत ज्या अल्पमुदत पिक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पिक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 सप्टेंबर रोजी थकबाकीची रक्कम 2 लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाही.
  • या योजनेसाठी एक राज्यस्तरीय देखरेख व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल, यामध्ये वित्त विभाग, नियोजन विभाग, सहकार विभाग, यांचे सचिव तसेच रिझर्व बँक, नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँक यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
  • या योजनेची अंमलबजावणी करीत असतांना विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील व त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल मा. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने करण्यात येईल.
  • या योजनेसाठी आवश्यकतेप्रमाणे तांत्रिक सेवा पुरवठादार यांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीयकृत, खाजगी, व ग्रामीण बँकांच्या शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पिक अनुउत्पादित कर्जांना किंवा अल्पमुदत पिक पुनर्गठीत अनुउत्पादित कर्जांना (NPA Accounts) कर्जमुक्तीचा लाभ देण्याबाबतचा निर्णय वित्त विभाग व सहकार विभागाचे सचिव स्तरीय समिती नेमून त्यांच्यामार्फत घेण्यात येईल. 

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 Highlights

योजनेचे नावमहात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
व्दारा सुरुवातमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्याचे शेतकरी
उद्देश्यया योजनेचा उद्देश्य आहे शेतकऱ्यांना मजबूत पाठबळ देणे आणि कर्जमुक्त करणे
अधिकृत वेबसाईटmjpsky.maharashtra.gov.in
श्रेणीराज्य सरकारी योजना
योजनेची तारीख21 डिसेंबर 2019

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना उद्देश

समाजात अशी अनेक उदाहरणे दिसून येतील कि जिथे कर्जाच्या बोजामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटुंबे निराधार होतात, शेतकरी अहोरात्र शेतीमध्ये घाम गाळत असतात शेतीसाठी कष्ट करीत असतात, बहुतांश वेळा येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठयाप्रमाणात नुकसान होते तर कधी पिकांना भाव मिळत नाही या सर्व समस्यांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतो, राज्यातील अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी, शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांमधून सोडविण्याचा दृष्टीने शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास सुरु केली आहे.

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अल्पमुदतीचे दोन लाख रुपयेपर्यंतचे दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत घेतलेले पिक कर्ज राज्य शासनाकडून माफ करण्यात येईल. तसेच या योजनेचा लाभ राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांबरोबरच ऊस आणि फळबागांची शेती करण्याऱ्या व इतर पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही अट असणार नाही या संबंधित विवरण भविष्यात मुख्यमंत्री कार्यालातून जारी केले जाईल. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दहा हजार कोटी रुपयांचे बजट जाहीर केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी लिस्ट अपडेट

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र सरकारव्दारा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल असे राज्य शासनाव्दारे जाहीर करण्यात आले होते, महाराष्ट्र महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 11. 25 लाख शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार असून जुलै पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 8200/- करोड रुपये जमा केल्या जातील. महाराष्ट्र सरकारव्दारा हि योजना राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना आधार व दिलासा देण्यासाठी सुरु केली आहे. शासनाकडून अपडेट करण्यात आले कि करोना महामारीमुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विलंब झाला आहे. परंतु ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. त्या सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणित करून ठेवावे असे निवेदन शासनाने केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लिस्ट

महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या लाभार्थ्यांची तिसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये आले नाहीत, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजने (MLPSKY) च्या तिसऱ्या यादीत तपासावे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकर्यांचे नाव योजनेच्या यादीत समाविष्ट असतील, त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येईल.

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना

या योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतमध्ये भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र शासनाने हि योजना लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना या योजनेच्या माध्यामतून आर्थिक आधार देण्यासाठी राबविली आहे.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती स्थिती

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांना आधार कार्डाच्या माध्यमातून सत्यापित करून नंतर त्या बँक खात्यांमध्ये धनराशी जमा केल्या गेली होती, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे एकूण 7,06,500 बँक खाते उघडण्यात आले आहे, तसेच या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 4739.93 करोड रुपये जमा करण्यात आले आहे, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत अजूनही लाभ मिळालेला नाही त्यांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी योजनेमध्ये अर्ज करण्याची आवश्यकता आहे.

MJPSKY लाभार्थी लिस्ट

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दहा हजार करोड रुपयांचे बजट जाहीर केले आहे, महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी 22 फरवरी 2020 पर्यंत जाहीर करण्याचे ठरविले होते, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 अंतर्गत येतील त्यांना या योजनेचा देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील ज्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज केला आहे, ते शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव तपासू शकतात.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना प्रथमचरण

राज्यातील विधानसभा सत्र समाप्त झाल्यावर माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते कि शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्याकरिता कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असेल त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सहजतेने आणि सुलभतेने मिळवता येईल, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेचा प्रथम चरणाला मार्च 2020 मध्ये सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी राज्यातील लाभार्थी शेतकरी या  योजनेमध्ये अर्ज करून योजनेचा लाभ मिळवू शकतात.

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना यादी

शासनाकडून या योजनेच्या अंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळवलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची प्रथम यादी जाहीर केल्या गेली होती त्या यादीमध्ये पंधरा हजारांच्यावर लाभार्थी शेतकऱ्यांची नावे होती, त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, या यादीमध्ये पहिल्या यादीपेक्षा जास्त लाभार्थ्यांची नावे असण्याची शक्यता आहे, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीमध्ये नव्हती, ते लाभार्थी जाहीर झालेली दुसरी यादी तपासू शकतात. दुसरी लाभार्थी यादी तपासणीसाठी लाभार्थ्यांना आपल्या बँकेमध्ये, ग्रामपंचायत किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पहावी लागेल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची तिसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 फायदे

महाराष्ट्र राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी व त्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी शासनाने हि योजना सुरु केली आहे. या योजनेच्या संबंधित माहिती व लाभ खालीलप्रमाणे आहेत.

  • महाराष्ट्र महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्ज माफी मिळणार आहे.
  • हि योजना महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
  • या योजनेच्या अंतर्गत ऊस आणि फळबागांची शेती करणारे शेतकरी तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

  • या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतचे अल्पमुदतीचे पिक कर्ज आणि पुनर्गठीत पिक कर्ज माफ करण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँका, ग्रामीण बँका किंवा व्यापारी बँकांमधून घेतलेले अल्पमुदतीचे पिक कर्ज किंवा पुनर्गठन केलेले पिक कर्ज माफ करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्य सरकारव्दारा या योजनेच्या अंतर्गत मिळणारी कर्ज माफीची धनराशी थेट लाभार्थी शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा केली जाईल.

या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील नागरिक पात्र असणार नाही

  • महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्य मंत्री / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.
  • केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  • राज्य सार्वजनिक उपक्रम उदाः महावितरण, एस.टी. महामंडळ, इत्यादी व अनुदानित संस्था यांचे अधिकारी आणि कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे)
  • शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
  • निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25,000/- रुपयेपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
  • कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुत गिरणी, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दुध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन 25,000/- रुपयेपेक्षा जास्त असणारे) आणि पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

महात्मा फुले कर्ज योजना 2023 अंमलबजावणी प्रक्रिया

  • मार्च 2020 पासून बँकांनी आधार कार्ड क्रमांक आणि कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या नोटीस बोर्डावर तसेच चावडीवर प्रसिध्द केल्या जातील.
  • या याद्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.  
  • महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023 या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक कर्ज खाते त्यांच्या आधार क्रमांकाबरोबर संलग्न करावे, त्याचप्रमाणे आधार क्रमांक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करण्यात यावा.
  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाबारोबर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सोबत ठेवावा लागेल आणि त्यांच्या आधार क्रमांकाची आणि कर्जाच्या रकमेची पडताळणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर जावे लागेल.
  • जर पडताळणीनंतर केल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असेल तर ती कर्ज माफीची रक्कम नियमानुसार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये जमा केली जाईल.
  • यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जाची रक्कम आणि आधार क्रमांक बाबत वेगळे मत असल्यास ते  जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडण्यात येणार आहेत. या नंतर समिती निर्णय घेईल आणि अंतिम कार्यवाही करेल.

महात्मा फुले कर्ज माफी योजना 2023 यादी

या योजनेंतर्गत जिल्हानिहाय यादी जारी केली जाईल, राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकरी महात्मा फुले कर्ज माफी योजना जिल्हानिहाय लाभार्थी यादी 2023 मध्ये त्यांचा जिल्हा निवडून त्यांची नावे तपासू शकतात. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील म्हणजे 68 गावांमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी 24 फेब्रुवारीला आणि दुसरी यादी 28 फेब्रुवारीपासून जारी केली जाईल. एप्रिल महिन्याचा अखेरीस सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाईल, या MJPSKY जिल्हानिहाय लाभार्थी यादी 2023 मध्ये राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पिकांसाठी अल्पमुदतीचे कर्ज घेतले आहे त्यांची नावे येतील, आणि त्या शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंतचे पिक कर्ज माफ केल्या जाईल.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना आवश्यक कागदपत्र

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असेल, कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे असेल.

  • या योजनेच्या अंतर्गत सरकारी नोकरी करणारे नागरिक किंवा आयकर भरणारे शेतकरी या योजनेचा लाभ मिळवू शकत नाही
  • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ऊस आणि फळबागांची शेती करणारे व इतर पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
  • बँक खात्यावर फक्त लाभार्थींची सही किंवा अंगठ्याचा शिक्का असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर आवश्यक आहे.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

महत्मा फुले कर्जमाफी योजना कर्जमाफी मंजूर जिल्हे

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी यादी ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना पहायची आहे ते खालीलप्रमाणे जिल्ह्यातील यादीमध्ये त्यांच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहू शकतात, परंतु यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा लागेल, कारण महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीची यादी तपासण्यासाठी कोणतीही शासनाची अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिलेली नाही. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी यादी फक्त जनसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध होऊ शकते, यासाठी जवळच्या जनसेवा केंद्रामध्ये जाऊन कर्जमुक्तीची यादी तपासावी लागेल.

मुंबईऔरंगाबादहिंगोली
ठाणेजळगावअहमदनगर
मुंबई उप नगरेनाशिकसातारा
सिंधुदुर्गपुणेरायगड
रत्नागिरीसोलापूरपरभणी
नागपूरअमरावतीभंडारा
लातूरवर्धाउस्मानाबाद
गोंदियाबिडअकोला
बुलढाणाजालनानांदेड
चंद्रपुरगडचिरोलीयवतमाळ
नंदुरबारवाशीमसांगली
धुळेकोल्हापूरपालघर

महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

महाराष्ट्र राज्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022 या योजनेचा लाभ मिळवायचा आहे, त्यांना या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी त्यांना योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून उदाः आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्र घेऊन जवळच्या बँकेत जाऊन योजने संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, योजने संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या आधार संलग्न बँकेच्या खात्यात कर्ज माफीची रक्कम जमा केल्या जाईल, अशा प्रकारे तुमची या योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण होईल.

  • या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल, तुम्हाला ज्या बँकेत खाते उघडायचे आहे.
  • यानंतर बँकेमध्ये पूर्ण प्रक्रिया करून खाते उघडावे लागेल, तुमचे खाते बँकेत उघडल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन बँकेत जावे लागेल.
  • यानंतर योजने संबंधित सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, योजने संबंधित कागदपत्रांची प्रक्रिया संपूर्ण झाल्यावर कर्जाची धनराशी तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
  • महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेसाठी कोणतीही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नाही, अर्ज करण्यासाठी लाभार्थी अर्जदारांना जवळच्या बँकेत जावे लागेल.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना लाभार्थी यादी कशी पहावी ?

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने केला जातो, परंतु अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही लाभार्थी यादी ऑनलाईन तपासू शकता, लाभार्थी यादी ऑनलाइन तपासण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया आहे.

  • सर्वप्रथम अर्जदाराला या योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल, वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल
  • या होम पेजवर तुम्हाला लाभार्थी यादी चा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • या पेजवर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल, यानंतर गाव निवडावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी यादी दिसेल.
  • यानंतर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये तुमचे नाव तपासू शकता. 

हेल्पलाईन क्रमांक

सहकार विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग,
358, संलग्नक, 3रा मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड,
हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032.

शासनाचा GRClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here
ई – मेल आयडीcontact.mjpsky2019@maharashtra.gov.in
टोल – फ्री नंबर8657593808 / 8657593809 / 8657593810
महाराष्ट्र सरकारी योजनाClick Here

महाराष्ट्र सरकारव्दारा नेहमीच राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात, यावेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे. वाचक मित्रहो, या लेखामध्ये तुम्हाला आम्ही महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेविषयी संपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही आपल्याला या योजने संबंधित इतर काही माहिती मिळवायची असल्यास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवू शकता किंवा वरीलप्रमाणे टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. या पोस्ट मधील माहिती आपल्याला जर उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून अवश्य कळवा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here