Home मनोरंजन शॅम्पू व तेलाला दोष देऊ नका,‘या’ चुकांमुळेही झपाट्याने पातळ होतात केस, ट्राय करा हे उपाय!

शॅम्पू व तेलाला दोष देऊ नका,‘या’ चुकांमुळेही झपाट्याने पातळ होतात केस, ट्राय करा हे उपाय!

0
शासननामा न्यूज ऑनलाईन
पातळ केस (thin hair problem) ही अनेकांसाठी एक मोठी समस्या असते ,कारण केस हे सुद्धा आपल्या सौंदर्यात खूप भर टाकत असतात. पण जर ते केसच नीट वा निरोगी नसतील तर त्याचा परिणाम हा सौंदर्यावर होणे साहजिकच आहे. केस पातळ होणे यामागे अनेक कारणे असू शकतात. जर तुम्हाला कोणता गंभीर आजार नाही, तुम्ही कोणत्या आजारावर दीर्घकाळापासून औषधे घेत नसाल आणि तरी तुमचे केस वेगाने पातळ होत असतील आणि गळत असतील तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच माहित नसतील आणि त्या तुम्ही जाणून घेऊन त्यावर आवर्जून लक्ष दिले पाहिजे. चला तर आज आपण या लेखातून जाणून घेऊया की केस पातळ होण्यामागे नक्की कारणे काय काय आहेत.

पातळ आणि कमजोर होतात केस

रोज केस विंचरण्याची चुकीची पद्धत आणि शॅम्पू केल्यानंतर केस पुसण्याची पद्धत सुद्धा केसांच्या निरोगीपणावर थेट प्रभाव टाकते. म्हणून तुम्हाला माहित असले पाहिजे की केसांना निरोगी ठेवण्यासाठी कोणती कंगवा वापरावी आणि शॅम्पु केल्यानंतर केस कसे सुकवावे. तुमची कंगवा अर्थात हेअर कॉम्ब नेहमी असा असायला हवा की ज्यात केस अडकणार नाहीत. म्हणजेच रुंद ब्रश असणाऱ्या कंगव्याचा वापर करा. याशिवाय शॅम्पू केल्यानंतर केसांना टॉवेलने जोरजोरात चोळू नये. त्यांना नैसर्गिकरीत्याच कोरडे होऊ द्यावे.

(वाचा :- डाएट, व्यायाम करत अभिनेत्रीने घटवलं तब्बल २१ किलो वजन, प्रेग्नेंसीनंतर करावा लागला होता लठ्ठपणाचा सामना)

रोज शॅम्पू करणे वाईट नाही

उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतू मध्ये केसांमध्ये चिपचिपीतपणा आणि घाम येण्याची समस्या निर्माण होते. जर तुम्ही रोज शॅम्पू करत असाल तर ती अजिबात वाईट वा हानिकारक गोष्ट नाही आहे. पण शॅम्पू करण्याआधी केसांना कोमट तेलाने मालिश जरूर करा. यामुळे केसांमध्ये रुक्षपणा राहणार नाही आणि वरच्या थराला देखील नुकसान पोहोचणार नाही. उलट तुमचे केस अधिक लांब आणि चमकदार होतील. त्यामुळे शॅम्पू करत असाल तर नक्की करा पण या गोष्टी लक्षात ठेवा.

(वाचा :- करोनाचं महाभयंकर रूप, गर्भवती महिलांना रक्ताच्या गुठळीचा धोका, वेळीच व्हा सावध)

हेअर केअरमध्ये चूक

केसांना हेल्दी आणि शाईनी ठेवण्यासाठी त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा केसांची मालिश करणे गरजेचे आहे. जेणेकरून केसांना पोषण मिळत राहील. केसांना तेल लावल्याने केसांची शाईन देखील खूप वाढते. केसांची मुळे मजबूत होतात आणि केस खूप घनदाट दिसायला लागतात. याशिवाय केसांना तेलाची मालिश केल्याने मानसिक थकवा देखील लगेच दूर होतो. तर हे सगळे फायदे पाहता तुम्ही केसांना तेलाची मालिश दिलीच पाहिजे.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर ‘हे’ उपाय करून राहा स्लिम फिट, काही दिवसांमध्येच होईल वेट लॉस)

हेअर मास्कचा वापर

केस लांब सडक आणि घनदाट राहावेत यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेअर मास्क होय. गरजेचे नाही की यासाठी तुम्ही महागातला हेअर मास्कच वापरला पाहिजे किंवा खूप साऱ्या गोष्टी मिक्स करूनच हेअर मास्क बनवला पाहिजे. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याचा वापर करूनही तुम्ही हेअर मास्क बनवू शकता आणि आपल्या केसांना पोषण देऊ शकता. केवळ दही, मध किंवा एलोवेरा जेल सुद्धा केसांवर हेअर मास्क म्हणून लावली जाऊ शकते. यानंतर अर्ध्या तासाने केसांना शॅम्पू लावावा आणि केस धुवून घ्यावेत.

(वाचा :- अभिनेत्रीने पारदर्शक ड्रेस घालून बोल्ड व हॉट लुकमधील फोटो केले शेअर, पण मेकअपमुळे बिघडली स्टाइल)

यामुळे देखील पातळ होतात केस

जर तुम्ही सतत तुमचे केस मोकळे सोडत असाल आणि उन्हात वा वेगाने हवा सुरु असताना जर केस बांधत नसाल किंवा त्यावर कपडा लपेटत नसाल तर यामुळे देखील तुमचे केस वेगाने पातळ होऊ शकतात. खूप उन आणि वेगवान वारा तुमच्या केसांना मोठी हानी पोहचवू शकतो. यामुळे न केवळ केसांच्या वरच्या थराचे नुकसान होते तर केसांमधील रुक्षपणा देखील वाढतो. यामुळे केस कमजोर आणि पातळ होतात. त्यामुळे या काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या आणि आपल्या केसांची काळजी घ्या. जेणेकरून तुमच्या केसांचे निरोगीपण टिकून राहील आणि तुम्ही अधिक सुंदर दिसू लागाल.

(वाचा :- ‘या’ दुषित पदार्थांनी होतो १०००च्या वर लोकांचा मृत्यू, WHOच्या रिपोर्टमध्ये आलं समोर!)

पातळ केसांमागील अजून एक मोठे कारण

अवांछित गर्भधारणा टाळण्यासाठी आपण गर्भ निरोधक गोळ्या घेत असल्यास ही गोळी देखील आपल्या केसांच्या सतत पातळ होण्याचे कारण असू शकते. कारण बहुतेक गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन असते. हे आपल्या वेगाने कमी होणा-या केसांचे कारण असू शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.

हे पदार्थ अधिक खा

केस पातळ होण्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या नियमित आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, जे आपल्या केसांना कुपोषणापासून वाचवण्याचे कार्य करतात. जसे की बदाम, केळी, फॉक्स नट, मूग, उडीद, हरभरा डाळ, दूध, दही, ताक इत्यादी. या गोष्टी खाल्ल्यास तुमच्या शरीरात लोह, कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण वाढेल. हे आपले केस जाड आणि घनदाट होण्यास मदत होईल.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here