Home महाराष्ट्र मराठवाडा सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसे दुर्मिळ होत आहेत – देविदास पोटे; रामचंद्र चौरे गुरुजी यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळा

सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसे दुर्मिळ होत आहेत – देविदास पोटे; रामचंद्र चौरे गुरुजी यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळा

0
सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसे दुर्मिळ होत आहेत – देविदास पोटे; रामचंद्र चौरे गुरुजी यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळा

Press note

ईला, ता. धाराशिव (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाइन

सध्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी उणीव भासत आहे. नानांनी त्यांच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांची निवड केली ते कर्मचारी आज देखील तितक्याच निष्ठेने काम करत असल्याचे जाणवते. अशा कर्मचाऱ्यांचा निश्चितच समाजाला व आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अशा चांगल्या व्यक्तिमत्वानी केलेल्या सेवेचा सत्कार होतो आहे. अशी सेवाभावी वृत्तीची माणसे आज दुर्मिळ होत असल्याचे मत मुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक देविदास पोटे यांनी केले.

रामचंद्र चौरे गुरुजी यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम गुरूवारी (ता. ३०) रोजी प्रमुख अतिथी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अंबादास चौरे होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या सक्षणाताई सलगर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, पंढरपूरचे प्रा. डॉ. दत्ता डांगे, राजेंद्रकुमार निकाळजे, सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील, कविता पोटे, मीरा मोटे, कुसुम बोरसुळे, अर्जुनदादा सलगर, रवी वैद्य, कलीम शेख, किसन चौरे, डॉ. विनोद बर्वे, लातूरचे संपादक चंद्रकांत हजारे, चांगदेव क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर, कालिदास क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अंबादास चौरे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामचंद्र चौरे गुरुजी व सौ. सुनिताताई यांचा संस्था व कर्मचाऱ्यांकडून सपत्नी संपूर्ण आहेर उपचार करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध संस्था, संघटना, पाहुणे, मित्रपरिवार व गावकऱ्यांकडूनही यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार विक्रम काळे यांचा शुभेच्छा संदेश भ्रमणध्वनीवरून उपस्थितांना ऐकविण्यात आला.

पुढे बोलताना देविदास पोटे म्हणाले की, ज्ञानोपासक शिक्षण संस्थेने सेवा करण्याची संधी गुरुजींना दिली. त्यांनी या संधीचे सोने केले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. चांगले व्यक्तिमत्व नेहमीच समाजाला प्रिय असते. व्यक्तिमत्वे आयात करता येत नाही तर व्यक्तिमत्व घडवावे लागते, असे संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्व म्हणजे चौरे गुरुजी होत असे ते शेवटी म्हणाले. यावेळी सक्षणा सलगर, डॉ. महेश मोटे, डॉ. दत्ता डांगे, राजेंद्र निकाळजे, राजकुमार मेंढेकर, अशोक राऊत, कुमारी मयुरी चौरे, रितू शिंदे, गजभार गवई आदींनी मनोगते व्यक्त करताना विद्यार्थी भाऊक झाले होते. अध्यक्षीय समारोप अंबादास (नाना) चौरे यांनी केला. याप्रसंगी चौरे परिवाराकडून प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली. डॉ. वर्षा चौरे, डॉ. अनिकेत लोकरे, संदीप बनसोडे, अमीर पाटील, विठ्ठल बर्वे, दाऊद पिंजारी, आनंद सोनटक्के, राजेंद्र लोकरे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभाकर घाटोळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गरड तर आभार मनीषा गायके यांनी मानले. यावेळी पंचक्रोशीतून चौरे परिवारावर प्रेम करणारे आप्तमित्र, पाहुणे व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : ईला, ता. धाराशिव येथील जीवन विकास विद्यालयात आयोजित रामचंद्र चौरे यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्काराप्रसंगी अंबादास चौरे, देविदास पोटे, सक्षणा सलगर, डॉ. महेश मोटे, डॉ. दत्ता डांगे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र निकाळजे व अन्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here