आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दिघीत भव्य बालजत्रा संपन्न

0
34

भोसरी, दिघी (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

नगरसेवक ते आतापर्यंत त्यांचे काम उत्कृष्ट आहे. प्रभागातील नागरिकांना ते सातत्याने मदत करत असतात. आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दिघीतील विजय नगर मैदानावर (दि. ७ डिसेंबर) रोजी भव्य बालजत्रेचे आयोजन प्रमोद पठारे, प्रविण पाटील, शिवशक्ती मित्र मंडळ व महेश दादा मित्र परिवाराच्या  वतीने करण्यात आले होते.

दिघीतील शेकडो छोट्या मोठ्या मुलांनी जम्पिंग जॅक, मिकी माऊस,घोडा गाडी, विविध प्रकारचे पाळणे, हातावर टॅटू काढणे व रेल्वेतून फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी खेळताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मला ताई गायकवाड, मनोज गायकवाड, प्रमोद पठारे, प्रविण पाटील, विनोद डोळस, प्रमोद परदेशी, रमेश विरणक यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवाई पतसंस्थे चेअरमन संजय गायकवाड, उपमहापौर नानी घुले, युवा नेते उदय गायकवाड, युवा नेते कुलदीप परांडे, शिक्षण सभापती चेतन घुले, पंकज शर्मा, अमित महाडिक व दिघी गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी बाल जत्रेत हजेरी लावली.