धनगर समाजाचे आरक्षण अंमलबजावणी व एक हजार कोटिंकरिता मुख्यमंत्र्यांची वेळ मागीतली आहे – खा. डॉ. विकास महात्मे

4
327

पुणे, दि. २० जून (सोमनता देवकाते) । शासननामा न्यूज ऑनलाईन

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात आंदोलनाची हाक दिलेली असतांनाच आता धनगर समाजही आक्रमक होत आहे.

पुणे येथील शासकीय विश्रामगृहावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीत खासदार विकास महात्मे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यामध्ये मागील भाजप सरकारने धनगर समाजाला जाहीर केलेले एक हजार धनगर कोटी समाजाला मिळावेत यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचे सांगितले, त्याच बरोबर धनगर समाजाच्या आरक्षण अमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास वेळ द्यावा अशी मागणी खासदार विकास महात्मे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. (The Dhangar samaj community has also become aggressive in demanding reservation and one thousand crore yojana – MP Dr. Vikas Mahatme)

हेही वाचा : प्रताप सरनाईक यांची युतीची हाक; भाजपनं लगेचच साधली संधी

यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहर सचिव भिमराव देवकाते, सतीश देवकाते, सोमनाथ देवकाते, भाजप युवा मोर्चा पुणे शहर सचिव ओंकार डवरी, भाजप युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष प्रतीक कुंजीर, वीरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : ‘गर्दीसाठी उपमुख्यमंत्री दोषी नाहीत’, चंद्रकांत पाटलांकडून अजित पवारांचा बचाव

हेही वाचा : पुण्यात कोविड नियम धाब्यावर बसवणाऱ्या NCPच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल