साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या; पूरग्रस्ताचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे

0
139

इस्लामपूर – साहेब ; पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हा अन् आम्हाला न्याय द्या अशी साद घालत एका पूरग्रस्तांने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी साकडे घातले. अद्यापही महाविकास आघाडी सरकारने कोणतीही मदत दिली नसल्याचे यानिमित्ताने अधोरेखित केले.

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कृष्णाकाठच्या गावांची पाहणी करत आहेत.वाळवा येथे देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपुराचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचेसह भाजपा नेते उपस्थिती होते.

वाळवा येथील बौद्ध वस्तीमध्ये पुरग्रस्ताचे संवाद साधताना फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या समस्या ऐकल्या. बौद्ध वस्ती हा भाग सर्वप्रथम पाण्याखाली जातो. सर्वाधिक बाधित होणारा हा भाग आहे. आमचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करा अशी अपेक्षा पूरग्रस्तांना यावेळी व्यक्त केली.
त्यावर फडणवीस म्हणाले,” पूरग्रस्त भागाचं पुनर्वसन करावेच लागेल. पुनर्वसनाबाबत मी स्वतः लक्ष घालीन. मुख्यमंत्री महोदयांना आपले प्रश्न सांगेन. यातून तुम्हाला निश्चित न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील असे आश्वासन दिले.

यावेळी पीडित पूरग्रस्त मोठ्या आवाजात म्हणाला, “तुमच्यावर आमचा विश्वास आहे.तुमचे भाजपाचे सरकार असताना आम्हाला २०१९ च्या पुराच्या वेळी पाणी उतरण्या आधी सर्व्हे होऊन मदत मिळाली. तातडीचे अनुदान मिळाले.आता पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि आम्हाला न्याय द्या. असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. यावर उपस्थितांना अभिवादन करीत माजी मुख्यमंत्री फडणवीस पुढे मार्गस्थ झाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे. वाळवा येथून देवेंद्र फडणवीस हे पलूस तालुक्यातील अंकलखोप याठिकाणी रवाना झाले. अंकलखोप तसेच भिलवडी आणि मिरज तालुक्यातील ढवळी यासह सांगली शहरातील पूरग्रस्त भागाचीही पाहणी फडणवीस करणार आहेत.त्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.

संकटातून बाहेर पडाल..!
या संकटातून बाहेर पडाल असा विश्वास देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळवा येथे पाच ठिकाणी जाऊन पूरबाधित भागाची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.तसेच राज्य सरकारकडून अधिक मदत मिळवण्यासाठी भाजपा आग्रही असेल.तसेच केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली असून पूरग्रस्तांना खचून जाऊ नये. पश्चिम महाराष्ट्राचे महापूरात मोठी हाणी झाली आहे. पूरग्रस्तांना भरीव मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू, सरकारवर दबावही टाकू. मागील २०१९च्या महापूरात तात्काळ राज्याचे नियम बदलून केंद्राकडून व राज्याकरून मदत मिळवुन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.