Home क्रीडा शिवसेना भटक्या जाती जमाती विभाग महाराष्ट्र अध्यक्ष पदी बाळासाहेब किसवे यांची निवड

शिवसेना भटक्या जाती जमाती विभाग महाराष्ट्र अध्यक्ष पदी बाळासाहेब किसवे यांची निवड

0
शिवसेना भटक्या जाती जमाती विभाग महाराष्ट्र अध्यक्ष पदी बाळासाहेब किसवे यांची निवड

मुंबई (सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

मागील दोन दशकाहून अधिक काळ राज्यात धनगर व भटक्या विमुक्त जाती जमाती च्या चळवळीत सक्रियपणे कार्यरत असणारे अभ्यासू, वैचारिक नेतृत्व बाळासाहेब किसवे यांची शिवसेना प्रणित भटक्या विमुक्त जाती जमाती च्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे साहेब यांनी नुकतीच निवड करून, राज्यातील भटक्या विमुक्त जाती जमाती च्या प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे बाळासाहेब किसवे यांना सूचित करून आगामी काळात राज्या तील या जमातीचे रोजगार, आधार कार्ड, रेशकार्ड, याच बरोबर महिला व लहान बालके यांच्या शिक्षण आणि आरोग्य याबाबत आढावा घेऊन यांच्या या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना या पक्ष च्या माध्यनातून विशेष प्रयत्न केले जावेत अशा अपेक्षा हीं पक्ष नेतृत्वानी बाळासाहेब किसवे यांच्या कडून व्यक्त केल्या.

राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, यांच्यासह अन्य भागातील भटक्या जमाती च्या मागील दोन दशकापासून संबंध ठेऊन त्याच्या प्रश्न यासाठी लढणारे, छात्रभारती, कॉ. विलास सोनवणे च्या युवाभारत, मराठवाडा विकास परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या राज्यपातळीवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या बाळासाहेब किसवे यांना शिवसेना पक्ष च्या भटक्या जाती जमाती च्या राज्याच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने निश्चित पणे येणाऱ्या काळात बाळासाहेब किसवे यांनी या प्रश्न व समस्या चा निकाल लावतील अशी अशा शिवसेना नेते संजय मोरे यांनी व्यक्त करीत पुढील वाटचालीस व कार्यास शुभेच्छा दिल्या.

किसवे यांच्या या निवडीसाठी मराठा आरक्षण चलवळीतील अभ्यासू नेते योगेश केदार प्रयत्न केले. तर यावेळी खा. डॉ श्रीकांत दादा शिंदे, मंगेश दादा चिवटे बाजीराव चव्हाण उदय सावंत, संतोष पाटील, सोमनाथ काशीद, रणजित चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here