Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र भडगाव येथील धनगर समाजाच्या महावितरण अधिकाऱ्याचा आंदोलनाच्या नावाखाली खुनाचा प्रयत्न; त्यात निष्पाप मागासवर्गीय कर्मचाऱ्याचा खून !!!

भडगाव येथील धनगर समाजाच्या महावितरण अधिकाऱ्याचा आंदोलनाच्या नावाखाली खुनाचा प्रयत्न; त्यात निष्पाप मागासवर्गीय कर्मचाऱ्याचा खून !!!

0
भडगाव येथील धनगर समाजाच्या महावितरण अधिकाऱ्याचा आंदोलनाच्या नावाखाली खुनाचा प्रयत्न; त्यात निष्पाप मागासवर्गीय कर्मचाऱ्याचा खून !!!

भडगाव, दि. १० जून (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

भडगाव येथे दिनांक 6 जून 2021 सोमवार रोजी आमदारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून भडगाव येथील महावितरण कार्यालयावर ताला-ठोको व हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाच्या आधी आमदारांनी कार्यकर्त्यांना उत्साहित व संतप्त अशी चिथावणीखोर वक्तव्य केले परिणामतः भडगाव येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांचेसह कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीत वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतला.

https://twitter.com/PramodPBJP/status/1402936459544252418?s=19

महावितरण उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे हे धनगर समाजाचे असल्याने राजकीय पक्षाकडून मुद्दाम त्यांना टार्गेट करण्यात आल्याचे कळते, घटना एव्हढी तीव्र होती कि मागासवर्गीय वरिष्ठ कर्मचारी गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाले. अशा पद्धतीने महावितरण कार्यालयात जबरी प्रवेश करून धनगर समाज बांधव अभियंता अजय धामोरे सह वायरमन यांना बेकायदा मारहाण करून जीवघेणा हल्ला करणारे राजकीय पक्ष व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या समाजविघातक प्रकृतीचा शोध घेऊन आमदारांसह संशयितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

नक्की वाचा : मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांनी केली कविता; मुख्यमंत्र्यांना काढला चिमटा

भडगाव महावितरण उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना व त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण होऊ शकते तरी त्यांच्या कुटूंबियांना त्वरित संरक्षण देण्यात यावे अशी विनंती व वरिष्ठ तंत्रज्ञ स्व. गजानन राणे यांच्या मृत्यूची सकोल आणि निपक्षपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी धनगर समाजाकडून होत आहे.

नक्की वाचा : उद्धव ठाकरेंच्या PM भेटीनंतर चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं वक्तव्य

नक्की वाचा : बंगालमध्ये भाजपच्या ४० कार्यकर्त्यांची हत्या; सुवेंदू अधिकारींनी मोदी – शहांना भेटून दिली भयानक परिस्थितीची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here