Home महाराष्ट्र मराठवाडा मराठवाडयातील जनतेसाठी संघर्ष करणारा बहुजन नेता; सुरेशभाऊ कांबळे

मराठवाडयातील जनतेसाठी संघर्ष करणारा बहुजन नेता; सुरेशभाऊ कांबळे

0
मराठवाडयातील जनतेसाठी संघर्ष करणारा बहुजन नेता; सुरेशभाऊ कांबळे

शासननामा न्यूज ऑनलाईन : (संपादक | सोमनाथ देवकाते)

मराठवाडयाने देशाला अनेक महान नेते दिले व त्या नेतृत्वाने मराठवाड्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी आजन्म संघर्ष केला मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष असो की सिंचन असो ,रोजगार असो की शेतीचे प्रश्न असोत की सामाजिक प्रश्न असोत पण वर्तमानात मराठवाड्यात संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाची पोकळी जाणवते यातच एक आशेचा किरण दिसतो तो सुरेशभाऊ कांबळे यांच्या रूपाने जनतेची समस्या कोणतीही असो सरकारी की व्यक्तिगत प्रशासनाशी संबंधित की खाजगी त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सगळ्या ताकदीनिशी प्रयत्न करण्याचा भाऊंचा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला .

आठवणीत असणारा प्रसंग दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी चाराछावण्या सुरू करण्यासाठी दाखवलेली निष्क्रियता आणि त्याविरोधात केलेले विष प्राशन आंदोलन त्यामुळे तत्काळ सरकारला चारा छावण्या सुरु करण्यास भाग पाडले त्यासाठी जीवावर बेतनारी परिस्थिती आली तरी मागे हटायचे नाही हा निग्रह शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांसाठी केलेले आंदोलन असो की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे दुष्काळात गरिबांना धान्य मदत असो अशा अनेक घटना सांगता येतील की ज्यात सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा दिसते.

मराठा आरक्षणावर ,धनगर आरक्षणावर भाऊंनी केलेली संघर्ष यात्रा की ओबीसी प्रश्नावर केलेला संघर्ष नेहमीच आदराचा आणि चर्चेचा मुद्दा असतो, कोविडच्या संकटात तर सतत लोकांना मदत करण्याचे काम सातत्यपूर्ण पद्धतीने चालूच होते त्यात स्वताच्या आईला गमवावे लागले तरी लोकांची मदत थांबली नाही जेव्हा भाऊंच्या कार्यालयात त्यांच्या सोबत बसतो तेंव्हा सतत भ्रमणध्वनी वाजतच असतो आश्चर्य तर याचे वाटते की लोक काय काय अडचणी भाऊंकडे घेऊन येतात शेतातल्या बांधाची भांडण , भावकितली भांडण , सासऱ्याची जावयाची भांडण ,कुणाच्या व्यक्तिगत अडचणी, सावकाराची तगादा या सगळ्यांना कोणतीही सत्ता नसताना सर्वतोपरी मदत भाऊंकडून मिळते त्यांची बांधिलकी जनतेशी असते त्यामुळे राजकीय नुकसान झाले तरी त्याची त्यांना पर्वा नसते.

असाच एक प्रसंग आरक्षणाचा लढा चालू होता उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती अध्यक्ष पद मिळण्यासाठी अट ही होती की आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलने करायची नाहीत त्या राज्यमंत्री दर्ज्याच्या पदाला ठोकरण्याची हिम्मत भाऊंमध्येच असू शकते

येणाऱ्या काळात मराठवाड्याला भाऊंच्या रूपाने एक संघर्ष योध्दा नेता विधानसभेत मिळाला तर मराठवाड्याच्या विकासासाठी ,न्यायासाठी मोठा लढा निर्माण होईल सिंचन,रोजगार शिक्षणाचे,विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील नाहीतर लोक प्रतिनिधी मुंबई पुण्यात आणि जनता लोकप्रतिनिधींच्या शोधात अशी परस्थिती पाहायला मिळते .

भाऊंच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा आपला लोककल्यानकरी कार्याचा विस्तार राज्यभर होत राहो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here