Home पुणे खडसेंची भाजपवर टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात ‘ते अजूनही आमचे नेते….’

खडसेंची भाजपवर टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात ‘ते अजूनही आमचे नेते….’

0
खडसेंची भाजपवर टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात ‘ते अजूनही आमचे नेते….’

पुणेः (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलं माहीत आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आज भाजपचे आमदार असलेल्या अनेकांना मीच पक्षात प्रवेश दिला होता. त्यांना तिकीटही मीच मिळवून दिलं होतं. त्यामुळं ते माझ्याशी मोकळेपणानं बोलतात. पक्षाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करतात. ही नाराजी वाढू नये म्हणून सरकार पडण्याची वक्तव्ये केली जात असतील, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होतं. खडसेंच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये अस्वस्थता नाही, असं स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

‘एकनाथ खडसे आजही आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यानंतर तरी त्यांनी खरं बोलावं. गेल्या दीड वर्षात आम्ही अनेक आंदोलनं केली. पंढरपूरही जिंकले. आम्ही काही अस्वस्थत नाही, असं सांगतानाच आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचाः निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना टोला

चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊतांचं नाव घेऊन माझा दिवस का बिघडवता?, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, राऊतांनी ८० जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी ८० नव्हे २८० जागा लढवाव्यात, आमच्या त्यांना शुभेच्छा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

फडणवीस हे आजही सत्ता स्थापन करण्यासाठी तळमळत आहेत. त्यांनी अस्वस्थतेतूनच अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली होती. चंद्रकांत पाटलांनी यापूर्वी सरकार पाडण्याच्या दोन तारखा दिल्या होत्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. मात्र, काहीही होत नाही. उलट दिवसेंदिवस हे सरकार मजबूत होत आहे. विरोधक वाट बघत आहे आणि ते वाटच बघत राहतील

वाचाः मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार? सोलापुरात तयारीला सुरुवात

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here