Home महाराष्ट्र Dhangar Samaj: धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी २२ योजना पुन्हा सुरु; शिंदे-फडणवीस सरकारचे आभार – डॉ. पद्मश्री मा. खासदार विकास महात्मे

Dhangar Samaj: धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी २२ योजना पुन्हा सुरु; शिंदे-फडणवीस सरकारचे आभार – डॉ. पद्मश्री मा. खासदार विकास महात्मे

0
Dhangar Samaj: धनगर समाजाच्या सक्षमीकरणासाठी २२ योजना पुन्हा सुरु; शिंदे-फडणवीस सरकारचे आभार – डॉ. पद्मश्री मा. खासदार विकास महात्मे

मुंबई | प्रतिनिधी : शासननामा न्यूज ऑनलाईन

राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकार सत्तेवर आल्यानंतर उध्दव ठाकरे सरकारने रद्द केलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेले निर्णय बदलण्यात आलेत. ‘जे जे आदिवासींना ते ते धनगर समाजाला’या धोरणांतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या 22 योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या होत्या. त्या आता परत लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

धनगर समाजासाठी जुना निर्णय पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 22 योजना सरकारकडून नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. तसे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर डॉ पद्मश्री मा. खासदार विकास महात्मे (Dr. Vikas Mahatme) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत

धनगर समाजाच्या (Dhangar Samaj) सक्षमीकरणसाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ३० जुलै २०१९ रोजी आदिवासी समाजाला ज्या ज्या शासनाच्या सवलती त्या त्या धनगर समाजाला सवलती देण्याचा शासन निर्णय केला त्यासाठी १००० कोटी रुपयाची तरतूद केली, परंतु महाविकास आघाडी सरकारने हा शासन निर्णय बासनात गुंडाळून ठेवला आणि धनगर समाजाविषयीची वक्र दृष्टिकोनची जाणीव करून दिली, पण पुन्हा राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तो शासन निर्णय प्रभावीपणे लागू करावा असा आदेश पारित केला.

महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीने शिंदे – फडणवीस सरकारचे मनापासून त्रिवार अभिनंदन डॉ. पद्मश्री मा. खासदार विकास महात्मे यांनी केले आहे. शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील धनगर समाजासाठी घेतलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील धनगर समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सर्वच स्तरातून सरकारचे अभिनंदन होत आहे

डॉ. पद्मश्री मा. खासदार विकास महात्मे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले अशी माहिती भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी यांनी शासननामा न्यूजला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here