पुणे, 07 जून : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील (Pune Mulshi) एका कंपनीला भीषण आग (Fire) लागली असून या आगीमध्ये काही मजूर अडकल्याची (Workers stucked) महिती मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे (Fire Brigade) तीन बंन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
(वाचा- मराठा मोर्चासाठी संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र येणार? सोलापुरात तयारीला सुरुवात)
मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या अरवडे गावाजवळ ही घटना घडली आहे. सॅनिटाइझर तयार करणाऱ्या SVS कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. या आगीमुळं कंपनीमध्ये 10 ते 15 मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रय्तन करण्यात येत आहे. तहसीलदार अभय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली असून, लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.