भोसरी : भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष (BJP Pimpri Chinchwad City President) आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन 30 लाख रुपये खंडणीची (Extortion) मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर खंडणीचा मेसेज आला आहे. मसेजमध्ये खंडणीची रक्कम न दिल्यास आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन (Parivartan Helpline) सुरु केली आहे. या हेल्पलाईनचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या क्रमांकावर मंगळवारी (दि.4) सायंकाळी अज्ञात व्यक्तीने मेसेज केला. 30 लाख रुपयांची खंडणी द्या, अन्यथा पुढील परिणामाला (Pune Pimpri Chinchwad Crime) तयार रहा. खंडणीचे 10 लाख रुपये बँक खात्यात जमा करा आणि उर्वरतित रक्कम एका ठिकाणी असलेल्या गाडीत ठवेा, असा मेसेज आरोपीने पाठवला आहे. तसेच खंडणीची रक्कम दिली नाही तर महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी मेसेजमधून दिली आहे. हा मेसेज हेल्पलाईनचे काम करणाऱ्या यश पवार (Yash Pawar) यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास पाहिला.