प्रथमच देशाचे महामहिम राष्ट्रपती भारतरत्न डॉ. बाबासाबहेब आंबेडकर यांचे मुळगाव आंबडवे भेटीला….

0
89

रत्नागिरी (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना कर्मवीर दादासाहेब इदाते यांनी भारतरत्न डॉ. बाबासाबहेब आंबेडकर यांचे मुळगाव मु. आंबडवे ता. मंडणगड भेटीचे निमंत्रण दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रत्यक्ष भेटीत राष्ट्रपतीभवनात दिले होते. त्याला प्रतिसाद देत महामहिम राष्ट्रपती महोदय दि.०६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबडवे येथे भेट देणार होते परंतु काही प्रशासकिय तांत्रिक कारणांमुळे ते शक्य झालं नाही.परंतु दि.१२ फेब्रुवारी २०२२ रोजी महामहिम राष्ट्रपती महोदय आंबडवे येथे भेट देत आहेत असे महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी माननीय दादा इदाते यांना कळविले आहे.ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.

“आंबडवे” हे प.पू.डाॅ.बाबासाहेबांचे मुळ गाव आहे.पूर्वी ते रत्नागिरी जील्ह्यातील दापोली तालुक्यात होते सध्या मंडणगड तालुक्यात येते.इ.स.१९९९ पर्यंत आंबडवे या गावी फक्त ४ थी पर्यंत शाळा होती.तिथे पुढची शाळा सुरु व्हावी यासाठी खुप प्रयत्न चालू होते.पनं गावाची भौगोलिक परिस्थिती आणि इतर अनेक अडचणीमुळे ते शक्य होत नव्हते मा.श्री.अर्जूनराव जगताप यांचे वडिल यांनीही खुप प्रयत्न केले,भाई गिरकर यांनी दादा इदाते यांना शाळा चालू करण्याची विनंती दिली व सर्व प्रकारची मदत आम्ही करु असे आश्वासित केले.आंबडवे पंचक्रोशीची बैठक झाली.डाॅ.बाबासाहेब यांच्या भावकिने २.५ एकर जागा दिली व स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांनी २ लाख मदत दिली.भाई जगताप यांनी १ लाख व इतर बर्‍याच सामाजिक संवेदनशील व्यक्तींनी मदत केली आणि खुप कमी दिवसात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर सुरु झाले.

याच गावात डाॅ.बाबासाहेब यांच्या स्मृती जतन आहेत.तिथे अस्थीकलश त्यांच्या मुळघरी आहे व तिथेच एक सभागृह आहे.याच अत्यंत पवित्र अशा वास्तुला “स्फुर्तीस्थळ” असे म्हटले जाते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंती निमित्त एक समिती माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती त्यात माननीय दादा इदाते एक सदस्य होते.माननीय दादा इदाते यांनी एका बैठकित प.पू.डाॅ.बाबासाहेब यांच्या मुळगावाची माहिती पंतप्रधान व इतर सदस्यांना दिली.डाॅ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या परिसस्पर्शाने पावण झालेल्या ५ वास्तूना “पंचतीर्थ” म्हणून संबोधले गेले आणि त्यात “आंबडवे”चा समावेश झाला.

दादा इदाते यांची मनोमन इच्छा होती कि देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान या गावी आले पाहिजेत.यातील आता महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद १२ फेब्रुवारी रोजी आंबडवे येथे येणार आहेत. प्रथमच देशाचे राष्ट्रपती डाॅ.बाबासाहेबांच्या मुळगावी येणार आहेत व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर ला भेट देणार व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. बाबासाहेबांच्या विचारावर प्रत्यक्ष कृतीशील जीवण जगणार्‍या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची व ऐतिहासिक घटना असणार आहे.एकंदरित दादा इदाते यांच्या प्रयत्नामुळे आज आंबडवे गावात घटनाकारांच्या घटनेतील सर्वोच्च पदावरील व्यक्ती बाबासाहेबांच्या मुळ गावी येत आहे.तसे पाहिले तर आजपर्यंत आंबडवे दुर्लक्षित राहिले होते ते आता जगाच्या नकाशावर येणार आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.मंडणगड जवळील शिरगांव येथे ५ हेलिपॅड तयार केली आहेत.सर्व स्तरातील उच्च अधिकारी सध्या मंडणगड मध्ये तळ ठोकून आहेत. आंबडवे पंचक्रोशील गावात सध्या आनंदाचे व उत्सहाचे वातावरण दिसून येत आहे.यावेळी राष्ट्रपती यांच्या समेवत त्यांच्या पत्नी,मुलगी,राज्याचे राज्यपाल व दादा इदाते असणार आहेत. पहिल्यांदाचे देशाचे राष्ट्रपती आंबडवेत येणार असल्यामुळे सर्वांच्या नजरा राष्ट्रपती कधी येतात काय बोलतात व या गावासाठी काय भेट देतील याकडे लागले आहे.