Home महाराष्ट्र नागपुरात व्यापाऱ्यांचा ‘सरकार जगाओ, लाॅकडाऊन हटाओ’ मोर्चा

नागपुरात व्यापाऱ्यांचा ‘सरकार जगाओ, लाॅकडाऊन हटाओ’ मोर्चा

0

नागपूर – करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. या धोरणाच्या विरोधात नागपुरातील व्यापाऱ्यांनी सरकार जगाओ… लाॅकडाऊन हटाओ मोर्चा काढला. या मोर्चात नागपुरातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. दुचाकी, कार रॅली काढून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

सरकार जगाओ, वाणिज्य बचाओ संघर्ष समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास शहरातील हिस्लाॅप काॅलेजपासून सुरुवात होऊल लाॅ काॅलेज चौक, काॅफी हाऊस चौक, शंकरनगर, झाशीची राणी चौक, पंचशील, मेहाडिया चौक, रेल्वेस्टेशन, झाशीची राणी पुतळ्यापाशी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून मोर्चा समाप्त झाला.

लाॅकडाऊन उठवा, पुर्ण वेळ दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्या अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here