Home महाराष्ट्र शिवसेनेला काँग्रेसचा ‘दे धक्का… लबाड लोकांची फौज

शिवसेनेला काँग्रेसचा ‘दे धक्का… लबाड लोकांची फौज

0

वर्धा: हिंगणघाट विधानसभा तसेच जिल्ह्याच्या राजकारणात अशोक शिंदे (Ashok Shinde) यांचा ३० वर्षांपासून दरारा आहे. ते शिवसेनेचे उपनेते होते. तसेच ते शिवसेनेकडून तीनवेळा विधानसभेवर निवडणूक गेले (join Congress party) होते. शिवाय युती काळात त्यांनी राज्यमंत्री पदही भूषविले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार अनंत गुढे यांचा प्रवेश झाल्यानंतर या दोघात वर्चस्वावरून वाद वाढला होता.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने(ncp) काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता काँग्रेसने शिवसेनेला ‘दे धक्का’ देण्याचे ठरवले.

शिवसेनेचे उपनेते आणि युती काळातील राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. वर्धाच्या हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचे ठरवले आहे. दिल्लीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशोक शिंदे यांच्यासोबत ठाणे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. सुरेश म्हात्रे यांनी याआधीच शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here