Home महाराष्ट्र कोकण रामदास कदमांची आमदारकी जाणार ? ऑडियो क्लिपमुळं पक्षप्रमुखांची नाराजी!

रामदास कदमांची आमदारकी जाणार ? ऑडियो क्लिपमुळं पक्षप्रमुखांची नाराजी!

0
रामदास कदमांची आमदारकी जाणार ? ऑडियो क्लिपमुळं पक्षप्रमुखांची नाराजी!

मुंबई – काही दिवसांपूर्वीच व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम चांगलेच अडचणीत आल्याचं चित्र आहे. या ऑडियो क्लिपमुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून यामुळे कदमांची आमदारकी जाणार अशीची चर्चा सुरू आहे.

रामदास कदम हे विधान परिषद आमदार आहेत. त्यांच्या आमदारकीची मुदत येत्या जानेवारी महिन्यात संपत आहे. मात्र रामदास कदम यांना मुदतवाढ न देता त्यांच्या जागेसाठी नव्या उमेदवाराचा शोध शिवसेनेनेकडून सुरू करण्यात आला आहे.

भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. अनेक नेत्यांवर त्यांनी आरोप केले आहेत. यापैकी बहुतेक नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लागली आहे. मात्र परिवहनमंत्री अनिल परब यांच्यामागे लागलेल्या चौकशीच्या फेऱ्यासाठी रामदास कदम यांचाच हात असल्याचा आरोप करण्यात येत होतं.

माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता संपूर्ण माहिती माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातही रामदास कदम यांनीच सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here