Home मनोरंजन डाएट, व्यायाम करत अभिनेत्रीने घटवलं तब्बल २१ किलो वजन, प्रेग्नेंसीनंतर करावा लागला होता लठ्ठपणाचा सामना

डाएट, व्यायाम करत अभिनेत्रीने घटवलं तब्बल २१ किलो वजन, प्रेग्नेंसीनंतर करावा लागला होता लठ्ठपणाचा सामना

0

शासननामा न्यूज ऑनलाईन

प्रेग्नेंसीमध्ये आणि डिलिव्हरीनंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये बरेच बदल होतात. स्त्रियांना या काळात बऱ्याच समस्यांचा सामना देखील करावा लागतो. बाळाची काळजी घेत आपल्या डाएटकडे देखील लक्ष द्यावं लागतं. डिलिव्हरीनंतर स्त्रियांचे वजन अचानक वाढू लागते. याकाळामध्ये शरीराचे वजन वाढणं ही स्त्रियांसाठी मोठी समस्या असते. काही स्त्रिया तर वजन वाढल्यामुळे अस्वस्थ होतात. त्यांचा आत्मविश्वास देखील कमी होतो. पण अशावेळी हार न मानता डाएट, व्यायाम आणि योग्य आहाराकडे स्त्रियांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

 

डिलिव्हरीनंतर शरीराचं वजन वाढणं ही समस्या फक्त सर्वसामान्य स्त्रियांच्या नव्हे तर अभिनेत्रींच्याही वाट्याला येते. अभिनेत्री नेहा धुपियाला देखील प्रेग्नेंसीदरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागला. नेहाचं जवळपास २५ किलो वजन वाढलं होतं. अशावेळी तिने हार न मानता डाएट, व्यायामाच्या जोरावर तब्बल ८ महिन्यांमध्ये २१ किलो वजन कमी केलं.

​वजन वाढीमुळे निराशा

२०१८मध्ये अभिनेत्री नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीशी लग्नगाठ बांधली. आणि त्यानंतर तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. प्रेग्नेंसीदरम्यानचे बरेच फोटो देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र प्रेग्नेंसीदरम्यान तिचे तब्बल २५ किलो वजन वाढले. वजन वाढल्यामुळे नेहा निराश झाली होती. डिलिव्हरीनंतरचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. पण यादरम्यान तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शरीराचे वजन वाढल्यामुळे नेहाला बऱ्याच समस्यांचा सामना देखील करावा लागला.

 

नकारात्मक विचार करणे

गरोदरपणातील काळ हा स्त्रियांसाठी आनंदाचा आणि महत्त्वाचा असतो. डिलिव्हरीनंतर स्त्रीया बाळाची देखभाल करण्यात व्यस्त होऊन जातात. मात्र या परिस्थितीमध्ये त्यांना वजन वाढीची चिंता अधिक सतावत असते. नेहाच्या बाबतीत देखील तसंच घडलं. नेहाचं वजन वाढल्याने ती नकारात्मक विचार करू लागली होती. याचदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नेहाने म्हटलं होतं की, वजन वाढल्यामुळे आता आपल्या हातचं काम ही जाणार की काय ही भिती मला वाटत होती.’ खरं तर डिलिव्हरीनंतर वजन न वाढणं हे क्वचितच स्त्रियांच्या बाबतीत घडतं.

( डिलिव्हरीनंतर ‘हे’ उपाय करून राहा स्लिम फिट, काही दिवसांमध्येच होईल वेट लॉस )

​स्वतःसाठी वेळ द्या

डिलिव्हरीनंतर स्त्रियांनी आपल्या कामांमधून स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आपला आहार, व्यायाम याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नेहाने घर, मुल सांभाळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली आहे. नेहासाठी लॉकडाउन अगदी फायदेशीर ठरलं असं म्हणायाला हरकत नाही. लॉकडाउनच्या आठ महिन्यांमध्ये नेहाने नियमित व्यायाम आणि डाएट करत तब्बल २१ किलो वजन कमी केलं. आणि वजन वाढल्यामुळे कमी होत चाललेला आत्मविश्वास तिने परत मिळवला.

 

​नेहाचं डाएट प्लॅन

नेहाने वजन कमी करण्यासाठी बराच घाम गाळला आहे. वजन कमी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांचा सल्ला देखील तिने घेतला. नेहा अजूनही तिचं डाएट उत्तमरित्या करत आहे.

– सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून त्याचे सेवन करणे.

– व्यायाम करण्यापूर्वी एक ग्लास बीट, गाजर किंवा सफरचंदाचा ज्यूस पिणे.

– सकाळी नाश्तामध्ये अंड, दूध, इडली आणि ताज्या भाज्यांचे सेवन करणे.

नेहाचा हा सकाळचा क्रम अगदी ठरलेला असतो.

( ट्रान्सपरंट कपड्यांतील हॉट अभिनेत्रींनाही टाकलं मागे, लालभडक साडीतील नवरीबाईचा सर्वत्र धुरळा! )

​जेवणाची वेळ ठरलेली

नेहा ठरलेल्या वेळातच दुपारी तसेच रात्रीच्या जेवणाचे सेवन करते. चपाती, डाळ, भाजी, भात अशा साध्या पद्धतीचा आहार ती करते. तसेच रात्री ८ वाजता ती तिच्या ठरलेल्या आहाराचे सेवन करते. रात्रीच्या जेवणामध्ये सूप, सलाडचं सेवन करणं नेहाला आवडतं. घरगुती पद्धतीचं जेवण आणि सकस आहाराकडे नेहाचा अधिक कल असतो. तसेच कार्बोहायड्रेट्स, प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करण्याकडे ती विशेष लक्ष देते. नेहाने निरोगी आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.

 

​या गोष्टी खाणं टाळा

डिलिव्हरीनंतर स्त्रियांनी आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करणं टाळलं पाहिजे. नेहा देखील आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या पदार्थांपासून लांबच राहते. ती साखर खाणं पूर्णपणे टाळते. तसेच तेलकट पदार्थांचं सेवन करणं देखील तिला आवडत नाही. साखरेचा समावेश असलेले पदार्थ तसेच तेलकट पदार्थांचे सेवन करणं टाळलं पाहिजे. योग्य डाएट प्लॅन आणि सकस आहार हे नेहाचं वजन कमी होण्यामागचं रहस्य आहे.

 

​नियमित व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट करणंच महत्त्वाचं नाही. तर त्याचबरोबरीने नियमित व्यायाम करणं देखील महत्त्वाचं आहे. नेहाने देखील लॉकडाउनमध्ये व्यायाम करण्याकडे अधिक भर दिला. आताही ती तिच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देते. नेहा नियमित योगा करते. तसेच कार्डिओ हा तिच्या व्यायामामधील महत्त्वाचा भाग आहे. तसेच नेहाला जिममध्ये देखील अधिकाधिक वेळ घालवणं आवडतं. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर निरोगी राहतं तसेच वजन कमी होण्यास देखील मदत मिळू शकते.

 

(NOTE – तुम्ही देखील वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्या ओळखीच्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्या. दुसऱ्या व्यक्तीचे डाएट तसेच वर्कआउट फॉलो करू नका. कारण प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या या वेगवेगळ्या असतात.)

नियमित योगा करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here