Home मनोरंजन लठ्ठपणावर रामबाण ‘या’ थंडगार पदार्थाचा सरबत,आयुर्वेदिक डॉक्टरांनी रेसिपी व सेवनाची पद्धत सांगितली!

लठ्ठपणावर रामबाण ‘या’ थंडगार पदार्थाचा सरबत,आयुर्वेदिक डॉक्टरांनी रेसिपी व सेवनाची पद्धत सांगितली!

0
लठ्ठपणावर रामबाण ‘या’ थंडगार पदार्थाचा सरबत,आयुर्वेदिक डॉक्टरांनी रेसिपी व सेवनाची पद्धत सांगितली!
आजच्या काळात बरेच लोक लठ्ठपणाच्या समस्येतून जात आहेत. तसं तर वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असले तरी प्रत्येकाकडे व्यायामासाठी पुरेसा वेळ नाहीये. अशा परिस्थितीत आहारात काही बदल करूनही आपण स्वत:ला मेंटेन राखू शकतो. आम्ही येथे सब्जा बाबत बोलत आहोत जे वजन कमी करण्यासोबतच अनेक रोग बरे करण्यास उपयुक्त आहेत.

लहान लहान गोल आकाराच्या सब्जा बिया पुदीनाच्याच गटातून येतात आणि त्यांचे आरोग्यविषयक फायदे आणि बरे करण्याचे गुणधर्म आहेत. आयुर्वेदात देखील रामबाण औषध म्हणून सब्जा बियांचा वापर केला जातो. म्हणूनच आम्ही सब्जा बियांसंदर्भात आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. चला तर जाणून घेऊया सब्जा बियांचे फायदे आणि त्यांचे सेवन करण्याची योग्य पद्धत!

फायबर असल्यामुळे वेट लॉससाठी रामबाण

सब्जाच्या बियां मध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे आपली भूक नियंत्रणात राहते. म्हणूनच सब्जाचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण फायबर शरीरातील चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करण्यास देखील मदत करते. डॉक्टर म्हणतात की फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुळव्याधाचे रूग्ण देखील याचे सेवन करु शकतात.

(वाचा :- स्त्रियांनो बेफिकीर राहू नका, ‘या’ गोष्टींचं सेवन न केल्यास बाळाचा शारिरीक विकास येऊ शकतो धोक्यात)

पोटाशी निगडीत समस्या होतात दूर

जीवोत्तम हेल्थ बंगळुरूचे कन्सल्टंट सर्जन (Consultant Surgeon) (Ayurveda) आयुर्वेदिक डॉक्टर शरद कुलकर्णी यांच्या मते, सब्जा बिया केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर अॅसिडिटी, अपचन आणि पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील मदत करतात. ते पुढे असेही म्हणतात की सब्जा अप्रत्यक्षपणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील उपयोगी ठरू शकतात.

(वाचा :- दीपिका पादुकोणला ग्लॅमरस कपड्यांऐवजी डिझाइनरनं ‘बुरखा घालून ये’ असं का म्हटलं? ६ महिने ही गोष्ट ठेवली गुप्त)

ब्लड शुगरही होते कंट्रोल

डॉक्टरांच्या मते, सब्जा बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करतात आणि त्यामुळे लठ्ठपणा आपोआप कमी होतो. फायबर गुणधर्मांनी समृद्ध असलेले घटक पचनक्रिया संथ करतात आणि रक्तातील साखर वाढण्यापासून मज्जाव करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात आवर्जून सब्जा बियांचा वापर करावा.

भूक कंट्रोल करते

डॉक्टरांच्या मते, जेव्हा सब्जा बिया पाण्यात भिजवल्या जातात तेव्हा त्या एंजाइम्स सोडतात. पाण्यात टाकल्यावर फुगलेल्या सब्जा बिया खाल्ल्याने पाचन एंझाइम्स बाहेर पडतात आणि अति प्रमाणात खाण्याची (overeating) समस्या दूर होते. अशा परिस्थितीत आपली भूक नियंत्रणात राहते आणि आपण अनावश्यक व अनहेल्दी पदार्थ खाणे टाळतो, ज्यामुळे सहाजिकच वजन कमी होते.

या पद्धतीने करा सब्जा बियांचे सेवन

आयुर्वेदात सब्जाचे सेवन करण्याचे अनेक मार्ग आहेत पण हे लक्षात ठेवा की हे असेच खाल्ल्यास जास्त फायदा होणार नाही. डॉ. कुलकर्णी यांनी सब्जा बियांचे सेवन करण्याचा एक सोपा मार्ग सांगितला आहे. त्यांनी सांगितले की रात्री झोपताना सब्जा बिया पाण्यात भिजवत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्या खा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्यात मध आणि लिंबू मिसळून सरबत बनवून आस्वाद घेऊ शकता किंवा दुधात मिसळूनही पिऊ शकता. रिकाम्या पोटी सब्जाच्या सरबताचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अगणित फायदे होतात.

सब्जा बिया भिजवून खाणंच का योग्य आहे?

डॉक्टरांच्या मते, सब्जाच्या बिया थंड असल्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. म्हणूनच आपण सब्जाचा उपयोग तीव्र उष्णतेमध्ये देखील करू शकतो. तुम्ही जर आपल्या आहारात सब्जा बियांचा समावेश केला तर उष्णतेमुळे होणा-या समस्यांपासून तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळू शकते. भिजलेल्या सब्जा बिया पाणी शोषून घेतात आणि फुगून त्यांचा आकार वाढतो. फुगल्यामुळे त्यातील फायबरचे प्रमाण वाढते आणि पाचक एंजाइम्स बाहेर पडतात.

पोषक तत्वांचं भंडार आहेत सब्जा बिया

सब्जा बिया वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात. सब्जा बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, फॅट, ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, मॅग्नेशियम, फायबर आणि कॅल्शियम यासारख्या अनेक पोषक तत्वांनी आणि खनिजांनी समृद्ध असतात. त्यांना बेसिल सीड्स म्हणून देखील ओळखले जाते. सब्जा बिया ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिडनी समृद्ध असतात, जे शरीराची चयापचय प्रक्रिया (metabolism) टिकवून ठेवण्यास मदत करतात. सब्जा बियाण्यांमध्ये अॅंटी-इन्फ्लामेट्री गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.

खाण्यायोग्य सब्जा बिया कशा तयार कराव्यात

दोन चमचे सब्जा बिया घ्या आणि त्यांना एक कप गरम पाण्यात 15 ते 20 मिनिटे भिजवा. एकदा का या बिया चांगल्या फुगल्या की आपण आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारे त्याचे सेवन करु शकता. आपण एक लिटर पाण्यात देखील एक चमचा सब्जाच्या बिया घालू शकता आणि दिवसभर थंडगार सरबताच्या स्वरुपात त्यांचा आस्वाद घेऊ शकता.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here