श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या रणभूमी वरील अश्वारूढ तैलचित्राचे प्रकाशन!!!

0
111

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

श्री खंडेराया फौडेशनच्या खंडू तांबडे, संतोष वाघमोडे , श्रीधर गोरे आणि रोहित पांढरे यांनी बनवलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या रणभूमी वरील अश्वारूढ तैल चित्राचे प्रकाशन आज रामकृष्ण मंगल कार्यालय सांगावी येथे झालेल्या वधुवर परिचय मेळाव्या मध्ये मा. मंत्री व आमदार राम शिंदे , माजी मंत्री आमदार दत्ता मामा भरणे, प्रा डॉ यशपाल भिंगे, युवा उद्योजक श्री विवेक शेठ बीडगर, मुकुंदजी कूचेकर, डॉ उज्ज्वला ताई हाके यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थिती होते. सोलापूरचे चित्रकार असिफ शिकलगार यांनी अतिशय सुंदर असे चित्र अल्पावधीत बनवले आहे.


लोक वर्गणीच्या माध्यमातून हे चित्र बनवण्यात आले असून श्री खंडेराया फाऊंडेशनने बनवलेले हे चौथे ऐतिहासिक तैल चित्र आहे . या आधी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अश्वारूढ तैलचित्र, सुभेदार मल्हारराव होळकर यांचा समोरून संपूर्ण चेहरा असलेले तैलचित्र व चक्रवर्तीसम्राट राज राजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वैदिक राज्याभिषेक सोहळ्याचे तैलचित्र बनवण्यात आले आहे.