या शौर्ययात्रेची दखल देशपातळीवर घेतली जाईल- युवराज यशवंतराव होळकर

पुण्यामध्ये तयार झालेली श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांची 14 फुटी भव्य अश्वारुढ मुर्ती शौर्ययात्रे द्वारे इंदोर शहराकडे मार्गस्थ झाली

0
168

पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन

खंडोबा मंदिर सारसबाग येथे पुजा करून पुण्यातील मिरवणुकीस प्रारंभ झाला पुण्यात या भव्य अश्वारुढ प्रतिमेची नगर प्रदक्षीणा अश्वारूढ युवती, पारंपरिक गजीढोल नृत्य, आधुनिक वाद्य भांदाऱ्याची मुक्त उधळण अशा मोठ्या थाटात पार पडली. होळकर घराण्याचे वंशज युवराज यशवंतराव होळकर (तृतीय) यांनीही सहभाग दिला त्याच बरोबर इंदुर शहराचे मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. सुधिरजी देडगे, श्री. स्वप्निलराजे होळकर मा. खासदार विकास महात्मे, आमदार दत्ता भरणे, मा. आमदार प्रकाश शेंडगे, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, मा. नगरसेव अशोक हरणावळ, पुण्याच्या पोलिस उपायुक्त मा. रुक्मीणी गलांडे, मा. अमरजीतदादा बारगळ, जहागिरदार तळोदे संस्थान, धार संस्थानेचे वंशज पवार यांचे सह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले.

या शौर्ययात्रेची दखल देशपातळीवर घेतली जाईल- युवराज यशवंतराव होळकर

या यात्रेचे पुणे शहरातील संयोजन मा. नगरसेवक अशोक हरनावळ, धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. घनःशामबापू हाके, मा. विवेकजी बिडगर मा पोलिस आयुक्त राम मांडुरके, विठ्ठल कडू, गणेश पुजारी, योगेश धरम, संतोष वाघमोडे, रोहित पांढरे, सोमनाथ देवकाते, संतोष वरक, योगेश खरात, विष्णू कुन्हाडे, अरविंद वाळेकर, विकास माने, प्रमोद परदेशी यांसह पुण्यातील सर्व होळकर प्रेमी शौर्ययात्रा एवं प्रतिमा स्थापन समिती पुणे यांचे वतीने मुर्तीची पुणे ते इंदौर अर्शी शौर्य यात्रा काढण्यात आली आहे. रवीवारी सायंकाळी मुक्काम करून शौर्य यात्रा सोमवार दि. ८ मे रोजी सकाळी ८ वा. येरवडा वाघोली शिरूर मार्गे – अ.नगर येथे शनिवार दि १३ मे रोजी इंदौर शहरात सदर शौर्ययात्रेची समाप्ती होवून स्मारकाचे लोकार्पण होणार आहे