पुणे (संपादक: सोमनाथ देवकाते) | शासननामा न्यूज ऑनलाईन
पुण्यातील स्वाती कांबळे यांची नमो ग्रुप फाउंडेशन पुणे NaMo Group Foundation Pune) शहर महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. नमो ग्रुप फाउंडेशन चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद परदेशी, प्रदेश महामंत्री सुधाकर राजे यांच्या आदेशानुसार व उपस्थित नमो ग्रुप फाउंडेशन पुणे शहर अध्यक्ष ओंकार डवरी यांनी स्वाती कांबळे यांना नियुक्तीपत्र दिले.
सामाजिक संघटनाच्या माध्यमातून उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा शासनदरबारी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज खरी गरज आहे आणि अशी सक्रिय महिला कार्यकर्ते स्वाती कांबळे यांना नमो ग्रुप फाउंडेशन पुणे शहर महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी नमो ग्रुपचे पदाधिकारी केशव जगदाळे व पदाधिकारी उपस्थित होते.