महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या अतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राबविली जाते या योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांना शिष्यवृत्ती दिली जाते, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी अशासकीय अनुदानित / अंशत अनुदानित किंवा विना अनुदानित / कायम विना अनुदानित महाविद्यालये आणि बिगर कृषी विद्यापीठे आणि उपकेंद्रे (खाजगी विद्यापीठे वगळून / स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठे या शिष्यवृत्तीस पात्र आहे
महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतन महाविद्यालयात शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्र्मांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे दोन्ही पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांकारिता डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विस्तारित योजनेला वर्ष 2018 पासून लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे 1 लाख रुपये ते 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांकारिता प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या 500 ठेवण्यात आली आहे, हि शासनाच्या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे राहील. तसेच राज्यात विविध मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता विविध वसतिगृहाच्या योजना राबविण्यात येत आहे. तथापि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता कोणतीही वसतिगृहाची योजना राबविण्यात येत नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची जागेअभावी गैरसोय होऊ नये, त्यांना शिक्षण पूर्ण करण्यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने निर्णय घेऊन हि योजना सुरु केली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजना अंतर्गत निर्वाह भत्ता (लाभ)
महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च शिक्षण संचलनालयाच्या अंतर्गत राज्याच्या गुणवान आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी काही आर्थिक सहाय्य व शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात त्यापैकी हि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारा निर्वाह भत्ता पुढीलप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार राही.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 महाराष्ट्र, या योजनेंतर्गत राज्यात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांना महानगरासाठी निर्वाह भत्ता 3000/-रुपये दर महिन्याला या दराने जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी देय राहील, तसेच इतर शहरांसाठी 2000/- रुपये दर महिन्याला या दराने जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी निर्वाह भत्ता देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
तसेच या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु अशा कुटुंबातील विद्यार्थी ज्या कुटुंबातील दोन्ही पालकांचे एकूण उत्पन्न 1 लाख किंवा त्या पेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शेक्षणिक वर्षातील 10 महिन्याकरिता 10,000/- रुपये इतका निर्वाह भत्ता देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांचे पालक जर अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार नाहीत, परंतु त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील दोन्ही पालकांचे उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना महानगर क्षेत्रासाठी 10,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि इतर शहरी क्षेत्रांसाठी व ग्रामीणभागांसाठी 8000/- रुपये 10 महिन्यांसाठी या प्रमाणे वसतिगृह निर्वाह भत्ता देय राहील.
योजनेच्या लाभाचे स्वरूप
व्यावसायिक अभ्यासक्रम :-
या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार यांच्या विद्यार्थी मुलांसाठी MMRDA / PMRDA / औरंगाबाद शहर किंवा नागपूर शहरामधील शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 3000/- रुपये प्रतिमहिना असे 30,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि इतर क्षेत्रातील शिक्षण संस्थेमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2000/- रुपये प्रतीमहीना असे 20,000/- रुपये 10 महिन्यांसाठी (अमर्यादित कोटा)
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी MMRDA / PMRDA / औरंगाबाद शहर किंवा नागपूर शहरातील शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 8,000/- रुपये 10 महिन्यांसाठ (अमर्यादित कोटा)
योजनेंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख ते 8 लाख पर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी MMRDA / PMRDA / औरंगाबाद / नागपूर शहरातील शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि तसेच इतर क्षेत्रातील शिक्षण संस्थेमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 8000/- रुपये 10 महिन्यांसाठी (या मध्ये प्रती जिल्हा कोटा 500 ) प्राप्त झालेल्या अर्जाच्या संखेवरून प्रती जिल्हा कोट्याचे वाटप ठरवले जाते. या योजनेंतर्गत 33 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत, आणि जागा पूर्ण भरल्या गेल्या नसल्यास त्या जागा मुलांकडे वळविल्या जातील.
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम :-
ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये पेक्षा जास्त नाही अशा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2000/- 10 महिन्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता असेल
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना Key Highlights
योजनेचे नाव | डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना |
---|---|
अंतर्गत सुरुवात | महाराष्ट्र सरकार |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | अल्प भूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत कामगार कुटुंबातील विद्यार्थी |
उद्देश्य | प्रतिभावान व गुणवंत ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांचे शक्षण पूर्ण करता यावे यासाठी आर्थिक सहाय्य |
अधिकृत वेबसाईट | https://mahadbtmahait.gov.in |
आर्थिक सहाय्य | दरमहा 3000/- रुपये पर्यंत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
श्रेणी | शिष्यवृत्ती योजना |
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 उद्देश
राज्यातील अल्पभूधारक शेतकरी तसेच नोंदणीकृत कामगार त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी बऱ्याच अडचणींना समोर जावे लागते, ग्रामीण भागातील अशा विद्यार्थ्यांना शहरामध्ये व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे शिक्षण अबाधित पूर्ण व्हावे, आणि प्रतिभावान व गुणवंत ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांचे शक्षण पूर्ण करता यावे आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत कामगार त्याचबरोबर ज्यांच्ये उत्पन्न एक लाखापर्यंत आहे असे नागरिक त्यांच्या मुलांना त्यांचे व्यावसायिक उच्च शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राज्यात राबविण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राज्याच्या प्रत्येक पात्र गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी या साठी शासनाने या योजनेचे वेब आधारित पोर्टल विकसित केले आहे, पात्र विद्यार्थी शासनाच्या आपले सरकार महाDBT या पोर्टवर जाऊन योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात, या योजनेच्या अंतर्गत मिळणारि आर्थिक सहाय्याची रक्कम / शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- शासनाचा उद्देश आहे ग्रामीण भागामधील कृषी पार्श्वभूमीवर असलेल्या कमी उत्पन्न गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे जेणेकरून त्यांना आयुष्यात मोठी उंची गाठता यावी
- उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन शिक्षण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर संघर्ष करतांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे
- तसेच शासनाचा उद्देश आहे ग्रामीण भागातील कृषी आधारित कुटुंबामधील मुलांना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षांबद्दल जागरुकता निर्माण करणे
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आवशयक पात्रता
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरवातीला केवळ राज्यातील कृषी आधारित गरीब परिवारातील विद्यार्थी मुलांवर केंद्रित होती, त्यानंतर शासनाने या योजनेचा विस्तार करून हि योजना समाजातील सर्व आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी मुलांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही पात्रता निकष आहेत, पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.
- या योजनेंतर्गत अर्जदार विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे, योजनेसाठी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी या सबंधित कागदपत्र जसे कामगार नोंदणी प्रमाणपत्र, जमीन नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील
- या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये ते 8 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे, अर्ज करतांना कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्नाचे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे, तसे रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
- या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयाप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे तेच विद्यार्थी या योजनेसाठी / शिष्यवृत्ती अनुदान साठी पात्र असतील
- शासन निर्णयाप्रमाणे या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील दोन मुले या वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदानासाठी अर्ज करू शकतात
- असा विद्यार्थी ज्याला अन्य कोणत्याही दुसऱ्या निर्वाह भत्ता योजनेंतर्गत निर्वाह भत्ता मिळत असेल तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही
- एखादा विद्यार्थ्याने सामान्य रहिवासी असलेल्या त्याच्या गावातील किंवा शहरातील शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्या विद्यार्थ्याला हा वसतिगृह निर्वाह भत्ता देय राहणार नाही
- या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठीच हा वसतिगृह निर्वाह भत्ता देय असणार आहे, जर एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा काही कारणांमुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश न मिळाल्यास त्या विद्यार्थ्यास वसतिगृह निर्वाह भत्ता त्या वर्षापुरता देय राहणार नाही
- या योजनेमध्ये 1 लाख रुपयाच्या आत कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदान देण्यासाठी संख्रची कोणतीही मर्यादा राहणार नाही, तसेच परंतू 1 लाख ते 8 लाख पर्यंत कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे लाभार्थी विद्यार्थ्यांची कमाल संख्या 500 इतकी शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे, त्यापैकी 33 टक्के जागा विद्यार्थांनीकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहे, त्यापैकी पूर्ण जागा न भरल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणल्या जाईल
- या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार जे विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यामधून व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवितात त्याचप्रमाणे जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाला खाजगी अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना हा वसतिगृह निर्वाह भत्ता लागू राहणार नाही
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेच्या अंतर्गत महानगरासाठी या प्रमाणे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर इत्यादी महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे प्रती विद्यार्थी दरवर्षी प्रमाणे 10,000/- रुपये आणि ग्रामीणभागासाठी प्रती विद्यार्थी प्रतीवर्षी 8,000/- रुपये इतका वसतिगृह निर्वाह भत्ता देय राहील
- एखाद्या विद्यार्थ्याने शासकीय / निमशासकीय किंवा खाजगी वसतिगृहांमध्ये प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्यांनी त्या विषयीचा योग्य पुरावा सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याने जर स्वतःची राहण्याची व्यवस्था खजगी मालकीच्या घरामध्ये केली असेल तर अशा विद्यार्थाला नोंदणीकृत किंवा नोटराईज्ड भाडे कराराची प्रत सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक राहील
- या योजनेच्या अंतर्गत लाभाच्या पात्रतेसाठी इतर अटी आणि शर्ती तसेच वसतिगृह निर्वाह भत्त्याच्या वितरणाची कार्यपद्धती शासनाचे निर्णय आणि उच्च तंत्रशिक्षण विभागने निर्धारित केल्या प्रमाणे राहील
- या योजनेंतर्गत वसतिगृहात राहण्यासाठी विद्यार्थ्याच्या इच्छेला प्रधान्य देण्यात यावे, म्हणजेच ज्या पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहण्याची इच्छा नाही अशा वद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या निर्वाहभत्ता देण्यात यावा व निर्वाहभत्त्याची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात प्रत्यक्ष DBT व्दारे थेट जमा करण्यात यावी
- राज्यामध्ये अंमलात असलेली राजश्री शाहूमहाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेमध्ये पात्र असलेले विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत म्हणजेच ते विद्यार्थी वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदान मिळविण्यास पात्र आहेत
- राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थी संख्येचा कोटा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निश्चित करण्यात येतो
- या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमामध्ये दोन वर्षाची गॅप घेऊन पुढील अभ्यासक्रम करत आहे ते विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
- या योजनेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी सामान्य श्रेणीतून त्याचप्रमाणे SEBC श्रेणी अंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे
- अर्जदार विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षात त्यांची उपस्थिती 50 टक्के किंवा त्याहून अधिक असल्याची खात्री करून द्यावी लागेल
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आवश्यक कागदपत्र
- पात्र अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
- अर्जदार विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार असेल अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि अल्पभूधारक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील
- या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना कुटुंबाच्या एकूण वार्षिक उत्पन्नाचा दाखला, सबंधित तहसीलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
- ज्या विद्यार्थ्यांनी CAP प्रणालीतून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल त्या विद्यार्थ्यांनी CAP सबंधित कागदपत्र अर्ज करतांना सादर करणे आवश्यक राहील
- या योजनेंतर्गत प्रत्येक घरातील दोन विद्यार्थी मुले या वसतिगृह निर्वाह अनुदानास पात्र आहे तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
- अर्जदार विद्यार्थ्यांना खाजगी वसतिगृहत राहत असल्यास किंवा खाजगी मालकीच्या घरात भाड्याने राहत असल्यास तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील
- गॅप असल्यास गॅप सबंधित कागदपत्र सादर करावे
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना Mahadbt ऑनलाइन अर्ज
वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदान योजनेचा लाभ ज्या पात्र विद्यार्थ्यांना मिळवायचा असेल त्यांना सर्व प्रथम शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल, या योजनेच्या अंतर्गत अर्ज आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील
- या योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- वेबसाईटवर भेट दिल्यावर तुमच्यासमोर होम पेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय निवडावा लागेल
- आता या नंतर तुमची नोंदणी आधार कार्डव्दारे करा, यानंतर अर्जदाराला ‘’तुमच्याकडे आधार क्रमांक आहे काय’’ या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, या प्रश्नाच्या खाली तुम्हाला दोन पर्याय दिसतील
- यानंतर अर्जदाराने होय या पर्याय निवडून क्लिक करावे, आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल
- त्यानंतर तुम्हाला ऑथेंटीकेशन प्रकार निवडावा लागेल, ऑथेंटीकेशन करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधारकार्ड बरोबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, तुमचा मोबाइल नंबर आधार कार्ड बरोबर नोंदणीकृत असेल तर OTP निवडा आणि मोबाइल नंबर आधार कार्ड बरोबर सलग्न नसेल तर बायोमेट्रिक पद्धत निवडा
- तुम्हाला तुमची सर्व माहिती पोर्टलवर प्रविष्ट करावी लागेल यासाठी घोषणा बॉक्सवर क्लिक करा, यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक OTP प्राप्त होईल
- तुम्हाला प्राप्त झालेला OTP नोंदणी फॉर्म मध्ये प्रविष्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला सुरु ठेवा बटनावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुम्हाला तुमचे युजरनेम प्रविष्ट करावे लागेल आणि त्यानंतर पासवर्ड तयार करावा लागेल आता पासवर्डची पुष्टी करून तुम्हाला कॅप्चा कोड भरून नोंदणी बटनावर क्लिक करा
- अशा प्रकारे पूर्ण प्रक्रिया केल्यावर तुमची या पोर्टलवर नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण होईल, आणि या पोर्टवर तुमचे नवीन प्रोफाईल तयार होईल
- शासनाच्या या पोर्टलवर नोंदणी झाल्यावर तुम्ही कोणत्याही योजनेविषयी माहिती मिळवून योजनेसाठी अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला पोर्टलवर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागे, पोर्टवर जाऊन तुम्हाला तुमचे प्रोफाईल कधीही अपडेट करता येईल.
- आता यानंतर तुम्ही प्रत्यक्ष अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करू शकता, यासाठी नोंदणीकृत अर्जदाराला ‘’अर्जदार लॉगिन’’ वर क्लिक करावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- या नवीन पेजवर तुम्हाला लॉगिन विभाग दिसेल, यामध्ये तुम्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल आता तुम्हाला कॅप्चा कोड प्रविष्ट करून हि प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, यानंतर तुम्हाला ‘’Login Here’’ या बटनावर क्लिक करणे आवशयक आहे
- पोर्टवर अधिकृतपणे लॉगिन झाल्यावर तुम्हाला ‘’योजना माहिती’’ या पर्यायावर क्लिक करून पुढे विभाग या पर्यायावर क्लिक करावे, यानंतर तुम्हाला ‘’उच्च आणि तांत्रिक शिक्षण’’ या पर्याय दिसेल यावर क्लिक करा
- हि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्यासमोर शिष्यवृत्ती योजनांची लिस्ट उघडेल यातील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करून, अर्जदाराला डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेमध्ये प्रविष्ट होता येईल, आता योजन पाहण्यासाठी ‘’पहा’’ या बटनावर क्लिक करा
- तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल यामध्ये तुम्हाला ‘’अर्ज करा’’ हा पर्याय दिसेल या पायायाव्र क्लिक करा, यानंतर ‘’अर्ज तपशील’’ विभागामध्ये अर्जदाराला स्वतः बद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती भरावी लागेल
- त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र जसे की कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र इत्यादी माहिती अपलोड करावी लागेल, यानंतर तुम्हाला तुमचा घराचा कायमचा पत्ता भरून ‘’सेव्ह आणि नेक्स्ट’’ वर क्लिक करा आणि पुढील भागात जावे
- हा अर्जाचा पुढील विभाग अभ्यासक्रम आणि शिक्षणा सबंधित आहे या विभागामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती भरणे आवशयक आहे. यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
महत्वपूर्ण लिंक्स :-
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यानंतर, त्यांना मोठा प्रश्न भेडसावत असतो शहरांमध्ये वास्तव्याचा तसेच त्यांच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे हि समस्या आणखीच गंभीर होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यात अडचण निर्माण होते, या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना राबवून विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात दिला आहे, महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांसाठी अशा विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवून विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. वाचक मित्रहो या लेखामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही आपल्याला या योजनेबद्दल आणखी माहिती जाणून घायची असेल तर या योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट देऊ शकता.
योजना शासन निर्णय | इथे क्लिक करा |
---|---|
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
हेल्पलाईन नंबर | 022 – 49150800 |
महाराष्ट्र सरकारी योजना | इथे क्लिक करा |