Home सरकारी योजना Maharashtra; Asmita Yojana | अस्मिता योजना 2022

Maharashtra; Asmita Yojana | अस्मिता योजना 2022

0
Maharashtra; Asmita Yojana | अस्मिता योजना 2022

राज्यातील ग्रामीण भागात करण्यात आलेल्या आरोग्य संबंधित सर्वेक्षणात असे निदर्शनास आले कि ग्रामीण भागातील शाळांमध्ये माहितीनुसार सर्वसाधारणपणे वर्षातील पन्नास ते साठ दिवस, 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींचे  मासिक पाळी दरम्यान अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच मासिक पाळीच्या दरम्यान ग्रामीण भागातील महिला आणि मुली योग्य ती काळजी घेत नाही त्यामुळे मुली आणि महिलांमध्ये प्रजनना संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहे. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य विषयक काळजी या बाबत जनजागृती करण्याची आवश्यकता ओळखून शासनाने हि योजना उमेदपुरस्कृत स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून राबविण्याचे ठरविले आहे.

लाभार्थीसॅॅनेटरी नॅॅपकिनचा आकार8 पॅॅडच्या एका पॅॅकेटची स्वयंसहायता समूहांसाठी खरेदी किमंतस्वयंसहायता समूहाचा हाताळणी खर्च / नफाविक्री किमंत
ग्रामीण भागातील महिला240 m.m.19. 20/- रुपये4.80/- रुपये24/- रुपये
ग्रामीण भागातील महिला280 m.m.23. 20/- रुपये5.80/- रुपये29/- रुपये
जिल्हा परिषद शाळेतील 11-19 या वयोगटातील किशोरवयीन मुली240 m.m.4/- रुपये1/- रुपये5/- रुपये

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत अस्मिता योजनेच्या माध्यामतून ग्रामीण भागातील महिलांना आणि जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना 240 मी.मी. आकाराचे 8 सॅनिटरी नॅपकीनचे एक पाकीट 5 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • त्याचप्रमाणे अस्मिता योजनेंतर्गत ग्रामीन भागातील महिलांना 240 मि.मी. आकाराचे 8 सॅनिटरी नॅपकीनचे एक पाकीट 24/- रुपयाला आणि 280 मि.मी. आकाराचे 8 सॅनिटरी नॅपकीनचे एक पाकीट 29/- रुपयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • अस्मिता योजनेंतर्गत स्वयंसहायता समूहांची सॅनिटरी नॅपकीनची मागणी नोंदविण्यासाठी आणि त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करण्यासाठी शासनाकडून ‘’अस्मिता’’ या स्वतंत्र मोबाईल अप्लिकेशनचा निर्माण करण्यात आला आहे.
  • या अस्मिता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयं सहायता गटांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरांवर 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींबरोबर ग्रामीण भागातील महिलांना वैयक्तिक स्वच्छतेविषयी जनजागृती करणे.
  • ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजना 2022 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) हि नोडल एजन्सी म्हणून तसेच कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

 महाराष्ट्र अस्मिता योजना 2022 key Highlights

योजनेचे नावअस्मिता योजना 2022
व्दारा सुरुमहाराष्ट्र शासन
योजनेची सुरुवात8 मार्च 2018
लाभार्थीग्रामीण मुली आणि महिला
उद्देश्यस्वयं सहाय्यता गटांना मदत व ग्रामीण महिलांना आरोग्या सबंधित जागरुक करणे
श्रेणीग्रामीण महिलांसाठी योजना
विभागग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन
आधिकारिक वेबसाईटregasmita.mahaonline.gov.in
SHGs नोंदणीऑनलाइन

अस्मिता योजना अंतर्गत अस्मिता कार्ड

महाराष्ट्र अस्मिता योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यतील जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना अत्यंत माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, यासाठी शाळांमधील मुलींना आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलींना अस्मिता योजना कार्ड देण्यात येईल, अस्मिता कार्ड धारक किशोरवयीन मुली बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकीनची खरेदी करू शकतात. राज्यामध्ये जास्तीत जास्त मुलींना अस्मिता कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे, या योजनेंतर्गत अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पाच रुपयांप्रमाणे विक्री केलेल्या सॅनिटरी नॅपकीन पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट अनुदान शासनाकडून बचत गटांना देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वर्षभरात 13 सॅनिटरी नॅपकीनची पॅकेट किशोरवयीन मुलींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 पोषण अभियान मराठी 

अस्मिता योजना 2022 उद्देश

महाराष्ट्र शासन राज्यातील महिला बचत समुदायांच्या मदतीने हि अस्मिता योजना राबविणार आहे, या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य या बाबत ग्रामीण भागातील मुली आणि महिलांमध्ये जनजागृती करणे तसेच सॅनिटरी नॅपकीन वापरणाऱ्या महिलांची व मुलींची टक्केवारी वाढविणे जी आता 17 टक्के आहे. हे शासनाचे प्रथमिक उद्दिष्ट आहे.

  • अस्मिता योजनेंतर्गत मुलींचे शाळांमधील अनुपस्थितीचे प्रमाण कमी करून मुलींची शाळांमधील उपस्थिती वाढविणे हा शासनाचा उद्देश आहे.
  • अस्मिता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाहि अत्यंत माफक दारात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
  • अस्मिता योजनेच्या अंतर्गत अस्मिता वेबपोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक अस्मिता प्रायोजक होऊ शकतील, या उपलब्ध झालेल्या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकीन मिळण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून मोठी मदत उपलब्ध होणार आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना
महा जॉब्स पोर्टल 2022 महाराष्ट्र
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना महाराष्ट्र
महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना 2022
  • अस्मिता योजना ग्रामीण भागातील मुली आणि महिला यांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे, तसेच मुली आणि महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
  • जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजना अनुदान तत्वावर राबविण्यात येत आहे, त्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येत आहे.
  • अस्मिता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिला बचत गटांनामधील महिलांना मानधन देण्यात येत आहे, त्यामुळे या योजनेव्दारे रोजगार निर्माण होत आहे, यासाठी या महिला बचत गटांना अस्मिता अप्लिकेशन वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, ग्रामीण भागात मुलींना आणि महिलांना सॅनिटरी नॅपकीन वाटण्याची जवाबदारी महिला बचत गटांना देण्यात आली आहे.
  • अस्मिता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमधील किशोरवयीन मुलींची गैरहजेरी कमी करण्यासाठी आणि आरोग्य व शिक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद)

महाराष्ट्र राज्यात उमेद हे अभियान राबविण्यात येत आहे, उमेद अभियानाची अंमलबजावणी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून केले जाते. महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उमेद अभियानाचा उद्देश, गरीब गरिबीतून बाहेर पडू शकतो त्यासाठी त्याला आवश्यक ते सहाय्य दिले गेले पाहिजे, या विचारातून ग्रामीण भागातील गरिबांना एकत्र आणून, दारिद्र्य निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण गरिबांच्या सक्षम अशा संस्था निर्माण करणे या संस्थांमध्ये ग्रामीण भागातील वंचित महिलांचा स्वयं सहाय्यता गटांमध्ये समावेश करणे, या स्वयंसहाय्यता गटांच्या मार्फत ग्रामीण गरिबांना एकत्र आणून, त्यांच्या संस्थांची क्षमता वृद्धी करणे आणि कौशल्य वृद्धी करणे त्याचबरोबर आर्थिक सेवा पुरविणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देऊन गरिबांना दारिद्र्यातून बाहेर निघण्यासाठी मदत करणे असे शासनाच्या या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Asmita yojana maharashtra

उमेद अभियानाचे मुख्य वैशिष्ट्ये 

सामाजिक एकीकरण : राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब परीवारापर्यंत पोहोचून, त्या गरीब परिवारातील किमान एक महिलेचा स्वयंसहाय्यता गटांमध्ये समावेश करून घेणे, त्याचप्रमाणे स्थापित स्वयंसहाय्यता समुदायांचे ग्रामसंघ आणि प्रभाग संघांबरोबर बांधणी करणे.

गरिबांच्या संस्थांचे बळकटीकरण : गरिबांची आणि त्यांच्या संस्थेची वृद्धी व कौशल्य वृद्धी करणे आणि यासाठी समुदाय संसाधन व्यक्तीच्या सहाय्याने गरजेनुसार प्रशिक्षण देणे आणि क्षमता वृद्धी करणे.

आर्थिक समावेशन : स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ इत्यादी माध्यमातून शासन व बँकमार्फत, गरीब कुटुंबाना उद्योग व व्यवसायासाठी वाढविण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार अर्थ सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे.

शाश्वत उपजीविका निर्माण करणे : ग्रामीण भागामधील गरीब परिवारांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न किमान एक लाख करण्याच्या उद्देशाने रोजगार आणि स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे, तसेच गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी मार्गदर्शन करणे.

उमेद अभियानाची मुल्ये प्रमाणिकपणा, उत्तरदायित्व, पारदर्शकता, संवेदनशीलता.

उमेद अभियानाची व्यापक दृष्टी : अशा प्रगतीशील महाराष्ट्राची निर्मिती करणे जिथे सर्व नागरिक सुरक्षित सन्मानाने आणि संपन्नतेचे जीवन जगतील.

महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गट (SHGस) माहिती

महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गट (SHGs) हि राज्यातील महिलांच्या उत्कर्षासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी अभिनव आणि वैशिष्टपूर्ण संस्थात्मक उपक्रम आहे, या उपक्रमाच्या अंतर्गत राज्यातील महिलांना भविष्यातील उद्योजक आणि कुशल कामगार म्हणून प्रशिक्षण आणि विकासासाठी कोणत्याही एका स्वयंसहाय्यता गटामध्ये समाविष्ट करून घेतल्या जाते. राज्यातील महिलांकडे उद्योजक बनण्यासाठी पर्याप्त संसाधन नसल्यामुळे शासनाकडून स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन दिले जाते.

राज्यातील महिलांसाठी हे स्वयंसहाय्यता गट (SHGs) प्रशिक्षण सुविधांची व्यवस्था करतात, जेणेकरून बँकांनी या महिलांना उत्पादन आणि व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्यता करायला पाहिजे, त्याचबरोबर विपणन सुविधांची व्यवस्था करणे आवश्यक आहे, सरकार या स्वयंसहाय्यता गटांचे उत्पादन खरेदी करून उत्पादन वाढविण्यास मदत करेल. नेतृत्व गुणवत्तेच्या बाबतीत महिलांची क्षमता आणि स्वयंसहाय्यता गटांच्या व्यवस्थापनाची व्यवस्था करणे जेणेकरून त्यांच्याकडे प्रशासकीय क्षमता असेल. शासनाच्या समर्थनामुळे स्वयंसहाय्यता गट एक सामाजिक चळवळ म्हणून कमी अधिक प्रमाणात समाजाचा एक भाग बनत आहे. 

महाराष्ट्र अस्मिता योजना 2022 अंमलबजावणी

उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहायता समूह यांच्यामार्फत हि योजना राबविण्यात येणार आहे, त्यामुळे उमेदपुरस्कृत स्वयंसहायता समूह यांच्यासाठी योजनेची अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे, अस्मिता योजनेची अंमलबजावणी खालीलप्रमाणे आहे.

  • अस्मिता योजनेंतर्गत उमेद पुरस्कृत स्वयं सहायता समूहाची (SHG) सॅनिटरी नॅपकीन मागणी नोंदविण्यासाठी व त्यांचा पुरवठा करण्यासाठी अस्मिता या नावाच्या स्वतंत्र मोबाईल अॅपचा वापर करावा.
asmita yojana application
  • स्वयंसहायता गटांनी अनुसरण करण्याची पद्धत : उमेद संस्थेमार्फत अंमलबजावणी करतांना स्वयंसहायता समूहातर्फे सॅनिटरी नॅपकीन वितरणाची व्यवस्था खालीलप्रमाणे आहे.
  • नोंदणी प्रक्रिया : स्वयंसहायता गटांनी नोंदणीसाठी सर्व प्रथम play store वरून अस्मिता अॅप डाऊनलोड करावे.
  • यानंतर स्वयंसहायता गटांनी अप्लिकेशनवर NIC कोड टाकावा त्यानंतर नोंदणीसाठी आवश्यक असलेला OTP स्वयंसहायता गटांच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल व नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • जर एखाद्या स्वयंसहायता गटांचा मोबाईल क्रमांक NIC च्या SHG पोर्टलवर नोंदणीकृत नसेल तर त्या स्वयं सहायता गटांना अस्मिता अॅपवर नोंदणी करणे शक्य होणार नाही, त्यांनी NIC च्या SHG पोर्टलवर त्यांच्या मोबाईल नंबरची प्रथम नोंदणी करणे आवश्यक असेल.
  • सॅनिटरी नॅपकीनची ऑनलाइन मागणी नोंदविणे :- स्वयंसहायता गटांनी सॅनिटरी नॅपकीनची मागणी अस्मिता अॅपवर नोंदवावी, हि मागणी करतांना अस्मिता अॅपमध्ये असलेल्या वॉलेटमध्ये पर्याप्त रक्कम असणे आवश्यक आहे. यासाठी स्वयंसहायता समूहांनी वेळोवेळी या वॉलेट मध्ये पर्याप्त रक्कम रिचार्ज करणे आवश्यक आहे. हा रिचार्ज कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रात करता येईल, किंवा क्रेडीटकार्ड, डेबिटकार्ड, रूपेकार्ड, इत्यादीचा वापर करून करता येईल.
  • सदर मागणी नोंदविताना प्रत्येक प्रकारच्या सॅनिटरी नॅपकीनची 140 पॅकेटच्या पटीत मागणी नोंदविणे आवश्यक आहे. (ग्रामीण भागातील महिलांसाठी 240 मि.मी. चे किमान 140 पॅकेट किंवा 280 मि.मी. चे किमान 140 पॅकेट किंवा मुलींसाठी 240 मि.मी. चे किमान 140 पॅकेटची मागणी नोंदवावी)
  • सदर मागणी नोंदविल्यावर त्याचा एक SMS नोंदणीकृत मोबाईलवर येईल व सॅनिटरी नॅपकीनच्या किंमतीची रक्कम वॉलेटमधून वजा होऊन Pool Account मध्ये जमा होईल. तालुका पातळीवर वितरकाकडून हे नॅपकीन संबंधित स्वयंसहायता गट प्राप्त करून घेतील व अस्मिता अॅपवर नॅपकीन प्राप्त झाल्याबद्दलची नोंद करतील. त्यानंतरच Pool Account मधील रक्कम आपोआप पुरवठादाराकडे वर्ग होतील.

जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया

  • जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींसाठी हि योजना अनुदान तत्वावर राबविण्यात येणार असून त्यांना 8 नॅपकीनचे एक पकेट 5/- रुपये या सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमधील मुलींकडे अस्मिता कार्ड असणे आवश्यक आहे, याकरिता जिल्हा परिषद शाळांमध्ये नोंदविलेल्या 11 ते 19 वयोगटातील सर्व मुलींच्या यादीची प्रमाणित प्रत मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रात प्रत्येक शाळेने जमा करावी.
  • शाळेतील सर्व पात्र मुलींची नोंदणी आपले सरकार सेवा केंद्राच्या केंद्र प्रमुखांनी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन करावी. यासाठी मुलींकडून कोणतेही शुल्क आकरण्यात येऊ नये. याकरिता प्रत्येक मुलीच्या नोंदणीकरिता 5/- रुपये प्रमाणे नोंदणी फी शासनाकडून अदा करण्यात येईल.
  • नोंदणी झालेल्या सर्व मुलींसाठी Yes Bank मार्फत अस्मिता कार्ड तयार करण्यात येईल व उमेद मार्फत जिल्हा परिषद शाळेत पोहोचविण्यात येतील.
  • अस्मिता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शाळेने 100 टक्के पात्र मुलींची नोंदणी करावी.
  • अस्मिता कार्ड मिळाल्यानंतर स्वयंसहायता गटांकडून मुलींनी 5/- रुपये किंमतीत सॅनिटरी नॅपकीन विकत घ्यावे. विकत घेताना अस्मिता कार्ड दाखविणे आवश्यक राहील व या कार्डवरचा QR कोड Read केल्याशिवाय स्वयंसहायता गटांमार्फत हि विक्री होणार नाही.
  • ग्रामीण महिलांसाठी स्वयंसहायता गटांनी केलेल्या मागणीप्रमाणे वरील नमूद (24/- रुपये आणि 29/- रुपये) किंमतीत विक्री करावी.
  • महाराष्ट्र शासनाने अस्मिता योजनेसाठी नवीन पोर्टल सुरु केले आहे. regasmita.mahaonline.gov.in

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागामधील महिला आणि मुलींसाठी अस्मिता योजना सुरु केली आहे, या योजनेच्या अंतर्गत राज्य शासन ग्रामीण भागातील मुलींना आणि महिलांना अत्यंत कमी दरात सॅनिटरी पड उपलब्ध करून देत आहे, अस्मिता योजनेचा उद्देश महिलांमध्ये आणि मुलींमध्ये त्यांच्या मासिक पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, या योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण होईल हा उद्देश आहे. ग्रामीण भागामधील महिलांच्या आरोग्यासाठी अस्मिता योजना वरदान ठरत आहे. 

अस्मिता योजना शासन परिपत्रकइथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटइथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारी योजना इथे क्लिक करा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here