सरकार व्दारा या योजनेवर संपूर्ण तपशीलवार काम केले जात आहे. तसेच या योजनेला लागणारी धनराशीची व्यवस्थापण सरकार व्दारा केली जाणार आहे, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने 2018 साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु किली, या योजनेंतर्गत केंद्र सरकार कडून दरवर्षी देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 6000/- रुपये जमा केल्या जातात, हि रक्कम प्रत्येकी 2000/- रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वितरीत केली जाते.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना Highlights
योजनेचे नाव | मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र |
---|---|
व्दारा सुरु | महाराष्ट्र शासन |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्याचे शेतकरी |
उद्देश्य | राज्याच्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे |
आर्थिक सहायता | 6000/- रुपये दरवर्षी |
विभाग | महाराष्ट्र राज्याचा कृषी विभाग |
श्रेणी | शेतकरी योजना |
वर्ष | 2023 |
अर्ज करण्याची पद्धत | सध्या ठरायची आहे |
मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र मुख्य उद्देश्य
शेती संबंधित विविध घटनांमुळे नुकसानीत असलेला आणि शेती मध्ये नेहमी होत असेलेल उतार आणि चढाव या सर्व बाबींमुळे कंटाळलेला राज्यातील शेतकरी, महाराष्ट्रातील शेतकरी अनेक कारणांनी आत्महत्या करीत आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी त्यांना आर्थिक आधार देण्याच्या दृष्टीने, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना आणली आहे, या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रतिवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत करणारा आहे. या आर्थिक मदतीमुळे छोट्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज भासणार नाही आणि त्यांच्यासाठी हि आर्थिक मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार येत्या आर्थिक वर्षात, अर्थसंकल्पात या योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणार आहे, अर्थसंकल्पात या योजनेसाठी किती निधीची तरतूद करण्यात येणार आहे याची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु हि महत्वपूर्ण माहिती शासनाव्दारे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, मुख्यमंत्री किसान योजना लवकरच राबविण्यात येणार आहे, त्यानुसार वर्षभर टप्याटप्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली जाईल.
मुख्यमंत्री किसान योजना फायदे आणि वैशिष्ट्ये
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट आहे, या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत करेल जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, शासनाचा हा निर्णय राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000/- रुपये अनुदान देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आधीच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला एकूण केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे एकूण 12,000/- रुपये मिळू शकणार आहे.
- महाराष्ट्र राज्यात या वर्षी झालेल्या पावसात जून ते ऑगस्ट या महिन्यांच्या दरम्यान, झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, या अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना बराच मोठा फटका बसलेला आहे, यासाठी सरकार शेतकऱ्यांची तातडीने आर्थिक मदत करणार आहे.
- हि योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात राबविण्यात येणार आहे
- मुख्यमंत्री किसान योजना या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे
- या योजनेच्या अंतर्गत मिळणारी सहा हजारची रक्कम टप्या टप्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे
- हि योजना लागू झाल्यावर या योजनेचा विस्तार संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे
- या योजनेमुळे छोटे शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी यांना शेतीसाठी कर्ज काढण्याची गरज भासणार नाही
- या योजनेमुळे शेतकऱ्यांची शेती संबंधित सर्व गरजा पूर्ण होण्यास मदत होईल
- काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची कृषी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे
- महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेच्या अंमलबजावणी मुळे राज्यातील कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना थांबविण्यात शासनाला यश येईल.
- या योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री किसान निधी केव्हा जाहीर होणार आहे आणि यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत पात्रता
राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची दखल घेवून राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी झालेल्या कृषी अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत या मुख्यमंत्री किसान योजना संबंधित निर्णय घेण्यात आला आहे, त्या नुसार शासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार या योजनेच्या अंतर्गत लागणारी पात्रता खालीलप्रमाणे असेल
- या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्या जवळ शेती करण्यासारखी शेतजमीन असायला पाहिजे
- या योजनेंतर्गत लाभार्थी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा स्थायी राहावासी असणे आवश्यक आहे
- या योजनेच लाभ मिळविण्यासाठी शेतकरी अल्पभूधारक आणि ज्यांच्या कडे कमी शेतजमीन आहे असे शेतकरी या योजनेस पात्र असतील
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे आणि ते खाते आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत अर्ज करणे
मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी त्यांना शेतीसाठी कर्ज काढण्याची गरज पडूनये त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक गरजा आणि प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्या या दृष्टीने हि योजना राबविण्याचे ठरले आहे, महाराष्ट्र राज्याचे जे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे त्यांना या योजनेच्या पूर्ण अंमलबजावणी ची वाट पहावी लागणार आहे, कारण शासनाने या योजने संबंधित काही दिवसांपूर्वी झालेल्या कृषी अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत हि योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सरकार या योजनेच्या अमलबजावणी साठी योजनेचा प्रथम मसुदा तयार करेल, त्यानातर या योजनेची घोषणा केली जाईल आणि त्याचवेळेस सरकार योजनेच्या अर्ज प्रक्रीये संबंधित आणि वेबसाईट संबंधित माहितीची घोषणा करेल तो पर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. परन्तु माहिती नुसार महाराष्ट्र सरकार लवकरच या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात सुरु करेल.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 2022 लवकरच महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित महाराष्ट्र शासनाव्दारे करण्यात येणार आहे, या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6000/- रुपयानाचे अनुदान शासनातर्फे देण्यात येणार आहे, राज्यातील सरकारचा हा सर्वात मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय मनाला जात आहे, त्या संबंधित शासनाने या आर्थिक वर्षात बजेटमध्ये सुद्धा तरतूद करण्याचे ठरविले आहे, शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार देण्यात येणार आहे परंतु ते कसे आणि कोणत्या पद्धतीने देणार आहे या संबंधित माहिती अजून मिळालेली नाही. वाचक मित्रहो, या लेखात आपण मुख्यमंत्री किसान योजने संबंधित उपलब्ध असलेली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, तरी हि योजना संपूर्ण पद्धतीने सुरु झाल्यावर आपल्याला पूर्ण माहिती उपलब्ध होईल, आम्ही आपल्याला हि योजना सुरु झाल्यावर योजने संबंधित अपडेट्स देऊ, तरी आपल्याला या योजने संबंधित काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स च्या माध्यमातून विचारू शकता, आम्ही आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू.